शुक्र-मंगळ युती: ‘या’ ५ राशींना उत्तम यश, बिझनेस-करिअरमध्ये प्रगती; धनलाभाचे शुभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 01:22 PM2023-05-20T13:22:26+5:302023-05-20T13:28:59+5:30

कर्क राशीतील प्रवेशानंतर होत असलेली शुक्र-मंगळ युती कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमधील सर्व ग्रह ठरलेल्या कालावधी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांच्या भ्रमणामुळे काही ग्रह वक्री, अस्तंगत होतात. कालांतराने तेच मार्गी आणि उदय होतात. मे महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र दुसऱ्यांना राशीपरिवर्तन करणार असून, मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

आताच्या घडीला मिथुन राशीत असलेला शुक्र ग्रह ३० मे रोजी चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत सध्या नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह विराजमान आहे. शुक्राच्या प्रवेशानंतर कर्क राशीत मंगळ आणि शुक्राची युती होईल. ०६ जुलैपर्यंत शुक्र कर्क राशीत असेल.

मंगळ ग्रह ३० जून रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे शुक्र आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा सुमारे महिनाभर लाभ काही राशीच्या व्यक्तींना होऊ शकेल. हे संक्रमण ५ राशींसाठी विशेष मानले जात आहे. पैसा, करिअर आणि बिझनेसच्या बाबतीत विशेष फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्र-मंगळ युती सुखकारक ठरू शकेल. कुटुंबात सुख-शांतता वाढू शकेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यावर भर द्याल. मनोरंजनाची नवीन साधने मिळतील. करिअरमध्ये प्रगती करू शकाल. नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. प्रमोशनची शक्यता निर्माण होऊ शकेल. चुकीचे निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्र-मंगळ युती लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. कौटुंबिक आनंद मिळू शकेल. बिझनेसमध्ये भागीदारासोबतचे संबंध सुधारू शकतील. नवीन व्यवसाय हाती घेण्याचा विचार करू शकता. वडिलोपार्जित व्यवसायाशी निगडीत असलेल्यांसाठी हा लाभाचा काळ आहे. समाजात सन्मान वाढेल. नोकरीमध्ये जे काही काम हातात घ्याल, त्यात नशिबाची साथ मिळू शकेल. यश मिळेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्र-मंगळ युती शुभ परिणामकारक ठरू शकेल. व्यक्तिमत्व सुधारू शकेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होऊ शकेल. कामाच्या ठिकाणीही बोलण्याकडे लक्ष दिले जाईल. कामगिरीचे कौतुक होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध दृढ होऊ शकतील. भविष्यात त्याचा फायदा होऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्र-मंगळ युती इच्छापूर्तीची ठरू शकेल. आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकाल. करिअरमध्ये प्रगती करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टीने चांगला काळ असेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. लोक तुमच्या सल्ल्यानुसार काम करतील. मित्रही मदत करू शकतील.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्र-मंगळ युती प्रगतीकारक ठरू शकेल. जीवनात शुभ प्रभाव वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. जोडीदारासोबत जवळीक वाढू शकेल. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळू शकतील. मित्रांसोबत संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहू शकतील. जे व्यवसाय करत आहेत, त्यांच्या कामात वेगाने प्रगती होऊ शकेल. चांगले परिणाम मिळू शकतील.

शुक्र गोचराचा राशींसह देश-दुनियेवरही प्रभाव पडू शकेल, असे म्हटले जात आहे. आगामी काळात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.