शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 12:54 PM2024-12-12T12:54:15+5:302024-12-12T13:03:39+5:30

शुक्राचे राशीपरिवर्तन आणि शनीसोबतचा युती योग कोणत्या राशींना शुभ ठरू शकेल? २०२५ या नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

डिसेंबर महिन्यात शुक्र दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र मकर राशीत विराजमान झाला होता. आता डिसेंबर महिन्याच्या सांगतेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी आहे.

शुक्र हा धन-वैभव, सुख-समृद्धी कारक मानला जातो. २८ डिसेंबर रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. २८ जानेवारी २०२५ पर्यंत या राशीत राहील. शुक्राच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर शुक्र आणि शनी यांचा युती योग जुळून येऊ शकेल. २०२४ या वर्षाची सांगता होताना हा योग जुळून येत असल्यामुळे आगामी नवीन वर्ष २०२५ अनेक राशींसाठी शुभ-लाभाचे ठरू शकते, असे सांगितले जाते.

शुक्राचे कुंभ राशीतील गोचर आणि शनी सोबतचा युती योग काही राशींना फायदेशीर ठरू शकतो. प्रगती, पैसा आणि आनंद, संधी, यश मिळू शकते. नोकरी, कुटुंब, आर्थिक आघाडीवर शुक्र आणि शनी अपार अनुकूलता देऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योग वरदानासारखा ठरू शकेल. कमाई वाढू शकेल. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. आर्थिक फायदा होऊ शकेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.

वृषभ: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योगाचा फायदा होऊ शकेल. नोकरदारांना नोकरीत बढती आणि नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक चणचण संपून स्थिती मजबूत होऊ शकेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. अनेक बाबतीत दिलासा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एखाद्या चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

कर्क: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योगाने अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली येणी परत मिळवण्यात यश मिळू शकेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला आहे. जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायात काही कारणास्तव व्यत्यय आणि अडचणी येऊ शकतात. नवीन संधी मिळू शकतात. नवीन योजना किंवा नवीन काम होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

सिंह: मेहनतीचे आणि समर्पणाचे पूर्ण फळ मिळू शकते. नोकरदार लोकांना बंपर फायदे मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून नफा कमवू शकता. खूप दिवसांपासून रखडलेले पैसे किंवा काम पुन्हा सुरू होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.

तूळ: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योगाने अनेक चांगल्या संधी मिळतील. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मन शांत राहील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल. नोकरीत प्रगती होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे.

मकर: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योग लाभदायक ठरू शकेल. नवे वर्ष जीवन आनंदाने भरलेले असेल. परदेशातून चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल. घर किंवा मालमत्ता खरेदी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि उत्पन्न वाढीचे योग आहेत. नवीन वर्षांत अनेक सरप्राईज मिळू शकतात.

कुंभ: सन २०२४ च्या सांगतेला होत असलेले शुक्राचे गोचर आणि शनीसोबतचा युती योग भाग्यकारक ठरू शकेल. २०२५ हे वर्ष शुभ ठरू शकेल. दिलासादायक घटना घडू शकतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाची योजना बनू शकते. यश मिळेल. करिअर आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. कामातील सर्व अडथळे दूर होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.