Numerology: शुक्र-शनीची युती: ‘या’ ७ मूलांकांना फायदा, शुभ-लाभ; उत्तमोत्तम संधी, दिलासादायक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:07 AM2023-01-23T07:07:07+5:302023-01-23T07:07:07+5:30

Numerology: शुक्र-शनी युतीचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात नवग्रहांचे महत्त्वाचे चलनबदल, राशीपरिवर्तन होत आहे. मंगळ, बुध, सूर्य, शनीनंतर आता याच क्रमात शुक्र ग्रहाचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश होत आहे. (venus and saturn conjunction 2023 numerology)

कुंभ राशीत आताच्या घडीला शनी विराजमान आहे. शुक्रही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शुक्र-शनीची युती कुंभ राशीत झाली आहे. शुक्र आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. राशींप्रमाणे शुक्रच्या कुंभ प्रवेशाचा मूलांकांवरही प्रभाव असणार आहे. (shani and shukra yuti 2023 ankshastra)

ज्योतिषशास्त्राची एक शाखा असलेल्या अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ चा स्वामी शुक्र आहे. काही मूलांकांना शुक्रचा कुंभ प्रवेश उत्तम ठरेल, तर काही मूलांकांना काहीसा संमिश्र ठरू शकेल. आगामी काळ कोणत्या मूलांकासाठी कसा असेल? ते जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. जनसंपर्कात भर पडेल. मित्रांच्या संख्येत वाढ होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीकडून मोठी संधी मिळू शकेल. एखादा वाद संवादातून सोडवणे उपयुक्त ठरू शकेल. करिअरमध्ये गांभीर्याने काम करावे. विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. रचनात्मकता आणि सर्जनशीलता वाढू शकेल. नवीन दृष्टिकोन मिळेल. मेहनतीचा भरपूर फायदा मिळू शकेल. हाती घेतलेल्या कामांत यश मिळू शकेल. कॉस्मॅटिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक काळ ठरू शकेल. नफा होऊ शकेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष कमी राहू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांकाच्या व्यक्ती आपल्या कार्यक्षमतेचा पूरेपूर वापर करू शकतील. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. कुशलतेने घेतलेल्या निर्णयांमुळे व्यापारी, व्यवसायिकांना फायदा होऊ शकेल. महत्त्वाच्या कामाचा प्रारंभ होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आगामी काळ आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकेल. व्यवहारकुशलतेने अडचणींवर मात करू शकाल. सकारात्मक ऊर्जेमुळे हाती घेतलेल्या काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. व्यापारी, व्यवसायिकांसाठी आगामी काळ लाभदायक ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकाच्या व्यक्तींसाठी हा काळ दिलासादायक ठरू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मात्र, त्यातून लवकरच सुटकाही होऊ शकेल. यश, प्रगती होऊ शकेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यास अनुकूल काळ. व्यापारी, व्यवसायिकांना काही ना काही लाभ होण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना शुक्राचा कुंभ प्रवेश सुखकारक ठरू शकेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण आगामी काळात होऊ शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहू शकेल. मित्रांसोबत चांगला काळ घालवू शकाल. हाती घेतलेल्या काम सक्षमपणे यशस्वी करू शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलाकांना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. चंचलतेमुळे कामात अडचणी येऊ शकतात. नोकरदारांना वरिष्ठांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकेल. भावनिक होऊन आणि आवेशात निर्णय घेणे टाळावे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात पूर्ण विचार करूनच करावी. मेहनत वाढवावी लागेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलांकाना आगामी काळ दिलासादायक ठरू शकेल. सुखकारक घटना घडू शकतील. आत्मविश्वास वाढू शकेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. कुटुंबातील सदस्यांची मदत मोलाची ठरू शकेल. अडचणी दूर होऊ शकतील. इच्छाशक्तीच्या जोरावर हाती घेतलेले काम पूर्ण करू शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. बोलण्यावर आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरेल. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. दाम्पत्य जीवनात तक्रारींचा सूर असू शकतो. काही घटनांमुळे मन खिन्न होऊ शकेल. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.