१०० ग्रहणांचे पुण्य, दुर्लभ वारुणी योग: ७ राशींवर लक्ष्मी कृपा, भाग्योदय भरभराट; भरघोस लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:09 IST2025-03-27T08:57:54+5:302025-03-27T09:09:23+5:30

Varuni Yoga 27 march 2025: गुरुवारी अतिशय दुर्मिळ, दुर्लभ आणि शुभ पुण्य लाभदायी वारुणी योग जुळून आला आहे. वारुणी योग म्हणजे काय? तो कधी जुळून येतो? कोणत्या राशींना सर्वोत्तम फलकारक ठरू शकेल? जाणून घ्या...

२७ मार्च २०२५ रोजी दुर्मिळ, दुर्लभ, अद्भूत असा वारुणी योग जुळून आला आहे. त्रयोदशी तिथी आणि शततारका नक्षत्र यांच्या योगाने वारुणी योग जुळून येतो. म्हणजेच त्रयोदशी तिथीला शततारका नक्षत्र असेल, तर तेव्हा वारुणी योग असतो. २७ मार्च रोजी सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत हा योग असणार आहे.

वारुणी योग अतिशय शुभ आणि सर्वोत्तम फले देणारा योग मानला जातो. काही मान्यता आणि दाव्यांनुसार, १०० ग्रहणांचे पुण्य देणारा हा योग असतो. वारुणी योग नेहमी येणारा योग नाही. त्यामुळे याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. या दिवशी वरुण देवतेचे पूजन केले जाते. वारुणी योग गुरुवारी जुळून येणे हाही एक विशेष योग आहे. शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे.

आताच्या घडीला राहु मीन राशीत विराजमान आहे. याच राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि नेपच्युन असे ग्रह आहे. या सर्व ग्रहांसोबत आणि कन्या राशीतील केतुसोबत राहुचे विशेष योग जुळून येत आहे. या दुर्मिळ, दुर्लभ योगाचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, पुण्य मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: आवडत्या छंदासाठी वेळ मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ, पैसा खर्च कराल. कानावर एखादी चांगली बातमी पडेल. मन आनंदून जाईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शनिवारी कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करू नका.

वृषभ: वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. फार घाईघाईत कामे करू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात मान वाढेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. आर्थिक लाभ होईल.

मिथुन: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात मजेत वेळ जाईल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वाहन जपून चालवा. गुरुवारपासून अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, यश प्राप्तीसाठी झटावे लागेल. काही लोक आव्हाने उभी करतील. नातेवाडकांच्या भेटीगाठी होतील.

कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. मात्र, त्यातून दगदग वाढेल. फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. गुरुवार, शुक्रवारी अष्टम स्थानातून होणाऱ्या शनी-चंद्र युतीमुळे फार घाईघाईत कामे करू नका. नियमाप्रमाणे वागण्याची गरज आहे. शनिवारी अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कळतील.

सिंह: काही फायदे तर काही तोटे होतील. एखादी महत्त्वाची बातमी कळेल. भेटीगाठी होतील. लोकांशी बोलून मन मोकळे होईल. प्रलंबित कामे हातावेगळी करण्यासाठी वेळ मिळेल. योजना गुप्त ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आहाराचे पथ्य पाळा. कामाचा ताण घेऊ नका. जीवनसाथीची मर्जी सांभाळा. शनिवारी अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. मात्र, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

कन्या: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. मात्र, गुरुवार, शुक्रवार थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. एखाद्या भरवशाच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होईल. सुरुवातीला कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नवीन संधीची चाहूल लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. व्यवसायात थोडे सतर्क राहा. करारमदार करताना अटी आणि शर्ती नीट वाचून घ्या.

तूळ: नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. मुलांच्या मनात काय चालू आहे, ते समजून घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. शनिवारी दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक: प्रयत्नांना यश येईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. घरात एखाद्या सदस्याशी गैरसमज होऊ शकतात. जीवनसाथीशी सूर जुळतील. शनिवारी एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मानसन्मान प्राप्त होईल. मुलांची प्रगती होईल.

धनु: ठरविलेले काम यशस्वीपणे पूर्ण कराल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास सर्वच क्षेत्रात यश मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. मोठी गुंतवणूक करताना गुरुवार, शुक्रवार थोडे सावध राहा. जवळचा प्रवास होईल. प्रवासात सतर्क राहा. नोकरीत शनिवारी चांगली बातमी कळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

मकर: थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे अति स्पष्टवक्तेपणा नको. शनिवारी मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.

कुंभ: एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. समाजात मान वाढेल. भेटीगाठी फलद्रूप होतील. नवीन ओळखी होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. काहींना धनलाभ होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल.

मीन: साधकबाधक अनुभव येतील. अनपेक्षितपणे चांगल्या संधी मिळतील. नोकरीत नवीन बदलाची चाहूल लागेल. कामाची दखल घेतली जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यानिमित्त घरात चहलपहल राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. गुरुवार, शुक्रवार बरेच परिश्रम करावे लागेल. लोकांशी गोड बोलून कामे करून घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.