तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:31 PM 2024-11-11T16:31:59+5:30 2024-11-11T16:42:30+5:30
तुलसी विवाहाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून, राशीनुसार कोणते उपाय करणे लाभदायक ठरू शकते? जाणून घ्या... आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठूराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्या वेळी ‘उठी उठी गोपाळा’ म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्याच दिवशी तुलसी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते. यंदा सन २०२४ मध्ये १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, १३ नोव्हेंबरपासून तुलसीविवाहारंभ होत आहे. तर, १५ नोव्हेंबर रोजी तुलसीविवाह समाप्ती होत आहे.
तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते.
तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. तुलसी विवाहाच्या निमित्ताने राशीनुसार काही उपाय करावे, असे सांगितले जाते. असे उपाय केल्यास विविध लाभ प्राप्त होऊ शकतात. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया...
मेष: तुलसी विवाहावेळी मेष राशीच्या व्यक्तींनी तुळशीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. असे केल्याने बहुतांश चिंता दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
वृषभ: तुलसी विवाहावेळी वृषभ राशीच्या व्यक्तींनी तुळशीला अत्तर अर्पण करावे. असे केल्याने धनलाभाचे योग प्रबळ होतात. जीवनात ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. ग्रह दोष दूर होण्यास सहाय्य होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
मिथुन: तुलसी विवाहवेळी मिथुन राशीच्या व्यक्तींनी तुळशीला प्रिय असलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकतेचा संचार होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
कर्क: तुलसी विवाहावेळी कर्क राशीच्या व्यक्तींनी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने कुंडलीतील चंद्र दोष दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे.
सिंह: तुलसी विवाहावेळी सिंह राशीच्या व्यक्तींनी तुळशीला लाल फूल अर्पण करावे. तसेच सायंकाळी दिवा लावावा. असे केल्याने मान, सन्मान वृद्धिंगत होतील. सुलभता येईल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कन्या: तुलसी विवाह कालावधीत कन्या राशीच्या व्यक्तींनी तुळसीचे रोपटे मंदिरात दान करावे. असे केल्याने यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात. नोकरी, व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
तूळ: तुलसी विवाहावेळी तुळ राशीच्या व्यक्तींनी तुळशीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने घरातील सुख, शांतता वृद्धिंगत होते. कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध दृढ होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
वृश्चिक: तुलसी विवाहावेळी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तुळशीला सौभाग्यलंकार अर्पण करावेत. असे केल्याने हितशत्रू आणि विरोधकांचा त्रास संभवत नाही. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकतील, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
धनु: तुलसी विवाहावेळी धनु राशीच्या व्यक्तींनी तुळशीला हळद अर्पण करावी. असे केल्याने मंगलकार्यात येणारी विघ्ने दूर होऊ शकतील. तसेच कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही आणि सराकात्मक राहू शकेल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
मकर: तुलसी विवाहावेळी मकर राशीच्या व्यक्तींनी तुळशीचे स्वतःच्या हाताने कन्यादान करावे. असे केल्याने मुलांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी, अडथळे, समस्या दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कुंभ: तुलसी विवाह कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींनी गरजू व्यक्तींना दान द्यावे. तसेच तुळशीचे रोपटेही दान म्हणून द्यावे. असे केल्याने शनी देवतेचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. तसेच अकाल मृत्युचे भय राहत नाही. समस्या, अडचणींवर मार्ग सापडत जातो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
मीन: तुलसी विवाह कालावधीत मीन राशीच्या व्यक्तींनी तुळशीचे रोपटे लावावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. मात्र, तुळशीचे रोपटे लावल्यानंतर तेथे शाळीग्राम ठेवावा, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.