शुक्राचा अस्त: ४ राशींना लाभच लाभ, ८ राशींना काहीसा ताप; तुमची रास कोणती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:34 AM2023-08-05T11:34:47+5:302023-08-05T11:46:39+5:30

पुढील काही दिवस ८ राशींना समस्याकारक ठरू शकतात. शुक्र अस्ताचा कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो? तुम्हीच पाहा.

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.

रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. काही दिवसांपूर्वी शुक्र सिंह राशीत वक्री झाला आहे. वक्री अवस्थेत असतानाच आता शुक्र अस्तंगत झाला आहे. यानंतर ०७ ऑगस्ट रोजी शुक्र वक्री चलनाने सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

वक्री अवस्थेत अस्तंगत होणे आणि अस्त अवस्थेत वक्री चलनाने शुक्राचा कर्क राशीत प्रवेश होणे विशेष मानले गेले आहे. वक्री असलेला शुक्र ०३ ऑगस्ट रोजी अस्त होत आहे. शुक्र अस्तंगत अवस्थेत सुमारे १५ दिवस राहील. यानंतर १८ ऑगस्ट रोजी शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राचा अस्त ५ राशींना उत्तम लाभ, अनेकविध संधी मिळू शकतात. तर ७ राशींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. करिअरमध्ये अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणाशीही जपून व्यवहार करा. प्रेमाच्या बाबतीतही फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील संबंध बिघडू शकतात.

वृषभ: शुभ प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. पण तरीही आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. पैसे बचतीवर भर द्यावा. कालांतराने आर्थिक संकट दूर होऊ शकेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. वडिलांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. करिअरच्या बाबतीत चांगल्या संधी मिळतील.

मिथुन: अनेक चढ-उतार येऊ शकतात. करिअर आणि लव्ह लाईफ या दोन्हीसाठी हा काळ अनुकूल नाही. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणाच्याही समोर आपल्या भावना व्यक्त करणे टाळा.

कर्क: शुभ प्रभाव वाढू शकतो. आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. व्यक्तिमत्व अधिक सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आर्थिक लाभामुळे कोषवृद्धी वाढेल. योजना यशस्वी होतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध पूर्वीपेक्षा अधिक सुधारतील. कौटुंबिक बाबींमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागेल.

सिंह: शुभ परिणाम प्राप्त होतील. व्यावसायिक जीवन सुधारेल. खर्चात वाढले तरी उत्पन्नही वाढेल. भावंडांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलात तर त्यात यश मिळेल. खूप धावपळही करावी लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या: वैयक्तिक जीवनात समस्या वाढू शकतील. नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये अनेक चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल नाही. कुटुंबातील काही जवळच्या लोकांशी संबंधही प्रभावित होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही कारणाने अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

तूळ: आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अनेक प्रकारचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. विनाकारण समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सुख-शांतता भंग पावू शकते. जोडीदारासोबतचे नाते बिघडू शकते.

वृश्चिक: शुभ प्रभाव वाढतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. कमाईतील काही बचत सुरू कराल. भौतिक सुख-सुविधा वाढतील. प्रेम आणि आकर्षणाकडे वाटचाल कराल. चांगला जोडीदार मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. जोडीदाराला भेटवस्तू देण्याबाबत विचार होऊ शकतो.

धनु: शत्रू नुकसान करू शकतात. ऑफिसमधील सहकारी काही कारस्थान करू शकतात. पैशाची चणचण जाणवू शकते. काही महत्त्वाची कामंही अडकू शकतात. इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मनात निराशेची भावना वाढू शकते. कुटुंब आणि सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात. विचारपूर्वक बोला असा सल्ला आहे. कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नका. अन्यथा पैसे बुडू शकतात.

मकर: जीवनातील समस्या वाढू शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात काही समस्या वाढू शकतात. मित्रांशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात अशांतता वाढू शकते. नोकरदारांनी थोडे सावध राहून काम करावे. अन्यथा बॉससोबतचे संबंध बिघडू शकतात.

कुंभ: आर्थिक अडचणी वाढू शकतात. घरातील कोणीतरी आजारी पडू शकते. खूप धावपळ करावी लागू शकते. पैसेही भरपूर खर्च होतील. पैशाच्या बाबतीत एखाद्यावर अवलंबून राहणे खूप महागात पडू शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन: शिक्षण आणि प्रेम प्रकरणांमध्ये कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक तणाव असू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील होते, त्यांच्यासाठी अडथळे येऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो. नुकसान होऊ शकते. समस्या वाढू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.