शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 10:28 AM2022-06-14T10:28:10+5:302022-06-14T10:34:14+5:30

शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना शुभ फयदायी मानला जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करत आहेत. यातील एक म्हणजे शुक्राचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले जात आहे. मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून आता शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करत आहे. (venus transit taurus 2022)

वृषभ राशीचे स्वामित्व शुक्राकडे आहे. १८ जून रोजी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला वृषभ राशीत बुध ग्रह असून, या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे विलक्षण असा महालक्ष्मी योग जुळून येत आहे. (shukra gochar vrishabh rashi 2022)

बुध आणि शुक्र युतीच्या या योगाला लक्ष्मी नारायण योग असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह सुख, वैभव, भोग आणि विलासी जीवन यांचा कारक मानला गेला आहे. तसेच शुक्राचे स्वराशीत येणे उत्तम मानले गेले आहे.

शुक्राचा स्वराशीत प्रवेश आणि बुधाच्या युतीमुळे जुळून येत असलेला महालक्ष्मी नारायण योग याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होणार आहे. कोणत्या आहेत, त्या राशी जाणून घेऊया...

शुक्राचा वृषभ प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. या काळात कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ राहील. व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. जर तुम्हाला करार करायचा असेल, तर या काळात त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

शुक्राचा स्वराशीतील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. या काळात तुमचे व्यक्तिमत्व खुलेल आणि सामाजिक वर्तुळही वाढेल. आनंददायक घटना घडू शकतील. शुक्राचे संक्रमण प्रेमसंबंधांसाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुमचे नाते मजबूत होईल आणि तुमचा जोडीदार कोणत्याही परिस्थितीत सहकार्य करण्यास तयार असेल. संक्रमण काळात, व्यवसायातील भागीदारांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि व्यवसायात प्रगती होईल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल.

शुक्राचा वृषभ प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. या काळात जे लोक परदेशात जाण्यास इच्छुक आहेत, त्यांना प्रवासाला जाण्याची शुभ संधी मिळेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढल्याने त्यांचा प्रभाव वाढेल. विविध स्रोतांमधून उत्पन्न वाढवण्यात यश मिळेल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल, तर या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रेम जीवनात यश मिळेल. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतील.

शुक्राचा वृषभ प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. या काळातील गुंतवणुकीचा पुढे चांगला परतावा मिळू शकेल. नोकरदारवर्गाला यश मिळेल आणि ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांनी आपले काम प्रामाणिकपणे केले तर त्यांना करिअरमध्ये चांगल्या आणि नवीन संधी मिळतील. या काळात कौटुंबिक जीवन आनंद आणि शांततेत व्यतीत होईल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

शुक्राचा वृषभ प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. या काळात सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुमचे सामाजिक वर्तुळही वाढेल. वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि नवीन बातम्या मिळतील. प्रेमी युगुलांवर शुक्र देवाच्या आशीर्वादामुळे ते प्रेम जीवनाचा मनमोकळेपणाने आनंद घेतील. तसेच, विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील.