शुक्राचे गोचर: ‘या’ ९ राशींवर शुभ प्रभाव, धनवृद्धीचे योग; कोणत्या राशींना संमिश्र काळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:07 AM2023-05-03T07:07:07+5:302023-05-03T07:07:07+5:30

या एकाच महिन्यात शुक्र दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. पहिले शुक्र गोचर तुमच्यासाठी कसे ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्यात बड्या आणि महत्त्वाच्या ग्रहांचे गोचर होणार आहे. या मालिकेत पहिले राशीपरिवर्तन शुक्र ग्रहाचे होणार आहे. वृषभ या स्वराशीतून शुक्र ग्रह मिथुन राशीत विराजमान झाला आहे. मिथुन राशीत विराजमान असलेल्या मंगळाशी शुक्राचा युती योग जुळून येऊ शकेल. विशेष म्हणजे शुक्र या एकाच महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. (venus transit in gemini may 2023)

शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. मे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र मिथुन राशीत विराजमान झाल्यानंतर याच महिन्याच्या अखेरीस शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा मिथुन प्रवेश विशेष मानला जात आहे. (shukra gochar in mithun rashi 2023)

शुक्राच्या मिथुन राशीतील प्रवेशाचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो. करिअर, नोकरी, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडी यांवर शुक्राचा प्रवेश प्रभाव पाडू शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र, कोणत्या राशींना शुक्राचा मिथुन प्रवेश प्रतिकूल, संमिश्र कालावधीचा ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर शुभ प्रभावाचे ठरू शकेल. मित्रांसोबत मजा-मस्ती करण्याची संधी मिळू शकेल. लव्ह लाइफ छान असू शकेल. मे महिन्यात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. जीवनाच्या अन्य क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. भावंडांशी नाते दृढ होऊ शकेल. व्यवसायाच्या दृष्टीनेही काळ खूप चांगला जाू शकेल. छोट्या प्रवासात फायदा होऊ शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर शुभ प्रभावाचे ठरू शकेल. जीवनात अनुकूल आणि शुभ परिणाम मिळू शकतील. बँक बॅलन्स चांगला राहू शकेल. कौटुंबिक जीवनातही शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. नोकरीत सकारात्मक परिणाम मिळू शकतील. नवीन संधी मिळू शकतील. लोकांच्या मनावर तुमच्या शब्दांचा प्रभाव पडू शकेल.

मिथुन राशीत शुक्राचे आगमन झाले आहे. या राशीत मंगळही विराजमान आहे. या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर सकारात्मक ठरू शकेल. व्यक्तिमत्त्वात अनुकूल बदल पाहाया मिळू शकतात. या कालावधी नवीन मालमत्तेचा सौदा ठरू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातही प्रगतीची संधी मिळेल. या काळात तुमचा स्वतःवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर संमिश्र ठरू शकेल. खर्च अचानक वाढू शकतात. सर्व बचत खर्ची पडू शकते. सुखसोयी वाढवण्यासाठी भरपूर खर्च होऊ शकतो. काही नवीन गोष्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकता. खर्चासोबतच तुमच्यासाठी फायद्याचीही शक्यता आहे. काही शुभ योग जुळून येऊ शकतात.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर लाभदायक ठरू शकेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश होऊ शकतील. या काळात उत्तम प्रकारे कामे पूर्ण करू शकाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मुलांकडून काही चांगली बातमीही ऐकायला मिळू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर शुभ प्रभावाचे ठरू शकेल. आयुष्यात सुख-सुविधा वाढू शकतील. नवीन योजनांतून पैसे मिळू शकतील. देवाच्या कृपेने सर्व काही चांगले होऊ शकेल. आवडीच्या कोणत्याही ठिकाणी बदली करता येऊ शकेल. व्‍यापार, व्‍यवसाय करणार्‍यांसाठी शुक्राचे हे संक्रमण खूप शुभ ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर लाभदायक ठरू शकेल. धनलाभ होण्याचे योग जुळून येऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतात. अडकलेले पैसेही मिळू शकतात. लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरू शकेल. समाजात सन्मान वाढू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर काहीसा संमिश्र ठरू शकेल. जीवनात काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, याकडे लक्ष देणे हिताचे ठरू शकेल. आर्थिक बाबतीत हे संक्रमण शुभ राहू शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. काही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर शुभ प्रभावाचे ठरू शकेल. जोडीदारासोबत खरेदीला जाऊ शकाल. जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. कुठेतरी बाहेर फिरण्याची योजना बनवू शकता. काही कारणाने जोडीदाराशी वाद होऊ शकतो. निरुपयोगी गोष्टींवर वाद घालणे टाळणे चांगले. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा कालावधी अनुकूल परिणाम देऊ शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. आरोग्याच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. चांगला आणि पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर पाण्याचे सेवन करावे. दरम्यान, खर्चात वाढ होऊ शकते. बजेट विस्कळीत होऊ शकते. नोकरीच्या संदर्भात चांगले प्रस्ताव येऊ शकतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर अनुकूल ठरू शकेल. जोडीदारासोबत सुरू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. फिरायला जाण्याच्या योजना आखू शकाल. गुरूंकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांच्याकडून योग्य ज्ञान मिळेल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी बदलायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर सकारात्मक ठरू शकेल. नवीन वाहन खरेदीची चर्चा होऊ शकते. घरात एखादी मोठी वस्तू आल्याने फायदा होईल. भावंडांकडून आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळू शकेल. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरू शकेल. मित्रांकडून पूर्ण मदत मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.