१९ वर्षांनी शुक्र-राहु युती: ९ राशींना सुवर्ण संधी, लाभच लाभ; यश-कीर्ति, भरभराटीचा शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:32 IST2025-01-13T11:20:18+5:302025-01-13T11:32:26+5:30
सुमारे ४ महिने शुक्र उच्च राशीत विराजमान असणार असून, राहुशी युती योग जुळून येत आहे. याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मकता लाभू शकेल? जाणून घ्या...

जानेवारी महिन्यात ग्रहांच्या गोचराने विविध योग, शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. महाकुंभाचे महापर्व साजरे केले जात आहे. अनेकार्थाने २०२५ या नववर्षाची सुरुवात कमाल होणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्र ग्रह विद्यमान घडीला कुंभ राशीत आहे. या राशीत शनी आणि कुंभ यांची युती आहे.
२८ जानेवारी २०२५ रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. तर मीन ही शुक्राची उच्च रास आहे. विशेष म्हणजे ३१ मे २०२५ पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे. आताच्या स्थितीत मीन राशीत राहु विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि राहु यांचा युती योग जुळून येणार आहे.
मीन राशीत शुक्र आणि राहुचा युती योग १९ वर्षांनी जुळून येणार असल्याचे सांगितले जात आहे. याचा ९ राशींना सर्वोत्तम लाभ, सर्वोच्च प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव, परिणाम पाहायला मिळू शकतो, ते जाणून घेऊया...
वृषभ: मनोकामना-इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात विविध फायदे मिळू शकतात. प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. मित्रांसोबत छान वेळ घालवू शकता. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. पण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मिथुन: करिअरच्या बाबतीत विविध फायदे मिळू शकतील. वरिष्ठ अधिकारी कामावर खूष असतील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आयात-निर्यात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत, शुक्राचे मीन राशीतील गोचर चांगले ठरू शकते.
कर्क: शुक्राचे मीन राशीतील गोचर फायदेशीर ठरू शकते. भौतिक सुख मिळू शकते. प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. अध्यात्माकडे कल जास्त असू शकतो. धार्मिक यात्रा करू शकता. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
कन्या: शुक्राचे मीन राशीतील गोचर फलदायी ठरू शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अविवाहित लोकांना चांगली स्थळे येऊ शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: जोडीदारासोबत प्रेमसंबंध वाढू शकतील. छान वेळ घालवाल. विद्यार्थी पूर्वीच्या तुलनेत शिक्षणात चांगले प्रदर्शन करतील. मित्रांमध्ये लोकप्रियता वाढेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. शुक्र आणि राहु युतीमुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढू शकेल. उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. नफा कमावण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मोठे व्यवहार करू शकाल. कल अध्यात्माकडे वाढू शकेल.
धनु: कौटुंबिक पातळीवर सुख-समृद्धीचा अनुभव मिळू शकेल. आनंद आणि उत्साहाने भरलेले असाल. कारकिर्दीत खूप चांगली कामगिरी करू शकाल. नवीन वाहन खरेदी करू शकता. घरात नूतनीकरण करू शकता. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकेल. धार्मिक कार्ये आणि अध्यात्माकडे कल अधिक असेल. भावनिकदृष्ट्या खूप मजबूत राहू शकाल.
मकर: यश मिळू शकते. प्रलंबित असलेल्या कामाच्या पूर्ततेसह, संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. एखाद्या कामासाठी कठोर परिश्रम करत असाल तर आता त्यात यश मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी कामावर खूष असतील. जास्त जबाबदारीसह पगारात वाढ होऊ शकते. आनंददायी घटना घडू शकतात. प्रेम जीवन चांगले राहू शकेल.
कुंभ: आजूबाजूला खूप सकारात्मकता अनुभवायला मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत एकामागून एक अनेक ठिकाणी पर्यटन करू शकाल. कुटुंबात शांतता, समाधान राहू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.
मीन: शुक्राची ही उच्च रास आहे. भौतिक सुख मिळू शकेल. समाजात आदर आणि सन्मानात वाढ होऊ शकते. सोशल मीडियाशी संबंधित लोकांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सुखसोयी, चैनीच्या वस्तूंचा उपभोग घेता येऊ शकेल. मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात. भावंडांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. वैवाहिक जीवन शांतता, समाधानाने भरलेले असेल. व्यापारी वर्गाला फायदे मिळू शकतील. व्यक्तिमत्व खूप प्रभावी होऊ शकेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.