साप्ताहिक राशीभविष्य: श्रावणाची सांगता, बाप्पाचे आगमन; कोणत्या राशींवर असेल शिव-गणेश कृपा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:19 PM2024-09-01T12:19:50+5:302024-09-01T12:30:37+5:30

Weekly Horoscope: १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात ४ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, गुरु आणि हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेत, बुध कर्क राशीत असून, ४ सप्टेंबर रोजी तो सिंह राशीत जाईल. तेथे त्याची रविशी युती होईल. केतू आणि शुक्र कन्येत आहेत. प्लूटो मकरेत तर शनी कुंभेत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंदाचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून होईल. १ सप्टेंबर रोजी शिवरात्रि आहे. २ सप्टेंबर रोजी दर्श पिठोरी अमावास्या, सोमवती अमावास्या असून, पोळा सण आहे. शेवटचा श्रावणी सोमवार आहे. ३ रोजी शेवटची मंगळागौर आहे. ६ रोजी हरितालिका व्रत आहे. ७ रोजी गणेश चतुर्थी आहे.

या आठवड्यात असणारे शुभ, पुण्यफलदायी सण-उत्सव, व्रते तसेच बुधाचा सिंह राशीत होणारा प्रवेश कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरू शकेल? कोणत्या राशींवर शिवशंकर महादेव, पार्वती देवी, श्रीगणेशाची असीम कृपा राहू शकेल? जाणून घेऊया...

मेष: आठवड्याच्या सुरवातीस खर्च वाढू शकतात. परंतु आठवड्याच्या अखेर पर्यंत प्रवास सुखद होईल. जुन्या मित्रांना भेटाल. भविष्याची चिंता करत बसाल. बाजारातून वस्तू खरेदीचा आनंद उल्हास व सौख्य प्रदान करेल. एखादी तीर्थयात्रा किंवा मंगल कार्यासाठीचा प्रवास मित्र व नातेवाईक यांच्या सहवासाचा भरपूर लाभ प्रदान करेल. व्यापारी व्यवसाय वाढी करता जास्त आर्थिक गुंतवणूक करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. कुटुंबियांच्या सहवासात मोठी रजा घालवू शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोबलाची कमतरता जाणवू शकते व त्यामुळे ते एकाग्रतेने अभ्यास करू शकणार नाहीत. इतर विद्यार्थ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक प्रवृत्तींना दिनचर्येत सहभागी करून तंदुरुस्त राहा.

वृषभ: हा आठवडा अत्यंत लाभदायी आहे. ज्ञान व मनोबल वृद्धिंगत होईल. प्रेम संबंध व ज्ञान संबंधांची गोडी उत्पन्न होईल. सहकार्याची भावना वाढीस लागेल. वैवाहिक जीवनात नव्याने ख़ुशी येईल व शांतता राहील. कुटुंबिय एकमेकांना सहकार्य करतील. ते एकमेकांबद्दल विचार करू लागतील. कुटुंबियांना गुरुजनांप्रमाणे समजून जीवनातील कठीण परिस्थितीतून शांतपणे बाहेर पडण्याचा मार्ग शिकून घेतील. भविष्याची चिंता आध्यात्माकडे वळवेल. भक्ती व सत्संगात जाण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापाऱ्यांना महिलांचे सहकार्य मिळेल. त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. नवीन संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर एखाद्या संधीची वाट पाहात असतील तर हा आठवडा त्यास उपयुक्त ठरेल.

मिथुन: हा आठवडा नवीन सौख्य प्रदान करणारा आहे. त्याच बरोबर अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात मदत करणारा आहे. मतभेद कमी करून प्रेमाचे बी रोवण्यात मदत करणारा आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत आपली ज्ञान व प्रेरणेची गोडी वाढेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात सुखी असल्याचे दिसून येईल. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्ञान प्राप्तीसाठी भरपूर पैसा खर्च होणार असल्याने आधीपासूनच त्याची तरतूद करावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीच्या विषयांसंबंधी व अतिरिक्त ज्ञान प्राप्तीसाठी आठवडा मदतरूप ठरेल. समस्यांचे निराकरण होईल. ज्ञानपूर्ती होईल. गुरुजनांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. कदाचित एखादा प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात लाभदायी संधी मिळेल. त्यांना प्रवासातून लाभ होईल.

