'या' पाच राशीच्या पुरुषांच्या भाग्यात असते सुंदर, मनमिळाऊ पत्नी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 04:04 PM 2021-07-31T16:04:40+5:30 2021-07-31T16:14:29+5:30
प्रत्येक पुरुषाची इच्छा असते, की आपल्या सुंदर, सुस्वभावी, मनमिळाऊ, सुशिक्षित आणि सुसंस्कृत पत्नी मिळावी. परंतु अलीकडच्या काळात मुला मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे अविवाहितांचे प्रश्न जटील होत चालले आहेत. मात्र ज्योतिषशास्त्र सांगते पुढील पाच राशींना या गोष्टीची विशेष चिंता नसते. कारण त्यांना मनासारखे स्थळ समोरून चालून येते. या पाच राशींमध्ये तुमची रास असेल, तर चांगलेच आहे, अन्यथा चांगला जोडीदार मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला चांगले सिद्ध करण्याची जबाबदारी वाढली आहे असे समजा! पाहूया त्या पाच भाग्यवान राशी कोणत्या... मिथुन मिथुन राशीचे लोक आनंदी आणि उत्साही असतात. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, त्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात. स्त्रियांशी आदराने वागणे, मोठ्यांचा आदर करणे, समोरच्याला समजून घेणे या खुबी त्यांच्याजवळ असल्यामुळे जोडीदार मिळवण्यासाठी आणि नाते टिकवण्यासाठी त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत.
सिंह सिंह राशीचे लोक खूप कणखर आणि धैर्यवान असतात मात्र जोडीदाराच्या बाबतीत ते अतिशय हळवे असतात. या स्वभावामुळे त्यांचे आपल्या जोडीदाराशी नाते स्नेहपूर्ण आणि अतूट राहते. लोकांना त्यांची भीती वाटत असली, तरी त्यांचा जोडीदार मात्र त्यांच्याबरोबर हसून खेळून आयुष्य व्यतीत करतो.
कन्या कन्या राशीची मुले देखणी आणि आकर्षक असतात. त्यामुळे सुंदर मुली आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. तसेच या राशीच्या मुलांचा प्रेमळ स्वभाव मुलींना भावतो. अशा लोकांना मैत्रिणींची कमतरता नसते. मात्र त्यांच्यात जी सहचारिणी म्हणून स्थान पटकावते ती अधिक भाग्यवान असते.
मकर मकर राशीच्या लोकांची बोलण्याची शैली मधुर असते आणि ते लोकांची मने सहज जिंकतात. त्यांच्या ठायी असलेली कला, प्रामाणिकपणा आणि समोरच्याला आश्चर्याचा सुखद धक्का देण्याची शैली जीवन साथीदाराचे मन जिंकण्यात खूप मदत करते. मकर राशीच्या मुलांना खूप सुंदर आणि समर्पित पत्नीचा आधार मिळतो.
मीन प्रामाणिकपणा, निष्ठा, आनंदी स्वभाव हे या राशीचे गुण आहेत. हे तीनही गुण प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदाराकडून अपेक्षित असतात. हे सर्व गुण मीन राशीत जन्मलेल्या मुलांमध्ये असतात. ते स्वतः देखणे असले किंवा नसले, तरीही या गुणांमुळे त्यांना जीवनसाथी खूप चांगला मिळतो आणि त्यांचे नाते छान टिकते.