Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा शुभयोग, ‘या’ ४ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेत लाभच लाभ! कुणी राहावे सतर्क? By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:53 AM 2022-10-25T09:53:23+5:30 2022-10-25T10:04:41+5:30
Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण अनुकूल मानले गेले नसले, तरी दिवाळीत काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या, उपाय... संपूर्ण देशासह परदेशात दिवाळीचा धूम-धडाका सुरू आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण लागणार आहे. भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण असणार असून, हे खंडग्रास पद्धतीने सूर्यग्रहण दिसेल. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजून २९ मिनिटांपासून सूर्यग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. (Solar Eclipse 2022)
दिवाळीत सूर्यग्रहण लागण्याचा योग २७ वर्षांपूर्वी जुळून आला होता. हे सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून, ग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास ३ मिनिटे असणार आहे. परंतु, या सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात आहे. (Surya Grahan In Diwali 2022)
सन १९९५ मध्येही तूळ राशीत सूर्यग्रहण झाले होते आणि या वर्षीही तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. तूळ राशीत चार ग्रहांचा अद्भूत संयोग जुळून येत आहे. सूर्यग्रहणावेळी तूळ राशीत सूर्यासह केतू, शुक्र आणि चंद्र विराजमान असतील. सूर्यग्रहण शुभ मानले जात नसली तरी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण आनंददायी आणि लाभदायक ठरू शकते. तर कोणत्या राशींना सतर्कतेचा सल्ला देण्यात येत आहे? जाणून घेऊया...
कर्क राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण उत्तम ठरू शकेल. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. कौटुंबिक जीवनातही चांगले वातावरण राहील. एखादे वाहन, जमीन, मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अंतिम निर्णय घेऊ शकता. वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्यांच्या कामाला नवी ओळख मिळू शकते. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांकडून सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण यशकारक ठरू शकेल. ४ ग्रहांच्या शुभस्थितीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. लहान भावंडांच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो. तुमच्या वृत्तीमध्ये चांगला बदल होऊ शकेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळू शकतात.
धनु राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण लाभदायक ठरू शकते. अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्वात चांगले बदल होऊ शकतात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते. तुमच्या उणिवांवर काम करून तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल. तुम्ही योग्य मार्गाने मार्गदर्शन करू शकता. नवीन लोकांशी मैत्री होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकेल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. योग्य नियोजन करून कामे केल्यास त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना या कालावधीत उत्तम यश मिळू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. जर तुम्ही संयम ठेवला तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात.
वृषभ राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. सूर्यग्रहणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटू शकते. तुम्हाला जी काही चिंता आहे, ती तुम्ही कोणाशीही शेअर करू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.
मिथुन राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या बजेटची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचा खर्च वाढू शकेल. मात्र, मिळकत तेवढी होईलच असे नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल. अन्यथा दिलेली वेळ पाळणे कठीण होऊ शकेल. प्रत्येक काम करण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत आणि परिश्रम दुप्पट करावे लागतील.
कन्या राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीवर प्रतिकूल प्रभाव पाहायला मिळू शकेल. या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसे गुंतवण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शक्य असल्यास पैसे गुंतवणे टाळा. तसेच प्रत्येक काम करण्यापूर्वी तुमचे बजेट तयार करा.
तूळ राशीत सूर्यग्रहण होत आहे. या राशीत चार ग्रहांचा अद्भूत योग जुळून आला आहे. या राशीच्या व्यक्तींवर सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव पाहू शकेल. या काळात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. शक्य असल्यास प्रवास टाळावेत, असे सांगितले जात आहे.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे खंडग्रास सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होईल. तुमचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात केलेली गुंतवणुकीतून तोटा होऊ शकेल. शक्यतो गुंतवणूक करणे टाळा.
मकर राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण संमिश्र ठरू शकेल. सूर्यग्रहणात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्याच्या बाबतीतील निष्काळजीपणा नुकसानकारक ठरू शकतो. एखादी अनामिक भीती सतावू शकते. संयम आणि शांततेने कार्य करावे, असे सांगितले जात आहे.
सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. ग्रहणानंतर लगेचच गहू, गूळ, मसूर, तांबे या गोष्टींचे दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकेल. याशिवाय आदित्य हृदयस्तोत्राचे पठण करू शकता. यासोबतच गुरुमंत्राचा जप करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे सांगितले जात आहे.
सूर्यग्रहणाचा भारतातील उज्जैन आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक प्रभाव दिसू शकेल. याशिवाय सूर्यग्रहणाचा प्रभाव युरोप, मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उत्तर महासागरात सर्वाधिक दिसून येईल. हे सूर्यग्रहण युरोपियन देशांसाठी चांगले होणार नाही, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.