कर्क: कुटुंबियांच्या सहवासात जास्त वेळ घालवाल. धार्मिक प्रवास लाभदायी होतील. मंगल कार्यातून आनंदाचा व शांततेचा अनुभव घ्याल. विवाहितांसाठी हा आठवडा भक्ती व प्रेमाचा आहे, जो आनंद व प्रगती करेल. कुटुंबात बक्षिसाच्या रूपात पैसा जमा होईल. आर्थिक, मानसिक व सामाजिक स्थिती मजबूत राहील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक समस्या असू शकते. त्यांनी कामे वेळेवर पूर्ण करावीत. व्यापाऱ्यांना नवीन तंत्राचे ज्ञान व व्यवस्था यावर लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात त्यांचे मन रमेल. नवीन विषय पटकन शिकू शकतील. आरोग्य विषयक काही त्रास दिसत नसला तरी संसर्गजन्य विकारांपासून दूर राहावे. शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळा. खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे.

सिंह: हा आठवडा काही अंशी प्रतिकूल आहे. मनोबलाची कमतरता जाणवू शकते, तसेच कामाचे परिणाम मिळण्यात विलंब होऊ शकतो. कुटुंबात कलह संभवतो. परंतु कुटुंबियांचे सहकार्य कठीण परिस्थितीत मदतरूप ठरेल. अचानकपणे एखादा लहानसा प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक सहकार्य नवीन संधी प्राप्त करून देऊ शकेल. आपली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी नवीन संधी प्रदान करू शकते व आर्थिक लाभ मिळू शकतो. असे असले तरी अचानकपणे संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना एकाग्रतेवर लक्ष द्यावे लागेल. जुना अभ्यास सोडून देऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अधिक प्रमाणात धावपळ करणे टाळावे. शारीरिक दृष्ट्या पाण्याच्या व लोहाच्या कमतरतेमुळे होणारे विकार होण्याची संभावना आहे.

कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. पूर्वार्धात काही शारीरिक समस्या असू शकतात. उत्तरार्धात विशेष लाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. विवाहितांना त्यांच्या गोपनीय कार्यात मदत होईल. जुन्या विवादांचा निकाल बाजूने लागू शकतो. व्यावसायिक बाबतीत अचानकपणे लाभदायी होऊ शकतो. शासकीय योजनेतून लाभ प्राप्ती होऊ शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. जुन्या मित्रांशी प्रेमपूर्ण व्यवहार मात्र होईल. राजकारणातील व्यक्तींना यश प्राप्त होईल. आर्थिक लाभ होईल. समाजात पत वाढेल. व्यवहार चातुर्य व गोड बोलण्याची संवय यामुळे एखादे सामाजिक पद मिळू शकते. विवाहेच्छुक कन्यांना योग्य स्थळ मिळण्याची संभावना आहे. नवीन लोकांच्या ओळखीने भविष्य निर्माण करण्यात मदत होईल.

तूळ: हा आठवडा सामान्यतः यशदायी आहे. नोकरी करत असाल तर कार्यक्षेत्री महत्वाच्या जवाबदारीस सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी अतिरिक्त परिश्रम व बौद्धिक क्षमेतचा उपयोग करावा लागेल. प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, तेव्हा आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक बाबीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतर व्यापाऱ्यांशी सामना करावा लागू शकतो. विवाहितांना त्यांचा एखादा कौटुंबिक विवाद संपुष्टात आणण्यात एखाद्या मित्राच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते. प्रेमिकेचे प्रेम वाढल्याने आपण सुखद क्षण घालविण्याचा आनंद घेऊ शकता. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण होऊ शकते. कुटुंबियांच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकाल.

