त्रिग्रही बुधादित्य योग: ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ, पगारवाढ, प्रगतीचे योग; व्यापारात नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:24 PM2023-02-20T14:24:00+5:302023-02-20T14:34:37+5:30

कुंभ राशीत जुळून येत असलेले सूर्य, बुध आणि शनीच्या शुभ योग काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

२७ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला कुंभ राशीत सूर्य आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह विराजमान आहे. बुधाच्या कुंभ प्रवेशानंतर शुभ राजयोग तयार होत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील काही ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करीत असतात. ग्रहांच्या या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा प्रभाव सर्व राशींसह देश-दुनियेवर पडत असतो, असे सांगितले जाते. काही राशींना हा काळ चांगला ठरतो, तर काही राशींना संमिश्र ठरतो.

बुधाच्या कुंभ प्रवेशानंतर या राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. बुध, सूर्य आणि शनी या तीन ग्रहांचा त्रिग्रही योग शुभ मानला गेला आहे. आताच्या घडीला शनी अस्तंगत आहे. त्यामुळे शनीचा प्रभाव कमी असेल, असे सांगितले जात आहे.

त्रिग्रही योगासह सूर्य आणि बुधाच्या युतीचा बुधादित्य योग जुळून येत आहे. हा एक अतिशय शुभ राजयोग मानला गेला आहे. त्याच बरोबर बुध आणि शनि हे मित्र ग्रह मानले गेले आहेत. अशा परिस्थितीत या तीन ग्रहांचे कुंभ राशीत आगमन काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग यशकारक ठरू शकेल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. नोकरदारांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. या कालावधीत तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा कालावधी खूप छान असणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यात यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग चांगला ठरू शकेल. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. नोकरीच्या दृष्टीने हा काळ खूप चांगले राहू शकेल. या काळात आत्मविश्वासही वाढेल. व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकल्प जे थांबले होते त्यांना पुन्हा गती मिळू लागेल. भरपूर पैसे मिळू शकतील. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात भरपूर नफा मिळविण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवन या काळात आनंदाने भरलेले राहू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग सकारात्मक ठरू शकेल. नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतील. व्यापारी वर्गाला व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप चांगला काळ ठरू शकेल. व्यवसायातील गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. मन प्रसन्न राहील.

तूळ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकेल. स्वतःमध्ये सुधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतील. जे काही प्रयत्न कराल, त्यात यश मिळू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग अनुकूल ठरू शकेल. संवाद कौशल्य मजबूत होईल. लोक आकर्षित होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही समजूतदारपणाने आणि कार्यक्षमतेने करिअरमध्ये चांगले परिणाम साध्य करू शकाल. करिअरच्या हा काळ खूप अनुकूल ठरेल. बढती मिळू शकेल. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग शुभ ठरू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील. आर्थिक बाबतीत प्रगती कराल. आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगली कमाई करता येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. वागण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास दिसून येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.