घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दाखवणे महत्त्वाचे आहे. व त्याला वास्तुशास्त्रात दिलेल्या उपायांची जोड दिली, की वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि घरातले वातावरण सुदृढ होते. तुम्ही देखील या प्रश्नांना सामोरे जात असाल, तर पुढील उपाय अवश्य करून बघा.