वर्षाखेरीस शुक्राचा मकर प्रवेश: ‘या’ ६ राशींना २०२३ च्या सुरुवातीला लाभच लाभ; अमाप फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:30 AM2022-12-28T11:30:36+5:302022-12-28T11:39:44+5:30

मकर राशीतील शुक्र आणि शनीच्या युतीने २०२२ वर्षाची सांगता आणि २०२३ ची सुरुवात कोणत्या राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या...

सन २०२२ ची सांगता होत आहे. नवीन २०२३ वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जग तयारीत आहे. सन २०२२ वर्ष संपत असतानाही काही राशींना चांगले लाभ होणार आहेत. शुक्र ग्रह वृश्चिक राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. आताच्या घडीला मकर राशीत शनी विराजमान आहे, त्यामुळे शुक्र आणि शनीचा युती-योग काही राशींसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. (venus transit capricorn 2022)

शुक्र ग्रह २९ डिसेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करत आहे. २२ जानेवारी २०२३ पर्यंत शुक्र याच राशीत असेल. यासोबतच मकर राशीत शनी आणि शुक्राची युती होणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (shukra gochar in makar rashi 2022)

शुक्र आणि शनीच्या युतीचा मेष ते मीनपर्यंत सर्व राशींवर प्रभाव पडेल. शुक्राचे हे गोचर ६ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सन २०२३ वर्षाच्या सुरुवातीच्या काळात नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना जबरदस्त लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया... (shukra shani yuti in 2022)

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकेल. सामाजिक प्रभाव वाढू शकेल. काही नवीन संपर्क वाढू शकतील. व्यावसायाच्या निमित्ताने या काळात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरू शकतो. व्यापारी वर्गासाठी शुक्र गोचर खूप फायदेशीर ठरू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा मकर प्रवेश संधी घेऊन येणारा ठरू शकेल. आगामी काळात पुढे जाण्याची संधी मिळेल. परदेशात जाण्याचे योग जुळून येऊ शकतील. व्यापारी या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. जोडीदारासोबत अधिक वाद होऊ शकतात. जोडीदाराला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदारांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गातील लोकांनाही या काळात चांगला फायदा होण्याची शक्यता धुसर आहे. खर्चही वाढू शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. मात्र, नफा होण्याची शक्यता धुसर आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कामावर लक्ष केंद्रीत करावे. कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश काहीसा अनुकूल ठरू शकेल. कामानिमित्त काही प्रवास करावे लागतील. सध्या तरी व्यापारी वर्गातील लोकांनाही फारसा फायदा होणार नाही. मात्र, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवलात तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. यातून चांगले पैसे मिळू शकतील. लव्ह लाईफ चांगली जाऊ शकेल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवू शकाल. आगामी काळात आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश चांगला ठरू शकेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गातील लोकांनाही खूप चांगले परिणाम मिळतील. आगामी काळ वैयक्तिक जीवनासाठीही अनुकूल असणार आहे. आगामी काळात आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. तुमच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम करेल. कामाच्या ठिकाणी वातावरण खूप व्यस्त असणार आहे. नोकरी बदलण्याचा निर्णयही घेऊ शकता. व्यवसायिकांना नफा मिळविण्यासाठी काही बदल करावे लागतील. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार वर्गावर खूप दबाव असेल. तुमचे वैयक्तिक आयुष्यही खूप प्रभावित होऊ शकेल. जोडीदाराशी मतभेद, वादाचे प्रसंग उद्भवू शकतील.

शुक्र मकर राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शनी विराजमान आहे. शुक्र गोचर तुमच्या करिअरसाठी खूप शुभ ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरेल. यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. कामाच्या संदर्भात केलेले प्रवास फलदायी ठरतील. जर स्वतःचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला त्यात फायदा होऊ शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कामात असमाधानी असल्याने तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यापारी वर्गातील लोकांनाही यावेळी अपेक्षित नफा मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आगामी काळात सर्व मनोकामना पूर्ण होतील. एवढेच नाही तर या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम कराल. जे लोक भागीदारीत काम करतात, त्यांचे जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.