१७ ऑक्टोबरला सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ४ राशींची दिवाळी; अपार यश-प्रगती, महिनाभर लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:30 AM2022-10-14T09:30:16+5:302022-10-14T09:36:12+5:30

तूळ ही सूर्याची दुर्बल रास मानली जात असली तरी काही राशीच्या व्यक्तींना उच्च फळे मिळू शकतील. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी बुधचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे महिन्याभरानंतर १६ नोव्हेंबर रोजी सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तूळ रास ही सूर्याची नीच रास मानली जाते. (surya in tula rashi 2022)

ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याच महिन्यात दसरा, दिवाळीसारखे शुभ सण-उत्सव येत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर शुभ प्रभाव दिसून येईल, तर काही राशीच्या व्यक्तींना संयमाने आणि सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. (sun transit libra 2022)

सूर्याच्या तूळ प्रवेशाच्या एक दिवस आधीच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मिथुन राशीत विराजमान होत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी दोन ग्रहांचे राशी बदल सर्व राशींसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. (tula sankranti 2022)

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तूळ ही सूर्याची नीच रास आहे. ज्यामुळे सूर्याचा प्रतिकूल प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल. परंतु सूर्य तूळ राशीमध्ये नीचेचा असला तरी अनेक राशींना उच्च फळ देऊ शकेल. सूर्याच्या तूळ प्रवेशाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्ही मोठ्या उत्साहाने आणि उर्जेने काम कराल. नोकरदार वर्गासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. बर्‍याच काळापासून पदोन्नती किंवा बदलाची अपेक्षा करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी विशेष परिणाम देईल. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यावसायिकांनाही व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने आगामी काळ खूप सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आक्रमक स्वभाव काम पूर्ण करण्यात उपयुक्त ठरू शकेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. या काळात तुमचे लव्ह लाईफही खूप चांगले असणार आहे.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती होईल. मेहनतीने कामे पूर्ण करू शकाल. तुमचे शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात उच्च पद मिळू शकते. तुमची लोकप्रियता वाढू शकेल. तीर्थाटन करण्याची योजना आखू शकाल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली असू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश चिंतामुक्तीचा ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळेल. तुमची कामगिरी पाहून तुमचे सहकारीही प्रभावित होतील. वडिलांशी चांगले संबंध असणार आहेत. घर, वाहन किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची योजना करू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सूर्याच्या तूळ प्रवेशानंतर शुक्र तसेच बुधाच्या तूळ राशीतील विराजमान होतील. यामुळे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. याचाही प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.