राहु-शनी-सूर्याचा अद्भूत योग: ३ राशींना उत्तम काळ, मोठा लाभ; ४ राशींना संमिश्र, सतर्क राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 09:55 AM2024-07-24T09:55:07+5:302024-07-24T10:07:06+5:30

सूर्य, शनी आणि राहु यांचे जुळून येणारे योग विशेष मानले जात असून, कोणाला लाभ आणि कोणाला सतर्क राहण्याचा काळ असेल? जाणून घ्या...

जुलै महिन्याची सांगता होत आहे. ऑगस्ट महिन्यात बुध, सूर्य, शुक्र, मंगळ हे ग्रह गोचर करणार आहेत. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचरामुळे काही अद्भूत योग तयार होत आहेत. या योगांचा सकारात्मक आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला शनी कुंभ राशीत तर, राहु मीन राशीत विराजमान आहेत. ऑगस्ट महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्य आणि शनी यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच राहु आणि सूर्य यांचा षडाष्टक योग जुळून येत आहे. सूर्य, शनी आणि राहु यांचे जुळून येत असलेले योग महत्त्वाचे आणि विशेष मानले गेले आहेत.

सूर्य, शनी आणि राहु यांच्या समसप्तक तसेच षडाष्टक योगामुळे काही राशींना चांगला लाभ तसेच सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. तर काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. या काळात काय काळजी घ्यावी, कोणत्या आघाडीवर आगामी कालावधी उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: कोणतेही जोखमीचे काम करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी. सरकारी कामात काही अडचणी येऊ शकतील. काही व्यत्ययानंतरच काम पूर्ण होताना दिसेल. आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला जात आहे. अल्पकालीन गुंतवणूक टाळावी. पालकांना मुलांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कर्क: पैसा, गुंतवणूक आणि मालमत्ता संबंधित फायदे मिळू शकतील. जीवनात आनंद वाटेल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. कामाचे कौतुक होईल. पगारातही वाढ होऊ शकते. पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. भविष्यासाठी करत असलेल्या कामात यश मिळू शकते. अध्यात्माकडे अधिक कल असेल.

सिंह: व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर करू शकता. समाजात मान-सन्मान वाढेल. विविध माध्यमातून विकास होईल. व्यवसायातील भागीदारांशी संबंध सुधारतील. काही नवीन लोकांसोबत व्यवसाय करू शकता. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद संपू शकतात.

कन्या: खर्चांत मोठी वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. झोपेशी संबंधित समस्या असू शकतात. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवास अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनु: उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत काम करू शकता. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येईल. एखाद्या खास मित्राला भेटू शकता. नोकरदारांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काम आणि कामगिरी सुधारेल. अध्यात्माकडे अधिक कल असेल.

मकर: सरकारी कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामे होत राहतील. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. विरोधक खूप त्रास देऊ शकतात.

मीन: आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असू शकतात. कामाच्या ठिकाणी एकामागून एक समस्यांना सामोरे जावे लागेल. शत्रूंचा थोडा प्रभाव असू शकतो. कामात निराशेचा सामना करावा लागू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.