शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:00 PM2024-07-09T12:00:24+5:302024-07-09T12:13:17+5:30

शुक्र ग्रहाचे गोचर कोणत्या राशींसाठी अनुकूल, सकारात्मक प्रभावाचे ठरू शकेल? कोणत्या राशींना धनलाभ होऊ शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्यात होत असलेले ग्रहांचे गोचर महत्त्वाचे ठरणारे आहे. यामुळे अनेक योग जुळून येत आहे. नवग्रहांपैकी एक प्रभावी मानल्या गेलेल्या शुक्राचे गोचर होत आहे. कर्क राशीत होत असलेले शुक्राचे गोचर महत्त्वाचे मानले जात आहे.

०७ जुलै रोजी शुक्र कर्क राशीत विराजमान झाला आहे. ३१ जुलैपर्यंत शुक्र कर्क राशीत असेल, त्यानंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राचे स्वामित्व असलेली रास आहे. शुक्राचे गोचराचे सर्व १२ राशींवर अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही प्रभाव दिसून येऊ शकतात.

सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि विलासी जीवन यांचा कारक शुक्र ग्रह मानला गेला आहे. शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण कोणत्या राशींना अत्यंत शुभ, लाभदायक, पुण्य फलदायी ठरू शकते, ते जाणून घेऊया...

मेष: शुक्राचा प्रभाव उत्कृष्ट राहू शकेल. विशेषत: जमीन, मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मिटण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर हा सर्वोत्तम काळ ठरू शकतो.

वृषभ: कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद वाढेल. धर्म आणि अध्यात्माची आवड वृद्धिंगत होऊ शकेल. धार्मिक कार्य आणि अनाथाश्रम, दान इत्यादींमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकाल.

मिथुन: शुक्राचा प्रभाव उत्तम यश देऊ शकेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. भौतिक सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे.

कर्क: परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

सिंह: शुक्राच्या प्रभावामुळे देशभ्रमणाचा लाभ मिळू शकेल. तसेच चैनीच्या वस्तूंचा आनंदही मिळेल.

कन्या: शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संबंध दृढ होतील.

तूळ: पद आणि मान-सन्मानात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल; ते तुम्हाला संयुक्त व्यवसाय करण्यास मदत करण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: वैवाहिक जीवनात नाते दृढ होऊ शकेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होऊ शकतील. वातावरण प्रसन्न राहील. आगामी काळ सर्व प्रकारे अनुकूल राहू शकेल.

धनु: आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.

मकर: इच्छा पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.

कुंभ: शुक्राचे गोचर वरदानापेक्षा कमी नाही. सन्मान आणि संपत्तीत वाढ होईल.

मीन: शुक्राचे गोचर अनुकूल ठरू शकेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.