Vastu Tips For Main Door: बर्बादी! घराचा दरवाजा पूर्वेला असूनही चालत नाही, पै-पैसाठी तरसाल, जाणून घ्या दिशांचे अर्धसत्य... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 12:49 PM 2022-08-21T12:49:19+5:30 2022-08-21T12:56:41+5:30
Vastu Tips For Main Door: तर घराची दक्षिण दिशादेखील पूर्वपेक्षा बरकत देईल. पूर्व एवढे नुकसान करेल की, पै पै कमविण्यासाठी तरसत रहाल.... घराचा मुख्य दरवाजा हे त्या कुटुंबाच्या यशा अपयशाचे कारण ठरतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. मात्र, हा दरवाजा केवळ शुभ दिशेला असून चालत नाही. शुभ दिशेला असला तरी देखील ते कुटुंब बर्बाद होण्याची शक्यता असते. पै-पैसाठी तरसू शकते. असे कसे घडू शकते, जाणून घ्या...
दरवाजा नेहमी दक्षिण दिशा सोडून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि इतर उपदिशांकडे असावा असे सांगितले जाते. परंतू ते अर्धसत्य आहे. तुम्ही घरात येता ती दरवाजाची दिशा नसून तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमचा चेहरा ज्या दिशेला असतो ती तुमच्या दाराची दिशा असते. सर्वात चांगली दिशा म्हणजे पूर्व असते. म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहाल घरांचे दरवाजे हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असतात.
पण पूर्वेला दरवाजा असला म्हणून तुमचे घर वास्तुशास्त्रात फिट बसते का? नाही. पूर्व ही जरी शुभ दिशा असली तरी तुमच्या घराचा दरवाजा त्या दिशेला असेल तर ती फायद्याची ठरेल असे नाही. तुमच्या ग्रहांवर ती दिशा शुभ की अशुभ ते ठरते. जर तो ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असेल तर घराचा मुख्य दरवाजा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो, अन्यथा जीवनात अनावश्यक समस्या सुरू होतात.
पूर्व - घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते. पण जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर या दरवाजामुळे घरावर कर्जाचा बोजा वाढू लागतो. यामुळे अख्खे कुटुंब पै-पै साठी तरसू शकते. बरबादीचे हे मुख्य कारण असू शकते, म्हणून घर खरेदी करताना किंवा बांधताना आधी आपल्या कुंडल्यांचा अभ्यास करून घ्यावा. त्यानंतर तुमच्यासाठी योग्य दिशा कोणती हे ठरवावे.
पश्चिम - घराचा मुख्य दरवाजा जर पश्चिम दिशेला असेल तर ते धन आणि संपत्तीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जाते. पण जर कुंडलीत बुध ठीक नसेल तर यामुळे घरात पैसा राहत नाही. परंतू तुम्हाला दक्षिण दिशा देखील भरभराट देऊ शकते. दक्षिण दिशेला दरवाजा असू नये, ती यमाची दिशा असे सांगितले जाते. पण तुमची कुंडली पाहिली का?
दक्षिण दिशादेखील बरकत देईल घरातील सर्व समृद्धी संपते. घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर साधारणपणे हा दरवाजा जीवनात संघर्ष वाढवतो. पण कुंडलीत शनि-मंगळाची स्थिती योग्य असेल तर या दरवाजातून घरात सुख-समृद्धी प्रवेश करते.
इशान्य - वायव्य... घराचा मुख्य दरवाजा ईशान्य दिशेला असेल तर नक्कीच शुभ फळ मिळते. पण जर कुंडलीत गुरुची स्थिती ठीक नसेल तर यातून गंभीर आजार घरात प्रवेश करतात. घराचा मुख्य दरवाजा जर वायव्य दिशेला असेल तर साधारणतः शुभ फल मिळते. पण कुंडलीत शनि जर त्रासदायक असेल तर मित्रही शत्रू होतात. विशेषत: शेजाऱ्यांशी वाद.
घराचा मुख्य दरवाजा कसा ठेवावा? घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. या दरवाजावर आंब्याच्या पानांचा हार असावा. पूजा करावी. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस गणपती बाप्पाचे चित्र लावावे. मुख्य प्रवेशद्वारावर डाळिंब आणि शमीचे रोप लावा. यामुळे घराचा मुख्य दरवाजा शुभ राहतो.