अनेकदा व्यक्ती दिसते एक आणि वागते एक. त्यांच्या वागण्या बोलण्यात काही ताळमेळ नसतो. तसेच त्यांना बाकीच्यांकडून सगळे ऐकून घेण्यात रस असतो, पण स्वतःबद्दल मौन पाळण्याला ते प्राधान्य देतात. अशा लोकांचा भोळा भाबडा चेहरा वाचण्यात आपण कदाचित चूक करू शकतो. कारण वरवर निरागस दिसणारे चेहरे वास्तवात आतल्या गाठीचे असू शकतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. त्यांचा हा दुर्गुण सोडला, तर अशा व्यक्ती निर्णय घेण्यात अचूक असतात . प्रत्येक गोष्ट समजून उमजून करतात. त्यामुळे अशा लोकांचा प्रभाव समोरच्यांवर पटकन पडतो आणि दीर्घकाळ टिकतो. असे हे राशींचे स्वभाव पाहता, त्या राशी नेमक्या कोणत्या ते पाहू.