शुक्राचे गोचर: ७ राशींना मालव्य राजयोगाचा लाभ, जोडीदार साथ देईल; मनासारखे घडेल, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:17 AM2023-12-01T10:17:41+5:302023-12-01T10:31:13+5:30

शुक्राचे गोचर नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर काही राशींना शुभ लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्याची सांगता होताना नवग्रहातील शुक्र ग्रहाने कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचे तूळ राशीतील गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले गेले आहे. तूळ ही शुक्राची मूलत्रिकोणी रास मानली जाते. या गोचरामुळे मालव्या नावाचा राजयोग जुळून आला आहे.

सुमारे १८ महिन्यानंतर शुक्र तूळ राशीत विराजमान झाला आहे. २४ डिसेंबरपर्यंत शुक्र तूळ राशीत असेल, त्यानंतर शुक्राचे गोचर वृश्चिक राशीत होणार आहे. रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक शुक्र मानला जातो.

शुक्राने तूळ राशीत केलेल्या प्रवेशाचा ७ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक लाभ होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना मालव्य राजयोगाचा फायदा मिळू शकेल, शुक्र गोचराचा मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...

मेष: सामान्य परिणाम देईल. सकारात्मकता मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहाची बोलणी पुढे जाऊ शकतील. चांगली स्थळे मिळू शकतील.

वृषभ: स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. गेल्या अनेक महिन्यांपासून करत असलेल्या मेहनतीचे यथोचित फळ मिळू शकेल. पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे.आरोग्याबाबत गाफील राहू नका. व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी वाद घालणे टाळा.

मिथुन: खूप चांगले परिणाम मिळू शकतील. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील. भागीदार फर्मकडून चांगले परिणाम मिळू शकतात. हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. परदेशाशी संबंधित प्रकरणांमध्ये अनुकूल बातम्या मिळतील. फायदेशीर आणि अनुकूल परिणाम मिळतील.

कर्क: जीवनाच्या अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ, सहकाऱ्यांशी संघर्ष टाळणे आवश्यक आहे. अपेक्षित यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. वाहने किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. तीर्थस्थळांना भेट देऊ शकाल. फायदेशीर परिणाम मिळतील.

सिंह: आगामी काळ लाभदायक ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना या काळात चांगली संधी मिळू शकते. नवीन कौशल्ये विकसित कराल. व्यवसायातही वाढ दिसून येईल. सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्याची अपेक्षा करू शकता. वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील. हा काळ खूप फायदेशीर ठरेल.

कन्या: गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा आनंद घ्याल. दोन्हीमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. परीक्षेला बसलेल्यांना यश मिळेल. फायदेशीर परिणाम मिळतील.

तूळ: वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता दिसून येईल. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणांची अपेक्षा करू शकता. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ खूप चांगला असेल. जुन्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक लाभासोबतच मौल्यवान आणि महागड्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च करू शकता. समाजात प्रतिमा सुधारेल. खर्च वाढतील. शुभ परिणाम देईल.

वृश्चिक: सकारात्मक परिणाम मिळू शकतील. परदेशाशी संबंधित बाबींमध्येचांगले परिणाम मिळतील. परदेशात नोकरीच्या संधींचा लाभ घेऊ शकता. चैनीच्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च होऊ शकतील. जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील. नोकरीत असलेले लोक या काळात पदोन्नती आणि पगारवाढीची अपेक्षा करू शकतात. वरिष्ठांकडून प्रशंसा आणि आदर दोन्ही मिळेल.

धनु: आर्थिक लाभ देईल. विलासी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामगिरीची प्रशंसा होईल. प्रामाणिक प्रयत्नांसाठी वरिष्ठांकडून आणि बॉसकडून बक्षिसे मिळू शकतात. बॉस आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. जोडीदार भावना समजून घेईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन शांत आणि सुसंवादी असेल.

मकर: करिअरच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेक अडथळे येऊ शकतात. कामात केलेल्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. ध्येय साध्य करण्यासाठी आणि टप्पे गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी आणि सहकार्‍यांशी वाद घालणे टाळावे. संबंध या काळात ताणले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तूर्तास घाई करणे टाळावे. वैवाहिक जीवनातही मानसिक शांती मिळणे कठीण होईल.

कुंभ: सामाजिक जीवनात खूप सक्रिय राहतील. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने चांगले परिणाम देईल. विविध स्रोतांमधून उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मेहनतीचे कौतुक करतील. भागीदारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती फायदेशीर व्यावसायिक सौदे करतील आणि त्यातून चांगला परतावा मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. शांत वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता. उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णय करिअरसाठी अनुकूल असतील. एकूणच अनुकूल आणि फायदेशीर परिणाम दिसतील.

मीन: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. करिअरमधील यशाचा मार्ग थोडा आव्हानात्मक असेल. मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न कराल तेव्हाच प्रगती होईल. एखाद्यासोबत प्रेमसंबंधात असाल तर या काळात तुमचे नाते पुढच्या पातळीवर जाऊ शकते. विद्यार्थ्यांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. आगामी काळ फायदेशीर ठरणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.