Vastu Tips For Main Gate : खिशात पैसा टिकत नाही?, मुख्य दरवाज्यासमोर हे उपाय लगेच करा, होईल फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 03:20 PM 2022-07-24T15:20:06+5:30 2022-07-24T15:27:46+5:30
Vastu Tips For Main Gate : कोणत्याही घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, केवळ सुरक्षेच्या दृष्टीनेच नाही तर वास्तूनुसार मुख्य दरवाजा माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. Vastu Tips For Main Gate : कुटुंबात सुख-समृद्धी टिकावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूमध्ये सांगितलेले हे उपाय खूप सोपे आणि फायदेशीर आहेत. वास्तूमध्ये घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व सांगितले जाते. याद्वारे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
त्यामुळे मुख्य दरवाजा वास्तुदोषांपासून मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा तुम्ही पाहिले असेल की अधिक पैसा कमावूनही तो आपल्या हाती टिकत नाही. यापाठी काही वास्तू दोषही असू शकतो. वास्तूमध्ये मुख्य दरवाजाबाबत असे काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वास्तुदोष असेल तर घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची फोटोफ्रेम किंवा चित्र लावावे. असे केल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करू शकत नाही. यासोबतच प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
ज्योतिषशास्त्रात शमीची वनस्पती शनिदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर शमीची वनस्पती लावा आणि त्यात रोज पाणी घाला. असे केल्याने वाईट वेळ निघून जाते अशी धारणा आहे. तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही. शमीच्या झाडात पाणी टाकल्याने व्यक्तीचे गुडलक वाढते आणि कुटुंबात बरकत कायम राहते.
वास्तूनुसार तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ असे लिहावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पायांचे चित्र लावल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात समृद्धी येते असे म्हटले जाते. तसेच मुख्य दरवाज्यावर लाल स्वस्तिक बनवणे देखील शुभ मानले जाते.
वेगवेगळ्या धातूंच्या सूर्यदेवाच्या मूर्ती तुम्हाला बाजारात सहज मिळतील. सूर्याची तांब्याची मूर्ती मुख्य दरवाज्याच्या वर ठेवा आणि येताना सुख-समृद्धीसाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा. असे केल्याने व्यक्तीच्या ग्रहांचे दोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. असे केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते.