साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना अभय, नोकरीत पदोन्नती-व्यापारात नफा शक्य; शेअर बाजारात लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:18 IST2025-03-02T08:06:47+5:302025-03-02T08:18:16+5:30

Weekly Horoscope: ०२ मार्च २०२५ ते ०८ मार्च २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. रवी आणि शनि कुंभ राशीत आहेत. बुध, शुक्र, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील.

सोमवार, ०३ मार्च रोजी विनायक चतुर्थी आहे. ०७ मार्च रोजी दुर्गाष्टमी आहे. तत्पूर्वी ०२ मार्च २०२५ रोजी रात्री ९.०३ पर्यंत फाल्गुन शुक्ल तृतीया राहील. याच दिवशी शुक्र मीन राशीत वक्री होत आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ६.३९ पर्यंत रेवती नक्षत्र राहील. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ६.३९ पर्यंत पंचक राहील.

विनायक चतुर्थी, दुर्गाष्टमी व्रत आणि शुक्र वक्री होण्यासह आठवडाभराची एकूण ग्रहस्थिती पाहता, कोणत्या राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकेल? मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया, साप्ताहिक राशीभविष्य...

मेष: ह्या आठवड्यात आहारावर लक्ष ठेवावे. तसेच सकाळी फिरावयास जावे किंवा योगासने करावीत. व्यापारात एखादे नवीन कार्य सुरु करू इच्छित असाल तर त्यास विलंब होऊ शकतो, परंतु धीर धरल्यास आपले कार्य होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यांनी सध्या शांत राहावे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. ह्या आठवड्यात फुटकळ कामात आपला जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात थोडे सतर्क राहावे. मेहनत करण्यासाठी आपण तयार राहावे. वैवाहिक जीवनात गैरसमजामुळे आपसातील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.

वृषभ: ह्या आठवड्यात जास्त उष्ण किंवा जास्त शिळे पदार्थ खाणे टाळावे. व्यवसायात परिश्रम वाढवावे लागतील. एखादा मोठा व्यापारी सौदा होण्याची संभावना आहे. आर्थिक उन्नती होईल. नोकरीत जेथे आहात तेथेच परिश्रम करावेत. नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये. ह्या आठवड्यात कुटुंबासाठी पैसा खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी कमी होईल. सामाजिक माध्यमांवर त्यांचे जास्त लक्ष राहील. एखाद्या वादामुळे प्रेमीजनांत दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल, मात्र वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा आपल्या वाणीमुळे घरात क्लेश होऊ शकतो.

मिथुन: हा आठवडा ठीक आहे. व्यापारात नवीन लोक ऑनलाइन व नवीन ओळखी वाढल्याने व्यापार वृद्धी होऊन उन्नती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. वरिष्ठांशी व्यवहार सकारात्मक असेल. त्यामुळे प्रगती होऊ शकते. घराचे नूतनीकरण करताना पैसा विचारपूर्वक खर्च करावा. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी व अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. गैरसमज झाल्याने प्रेमिकेची ओढ आटू शकते. वैवाहिक जीवनातील रुसवा दूर करण्यासाठी जोडीदाराशी जवळीक वाढवावी लागेल.

कर्क: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रकृती एकदम चांगली राहील. मात्र सकाळचे फिरणे व योगासने ह्यावर भर द्यावा. व्यवसायासाठी मात्र हा आठवडा काहीसा गोंधळात टाकणारा आहे. तेव्हा कोठेही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी थोडा विचार जरूर करावा. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. यशस्वी व्हाल. विनाकारण वाहनासाठी पैसा खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांनी जर मेहनत वाढवली तर त्यांना नक्कीच यश प्राप्त होऊ शकेल. प्रेमात परस्पर संबंधात कटुता येऊ शकते. वैवाहिक जीवनात जुन्या वादामुळे त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात जर एखादा नवीन व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर आधी त्यासाठी योजना तयार करा व एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. योजनेविषयी कोठेही वाच्यता करू नये. अन्यथा कामात अडथळे येऊ शकतात.

सिंह: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात जुनाट आजार त्रस्त करू शकतात. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त मेहनत व संघर्ष करण्याचा आहे. मेहनत करण्यास तयार असल्यासच यश प्राप्ती होऊ शकेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकीत घाई करू नये, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. प्रेमीजनांनी थोडे सावध राहावे. अहंकारामुळे नात्यात तणाव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे केल्यासच आपल्या कौटुंबिक जीवनात शांतता नांदू शकेल. ही शांतता निर्माण करणे आपल्याच हाती असेल. कोणत्याही नात्यात घमंड असता कामा नये. कुटुंबियांना वेळ द्यावा.

