मिथुन राशीत लक्ष्मी-नारायण योग: शुक्र गोचर ‘या’ ५ राशींना अत्यंत शुभ; खास लाभांचा काळ By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:06 AM 2022-07-10T10:06:08+5:30 2022-07-10T10:12:24+5:30
venus mercury conjunction mahalaxmi narayan yoga gemini 2022: या अद्भूत योगामुळे काही राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायणाच्या शुभाशिर्वादामुळे उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतील. जाणून घ्या... जुलै महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून उत्तम मानला गेला आहे. जुलै महिन्यात ५ महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार आहेत. मात्र, बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणारा महालक्ष्मी योग अतिशय शुभ मानला गेला आहे. (venus and mercury conjunction in gemini 2022)
१२ जुलै रोजी शुक्र आपलेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह सुख, वैभव, भोग आणि विलासी जीवन यांचा कारक मानला गेला आहे. शुक्राचे मिथुन असणे उत्तम मानले गेले आहे. (mahalaxmi yoga 2022)
दुसरीकडे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे. मात्र, बुधचे मिथुन राशीत असणे हे सकारात्मक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह भाषण, संवाद, बुद्धिमत्ता, तर्क क्षमता आणि व्यवसाय यांचा कारक मानला गेला आहे.
मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात. या महालक्ष्मी योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान मानले गेले आहे. (lakshmi narayan yoga 2022)
ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते, अशी मान्यता आहे. काही राशीच्या लोकांना बुध-शुक्र ग्रहांच्या संयोगाने तयार झालेल्या महालक्ष्मी-नारायण योगाचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींना ही युती उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
मिथुन राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायण योगाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकेल. या काळात लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहू शकेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. परदेशी कंपन्यांसोबत व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक आहे. तुम्हाला प्रवासात चांगले लाभ होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. शक्य असल्यास दर शुक्रवारी ओम शुक्राय नमः बीज मंत्राचा जप करावा.
सिंह राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायण योगाचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. तुमच्या करिअरमध्ये या काळात तुम्हाला परदेशात जाण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही ज्या मेहनतीने काम कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. विद्यमान नोकरीत समाधान मिळू शकेल. तुम्ही तुमच्या कामगिरीने वरिष्ठांना प्रभावित करू शकाल.
तूळ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायण योग भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाच्या मदतीने तुमची प्रगती होऊ शकेल. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही साध्य कराल. तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुम्हाला यश मिळेल. या काळात अध्यात्माची आवड वाढेल. मित्र, आप्तेष्टांसह सहलीचे नियोजन करू शकता. तुम्हाला करिअरमध्ये बढती मिळू शकते आणि तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकेल.
धनु राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायण योग उत्तम ठरू शकेल. विवाहेच्छुकांसाठी नवीन स्थळे येऊ शकतात. जोडीदारासोबत नवीन काम सुरू करू शकता. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी तुम्हाला तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी पुरेशा संधी मिळतील. एखाद्या विशिष्ट व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना यावेळी पदोन्नतीची संधी मिळू शकते. नोकरदारांना त्यांच्या कामाचे बक्षीस मिळू शकते.
कुंभ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी-नारायण योग अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या बाबतीतही तुम्हाला समाधान मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाने खूप प्रभावित होतील. तुमच्या मुलांच्या कामगिरीचा तुम्हाला अभिमान वाटेल. उत्पन्न वाढेल आणि अधिक नफा मिळू शकेल. शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्हाला विशेष फायदा अपेक्षित आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी हा सुवर्णकाळ असू शकतो.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.