वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य! By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:32 AM 2024-11-06T11:32:36+5:30 2024-11-06T11:44:53+5:30
नोव्हेंबर महिन्यात सूर्याचे गोचर होणार आहे. याचा अनेक राशींना उत्तम लाभ, सकारात्मक अनुकूलता मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. विद्यमान स्थितीत सूर्य तूळ राशीत असून, १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीत सूर्य सुमारे महिनाभर विराजमान असतो.
सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. सूर्याच्या वृश्चिक राशीतील प्रवेशानंतर आगामी काळ वृश्चिक संक्रांती म्हटले जाणार आहे. सूर्य हा नेतृत्व क्षमता, आत्मा इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत सूर्याच्या राशी बदलाचा प्रभाव करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती यावर पडू शकतो.
सूर्याच्या वृश्चिक राशीतील प्रवेशानंतर वृषभ राशीत असलेल्या गुरु ग्रहाशी समसप्तक योग जुळून येणार आहे. कोणत्या राशींवर सूर्याच्या गोचराचा प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या...
वृषभ: नोकरी आणि व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराप्रती मृदुभाषी वृत्तीचा अवलंब करा. काही प्रकरणांमुळे वाद होऊ शकतात. सावध राहा. आर्थिक आघाडीवर आगामी कालावधी फायदेशीर ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून लाभ मिळू शकतील.
कर्क: अध्यात्माकडे अधिक कल राहील. धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च कराल. करिअर क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पदोन्नतीसह आर्थिक लाभ होऊ शकतो. सर्वजण कामाचे कौतुक करतील. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. अवलंबलेली रणनीती भरपूर पैसे कमवून देऊ शकते. आर्थिक स्थितीही चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात.
सिंह: विशेष लाभ मिळू शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासोबतच भरपूर आर्थिक लाभही मिळू शकतो. करिअर क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. कामात समाधानी राहू शकता. व्यवसायात फायदा होईल. शेअर बाजारातून पैसे कमवू शकता.
तूळ: सूर्याची कृपा होऊ शकते. कामाचे कौतुक केले जाऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. बिझनेसमध्ये नवीन करार होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकता. लव्ह लाईफ चांगले असू शकेल. दोघांचे नाते मजबूत होऊ शकेल.
वृश्चिक: कामात यश मिळेल. पद आणि प्रतिष्ठा सोबतच कीर्ती आणि वैभव वाढेल. सरकारी नोकरीसाठी वेळ अनुकूल आहे. मान-सन्मान वाढेल. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या.
मकर: नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. मुलांबाबत मनात जी काही चिंता असेल ती दूर होईल. कामात घरच्यांचे सहकार्य मिळेल. प्रगती आणि पदोन्नती दिसू शकते. कामाच्या ठिकाणी यशस्वी नेतृत्वाचे कौतुक होईल. आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्राच्या मदतीने कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करू शकाल.
कुंभ: व्यवसायात लाभ होईल. नवीन वाहन घ्यायचे असेल किंवा घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर यश मिळू शकेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. या काळात वडील आणि शिक्षक यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक आघाडीवर पूर्ण सहकार्य मिळू शकेल. अध्यात्मात अधिक रस असेल आणि प्रगती होईल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.