कन्या: हा आठवडा ठीक आहे. एखाद्या जुनाट आजारामुळे आपण त्रस्त होऊ शकता. घरी पाहुण्यांची ये-जा वाढल्याने थकवा येऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांनी जर घरापासून दूर जाऊन व्यवसाय केला तर जास्त लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांची पदोन्नती संभवते. नोकरीत बदल करू नये, अन्यथा त्रास वाढू शकतो. घराचे नूतनीकरण करण्यात जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. सुखी वैवाहिक जीवनात एखाद्या जुन्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो.

तूळ: हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. ह्या आठवड्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापारी जुना पैतृक व्यवसाय पुन्हा सुरु करू शकतील. त्याने त्यांना लाभ होऊन व्यापार उत्तम चालेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्री सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या पदोन्नतीची शक्यता उंचावेल. एखादे कर्ज घेऊ इच्छित असाल तर ते ह्या आठवड्यात घेऊ शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील गोडी टिकवून ठेवण्यासाठी काही मित्रांची संगत सोडून द्यावी. प्रेम जीवनात निष्कारण तणाव निर्माण होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे. वैवाहिक जीवनातील तणाव नात्यास प्रतिकूल आहे.

वृश्चिक: हा आठवडा ठीक राहील. ऋतू बदलामुळे एखादे आजारपण येऊन त्रस्त होऊ शकता. तीव्र डोकेदुखी सारखे विकार त्रास देऊ शकतात. व्यापाऱ्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. त्यांना नवीन कंत्राट मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. नोकरीत कोणताही बदल करू नये. हा आठवडा शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यास अनुकूल आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. जुनी प्रेमिका पूर्वीची कटुता विसरून पुन्हा परतू शकते. वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वाद होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे. जर असे काही झालेच तर पश्चाताप करावा लागू शकतो.

धनु: हा आठवडा चांगला आहे. एखाद्या जुनाट आजाराने आपले मन खिन्न होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. व्यापाराशी संबंधित कोणत्याही बाबतीत घाई करू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमीजनांच्या जीवनात गैरसमज होण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा कटुतायुक्त आहे. जोडीदाराशी निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा जोडीदार निराश होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावामुळे आठवडा त्रासदायक असल्याचे जाणवेल. स्वतःला एकटे समजू नका. चहूबाजूस जग किती सुंदर आहे व आपली माणसे आपल्या पाठीशी किती आहेत ते बघा. जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आपणास मदतरूप होईल.

मकर: ह्या आठवड्यात व्यापारी त्यांच्या व्यापारात नवीन कार्य सुरु करण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे त्यांची आर्थिक प्राप्ती जास्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांची नोकरीत बदल करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. ह्या आठवड्यात प्रवासावर जास्त पैसा खर्च करू शकाल. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागेल. प्रेमिकेस वेळ कमी दिल्यामूळे नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. एकमेकांना मनातील विचार सांगण्यासाठी आठवडा उत्तम आहे.

कुंभ: हा आठवडा सामान्यच आहे. ह्या आठवड्यात मस्तकाशी संबंधित एखादी समस्या त्रस्त करू शकते. सौंदर्यवर्धक वस्तुंचा वापर करताना लक्ष द्यावे. त्यांची मुदत संपण्याचा दिनांक अवश्य तपासून घ्यावा. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी जास्त मेहनत करण्याचा आहे. नवीन कंत्राट मिळविण्यासाठी त्यांना मेहनत वाढवावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. जे एकटे आहेत ते स्वतःसाठी एखादा जोडीदार शोधू शकतात. वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. वैवाहिक जोडीदाराशी काही कारणाने कटुता येऊ शकते. ह्या आठवड्यात वैवाहिक जोडीदार व आपली मुले ह्यांच्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो. शिक्षण व ज्ञान प्राप्तीसाठी आठवडा अनुकूल आहे.

मीन: हा आठवडा सामान्यच आहे. ह्या आठवड्यात एखादा नेत्र विकार त्रस्त करू शकतो. व्यापारी त्यांचा एखादा जुना व्यवसाय पुन्हा सुरु करू शकतील. ह्या आठवड्यात त्यांच्या व्यवसायात चांगली वृद्धी झाल्याचे दिसू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत परिवर्तन करू शकतात. त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. शेअर्स बाजारात गुंतवणुक करावयाची असेल तर आपण ती करू शकता. त्यातून चांगला लाभ होऊ शकतो. वैवाहिक जोडीदारात एखादा गैरसमज निर्माण झाल्याने वैवाहिक जीवनात मात्र दुरावा येऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या तीव्र होऊ शकते. दिखावा करण्यावर पैसा खर्च करणे टाळावे लागेल.