वृश्चिक: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी असण्याची संभावना आहे. जीवनातील अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊन सुखद परिणाम मिळतील. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील. लोक आपल्याशी सहमत होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण करेल. संचित धनात वाढ होईल. कामातील यश व व्यापारात झालेला धनलाभ यामुळे स्वतः अत्यंत उर्जावान व उत्साहित झाल्याचे जाणवेल. जास्तीची कमाई करण्यासाठी एखाद्या नवीन कार्याची सुरवात करू शकता. हाती एखादे मोठे कंत्राट लागू शकते, जे कारकिर्दीसाठी व व्यापारासाठी उन्नतीचे महत्वाचे कारण बनवेल. मन धार्मिक व सामाजिक कार्यात रमेल.

धनु: हा आठवडा नशिबाचे दार उघडणारा असल्याचे दिसत आहे, परंतु त्याच्या प्राप्तीसाठी आळस व अभिमान दूर सारावा लागेल. वेळ कोणासाठी थांबत नसते हे लक्षात ठेवा. एक पाऊल मागे घेतले तर दोन पाऊले पुढे जाण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्री एखादी मोठी जवाबदारी देण्यात आली तर ती उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर विरोधकांपासून सतर्क राहा. व्यापारासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. इच्छित लाभ मिळेल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी ध्येयपूर्तीचा आहे, परंतु अति आत्मविश्वास त्यांना अध्ययनापासून विन्मुख करू शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर: प्रकृती सामान्य असली तरी त्याकडे लक्ष द्यावे लागेल. निश्चित केलेली कामे वेळेवर पूर्ण होण्यात काही अडचणी येऊ शकतात. ऋतुजन्य किंवा जुनाट विकारांमुळे शारीरिक व मानसिक दृष्ट्या पीडित होऊ शकता. प्रकृतीबरोबरच संबंधावर लक्ष द्यावे लागेल. कामातील व्यस्तता शुभचिंतक व कुटुंबियांपासून लांब ठेवू शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर खूप सावध राहावे लागेल. एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते. प्रेमिकेची भावना व मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास थोडा वेळ द्यावा लागेल.

कुंभ: हा आठवडा अनुकूल संकेत घेऊन येत आहे. आधीपासून असलेल्या समस्या कमी होऊ लागतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नवीन योजनांसह कारकीर्दीस व व्यवसायास नवी दिशा देण्यासाठी स्वकीयांचे समर्थन प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या चांगल्यासाठी सहकार्य महत्वाचे ठरेल. समर्थन प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे एखादा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासामुळे सुखद व नवीन संबंध जोडण्याची संधी मिळेल. असे असले तरी घराची दुरुस्ती व सजावट यावर अतिरिक्त खर्च होऊ शकतो. मात्र प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील व त्यातून अचानकपणे धनप्राप्ती होईल. काही अंशी व्यस्ततेचा सामना करावा लागू शकतो. अचानकपणे कामाचा भार येऊ शकतो. काही कार्यक्रम रद्द करावे लागू शकतात.

मीन: हा आठवडा शुभ फलदायी होण्याची संभावना आहे. क्षमतेचा योग्य प्रकारे उपयोग करून आपले श्रेष्ठत्व प्रदर्शित कराल. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेऊन त्याचा यशस्वीरित्या उपयोग कराल. कारकिर्दी व व्यापाराशी संबंधित एखादी शुभ बातमी मिळण्याची संभावना आहे. प्रगती होईल. स्थान व पद वाढ झाल्याने सन्मान निव्वळ कार्यक्षेत्रीच नव्हे तर कुटुंबात वाढेल. व्यापाऱ्यांच्या हाती एखादा नवीन सौदा लागू शकतो. त्यांना बाजारात येणाऱ्या तेजीचा लाभ होईल. स्वकीयांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.