मिथुन संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, महिनाभर अपार लाभ; सर्वोत्तम संधींचा शुभ फलदायी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:20 AM2023-06-16T10:20:58+5:302023-06-16T10:30:35+5:30

मिथुन संक्रांतीचा मेष ते मीन या सर्व १२ राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशी भाग्यवान ठरतील? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत विराजमान झाला आहे. यानंतर सुमारे महिनाभर सूर्य मिथुन राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. त्यामुळे हा आगामी महिनाभराचा काळ मिथुन संक्रांती म्हणून ओळखला जाईल.

मिथुन राशीतून सुमारे महिनाभरानंतर जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश केल. सूर्याची मिथुन संक्रांती महत्त्वाची मानली गेली आहे. मिथुन ही बुधाचे स्वामित्व असलेली रास आहे. काही दिवसानंतर या राशीत बुध ग्रह प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्य आणि बुधाचा अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.

सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश काही राशींसाठी अतिशय लाभदायक, यश-प्रगती अन् संधींचा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मिथुन संक्रांतीचा काळ कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकतो, कोणत्या राशींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती शुभ ठरू शकेल. नोकरदारवर्गाचे सर्व काही छान होऊ शकेल. फायदा होईल. जे सरकारी नोकरीत किंवा प्रशासकीय भूमिकेत आहेत, त्यांचा सन्मान वाढेल. धैर्य आणि पराक्रम वाढेल. अनेक दिवसांपासून बंद असलेले काम सुरू होऊ शकेल. शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती प्रगतीकारक ठरू शकेल. बुधादित्य योगामुळे भरपूर यश मिळू शकेल. अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे दुरावा निर्माण होणार नाही. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. मात्र, कौटुंबिक संबंधात तणाव वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन राशीत सूर्याचा प्रवेश झाला आहे. सूर्याची मिथुन संक्रांती चांगल्या संधींची ठरू शकेल. मुलाखतीत यश मिळेल. नोकरीच्या शोधात असाल, तर यश मिळेल. कामे पूर्ण होत राहील. वाणीवर नियंत्रण ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. डोळ्यांशी संबंधित समस्या वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. नोकरीत काही प्रतिकूल परिणाम मिळू शकतात. या संघर्षात एकटे वाटून घेऊ नका. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मनोबल वाढेल. व्यवसाय वाढेल. भागीदारीत कोणताही निर्णय विचार करून घ्या.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती वरदानाप्रमाणे ठरू शकेल. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. अनेक योजना फलद्रुप होऊ शकतील. परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. ज्यादा पैसे कमावण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे. खूप अनुकूल परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती अनुकूल ठरू शकेल. खूप धावपळ होऊ शकते. यश मिळेल. काम खूप वेगाने होईल. प्रगती होईल. सूर्याचा मिथुन प्रवेश खूप चांगला ठरू शकेल. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. हा काळ फलदायी ठरू शकेल. परदेशात स्थायिक होण्याची संधी मिळू शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती सकारात्मक ठरू शकेल. उच्च शिक्षणात भरपूर यश मिळेल. अध्यात्माकडे ओढा अधिक राहील. मानसिक तणावातून आराम मिळेल. खूप व्यस्त असाल. कुटुंबात सर्व काही चांगले होईल, गोडवा येईल. आरोग्यही सामान्य राहील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही घटना, कारणांमुळे त्रास होऊ शकते. मानसिक ताण येऊ शकतो. कोणतेही काम करण्यापूर्वी मनाचे ऐका आणि मगच काम करा. सर्वकाही विचार करून करा. पैशाची कमतरता असू शकते. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती दिलासादायक ठरू शकेल. नोकरी, व्यावसायात येणारे अडथळे दूर होऊ शकतील. फायदा होईल. नोकरदारांना बदलीची चिन्हे आहेत. कौटुंबिक परिस्थिती सामान्य असेल. आनंदाचा अनुभव घ्याल. खूप छान वाटेल. आरोग्यही चांगले राहू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती अनुकूल ठरू शकेल. व्यावसायिक चांगले काम करू शकतील. अवाजवी खर्च टाळा. अन्यथा आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. सावधगिरीने प्रवास केला, तर बरेच फायदे होऊ शकतील. कौटुंबिक स्थिती चांगली राहील. मानसिक तणावातून आराम मिळेल. आरोग्यही सामान्य राहील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती सकारात्मक ठरू शकेल. सर्जनशील क्षेत्रात पुढे जाईल. हा काळ खूप शुभ आहे. व्यवसायात नवीन कल्पनांचा समावेश कराल. या काळात नियोजित योजना राबवण्यात यशस्वी व्हाल. धैर्य, संयम वाढू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याची मिथुन संक्रांती सुखद ठरू शकेल. सेवा उद्योगाशी संबंधित कार्यक्षेत्रात लाभ होईल. इच्छाशक्ती यश देईल. आक्रमकता वाढू शकेल. जास्त राग तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो. एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.