सूर्य-शनी समसप्तक योग: सावधान! पिता-पुत्राची वक्रदृष्टी; ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ! By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 11:36 AM 2024-08-09T11:36:32+5:30 2024-08-09T11:41:48+5:30
Surya-Shani Samsaptak Yog 2024: तब्ब्ल १२ महिन्यांनंतर सूर्य आणि शनि पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि शनिसोबत समसप्तक योग तयार करेल. सूर्य आणि शनीचा संसप्तक योग अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्य आणि शनि, ज्यांना पिता-पुत्र म्हटले जाते, त्यांचे आपापसात वैर असल्याचे पौराणिक कथेत सांगितले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्य आणि शनि सप्तम दृष्टीकोनातून एकमेकांकडे पाहतात तेव्हा ते मेष आणि मकर राशीसह ५ राशीच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ घडवून आणू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. त्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात. सूर्य आणि शनीच्या अशुभ दृष्टीमुळे मेष आणि मकर व्यतिरिक्त कोणत्या राशींनी सतर्क राहायला हवे ते जाणून घेऊया. १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत भ्रमण करत आहे. या संक्रमणानंतर सूर्य आणि शनीच्या दरम्यान समसप्तक योग तयार होईल. या काळात कुंभ राशीमध्ये स्थित शनि आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या घरात असतील आणि एकमेकांपासून १८० अंशांवर असतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि यांच्यातील संबंध, शत्रूसारखे मानले जातात. या स्थितीत सूर्य आणि शनीच्या संसप्तक योगाच्या अशुभ प्रभावामुळे मेष आणि मकर राशीसह ५ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात. व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. व्यावसायिक भागीदारांसोबतचे संबंध अचानक बिघडू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनातही वादळ येऊ शकते. या काळात कोणत्या गोष्टी घडू शकतात व त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ.
मेष : सूर्य-शनि समसप्तक योगाच्या अशुभ प्रभावामुळे मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात आणि तुमच्या करिअरमध्येही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी, तुम्हाला सल्ला दिला जातो की आर्थिक बाबतीतही कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांची व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. खरेदी-विक्री करताना पैसे जपून वापरा.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी या काळात विचारपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुमचे मन दुखावण्याची शक्यता आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबतचे तुमचे नाते बिघडू शकते. विश्वासाचे नाते निर्माण करा, वाद टाळा आणि सुसंवाद वाढवा. करिअरच्या दृष्टीनेही हा कालावधी तुमच्यासाठी योग्य नाही. ऑफिसमधील इतर लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवू शकेल. वाणीवर आणि विचारांवर संयम ठेवणे योग्य ठरेल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरू शकेल. तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च आणि तणाव वाढू शकतो. ज्यामुळे वैवाहिक जीवनात अशांतता वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात. नकारात्मकता वाढल्याने तणाव वाढू शकतो. नोकरी, व्यवसायात सावधगिरीने पावले उचला. आर्थिक व्यवहारात अनुभवी लोकांचे सल्ले घ्या, नुकसान कमी होण्यास मदत होईल.
वृश्चिक : सूर्य आणि शनीचा संसप्तक योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक चिंता आणि समस्या वाढवणारा काळ ठरू शकेल. तुमच्या चालू असलेल्या कामात अचानक अडथळे येऊ शकतात आणि तुमचे काम अडून राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबी व्हा. कोणालाही शब्द देताना आधी विचार करा. व्यवहारात चोख राहा, अन्यथा पैशांवरून बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
मकर : मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक बाबतीत समस्यांनी भरलेला असेल आणि आरोग्याच्या तक्रारीदेखील उद्भवू शकतात.नोकरी-व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावधतेने काम करता. प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. एवढेच काय तर मित्र परिवार किंवा नातलगांकडूनही धोका संभवतो. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करा, मगच विश्वास ठेवा, फायद्यात राहाल!