ऑगस्टमध्ये २ त्रिग्रही योग: ६ राशींना शुभ, व्यवसाय विस्तार शक्य; अचानक आर्थिक लाभ, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:58 PM2024-07-31T12:58:06+5:302024-07-31T13:20:39+5:30

ऑगस्ट महिन्यात दोन त्रिग्रही योग जुळून येत आहे. कोणत्या राशींना हा योग शुभ लाभदायी आणि फायदेशीर ठरू शकेल? जाणून घ्या...

ऑगस्ट महिना सुरू होत आहे. या महिन्यात सूर्य, शुक्र, बुध यांचा सिंह राशीत त्रिग्रही, बुधादित्य, शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तो स्वराशीत प्रवेश करणार असून, ते शुभ मानले गेले आहे.

३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत विराजमान झाला आहे. तर बुध आधीच या राशीत विराजमान आहे. परंतु, बुध ऑगस्ट महिन्यात वक्री होणार आहे. ऑगस्टच्या मध्यावर सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे स्वराशीत विराजमान झाल्यानंतर सूर्य, शुक्र आणि बुध यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चंद्र सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे शुक्र, बुध आणि चंद्र यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. त्रिग्रही योगाचा काही राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, व्यापार, व्यवसाय, नोकरी यांमध्ये यश-प्रगती, उत्तम संधी मिळू शकतात, असे म्हटले जात आहे जाणून घेऊया...

मेष: आगामी दिवस येणारे दिवस खास असतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटू शकता, जो तुम्हाला प्रेरणा देईल. ज्येष्ठांचे सामाजिक वर्चस्व वाढेल.

कर्क: शुभ सिद्ध होऊ शकेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या बाबतीत फायदेशीर सिद्ध होईल. नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. मनोकामना पूर्ण होतील. कार्यशैली सुधारेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते.

सिंह: त्रिग्रही योग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. लोकप्रियतेतही वाढ होऊ शकेल. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ फायदेशीर ठरू शकेल. प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन छान राहू शकेल. जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळू शकेल.

वृश्चिक: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. काम आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसू शकते. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकेल. ज्याचे फायदे करिअरमध्ये पाहायला मिळू शकतील. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते.

धनु: नोकरदारांना उत्पन्नाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. प्रेम संबंधांच्या बाबतीत चांगला राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वाहन खरेदीची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कुंभ: विवाहितांना येणारे दिवस खास ठरू शकतील. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, व्यावसायिकाचे विरोधक त्याचे नुकसान करू शकणार नाहीत. व्यवसायात हळूहळू विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना लवकरच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.