Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ७ राशींना अनेकविध लाभ; सर्वोत्तम आठवडा, विजयादशमी शुभ ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 12:12 PM2022-10-02T12:12:46+5:302022-10-02T12:38:30+5:30

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी...

ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालेली आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. या महिन्यात बुध आणि शनी यांसारखे महत्त्वाचे ग्रह मार्गी होणार आहेत. याशिवाय एकूण ५ ग्रहांच्या स्थानात बदल पाहायला मिळणार आहेत. याशिवाय, सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचीही रेलचेल या महिन्यात आहे. (Weekly Horoscope Rashi Bhavishya October 2022)

या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच ०२ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कन्या राशीत मार्गी होत आहे. बुधाचे मार्गी होणे शुभ मानले गेले आहे. याचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, तर काही राशींसाठी हा काळ संमिश्र ठरू शकतो.

तसेच या आठवड्यात नवरात्राची सांगता होत असून, विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे. यंदाचा नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून या आगामी आठवड्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले असून, तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा बराचसा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपली कामावरील पकड चांगली राहिल्याने आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळून कष्टाचे यथोचित फळ मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा लक्ष द्याल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. येणाऱ्या तेजीने आपण सुखावले जाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अनुभवी लोकांचे सहकार्य मिळाल्याने ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. व्यवसायात नफा होऊ लागल्याने आपण खूपच आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. परंतु, बँकेकडून घेतलेल्या कर्जामुळे आपली मानसिक चिंता वाढ शकेल. आठवड्याच्या मध्यास या चिंतेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. मित्रांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सामान्य फलदायी आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. आपण आपल्या कामात पारंगत व्हाल. आपली कामे आपण उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लहान-सहान खर्च झाले तरी प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास कामात मदत करेल. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. आपली प्रकृती चांगली राहील. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क राशीच्या व्यक्ती या आठवड्यात कल्पना विश्वात रमतील. काहीतरी विधायक कार्य करण्याचा विचार कराल. आपणास प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. विवाहित व्यक्ती आपले संबंध अधिक दृढ करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण शासनाकडू एखादे फायदेशीर काम सुद्धा मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल. सामाजिक माध्यमांवर खूपच व्यस्त राहाल. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढल्याने त्यांना अभ्यासात चांगला फायदा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपणास काही नवीन योजनांवर काम करावे लागेल. आपण इच्छाशक्तीच्या जोरावर त्यात यश मिळवू शकाल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्रवासाची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची आपल्या कामावरील पकड मजबूत होईल. ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने उचलतील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा मजबुती प्रदान करणारा आहे. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजांना समजू शकाल. आपण कुटुंबियांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी राहतील. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्य कौशल्यामुळे व कामगिरीमुळे सन्मानित होतील. आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. आठवड्याचे सुरुवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण प्रवास करू शकाल. तसेच आपली अत्यंत महत्वाची कामे पूर्ण करण्याचा विचार सुद्धा कराल. थोडा खर्च होईल. आपण घरात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामानिमित्त भरपूर प्रवास करतील. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार विस्तारासाठी काही नवीन कामे करावी लागतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. आपणास कामानिमित्त खूप प्रवास करावे लागतील. आपणास एखादा मोठा लाभ मिळण्याची संभावना आहे. आपल्या मित्रांना सुद्धा आपल्याकडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. आपल्यात चांगली ऊर्जा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले गुण मिळू शकतील. स्पर्धेत सुद्धा ते यशस्वी होतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूपच यश प्राप्त करून देणारा आहे. आपण मानसिक दृष्ट्या अत्यंत मजबूत व्हाल. आनंदित राहिल्याने आपल्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होईल. नोकरीत चांगली कामगिरी झाल्याने बढती मिळण्याची संभावना आहे. आपल्या मनावर आपले नियंत्रण राहिल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. लहान - सहान संघर्ष होण्याची शक्यता असल्याने आपण शांत राहून आपली कामे करावीत. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण खूप मेहनत करून प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण बाहेर जाण्याचे आयोजन कराल. त्यामुळे खर्चात वाढ होईल. थोडा मानसिक ताण सुद्धा येईल. विशेषतः आठवड्याच्या मध्यास आपणास एकटेपणा जाणवेल. परंतु, हे चिंतेचे कारण नसेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात कुटुंबियांचे सहकार्य मिळून त्यांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. कौटुंबिक जीवन आनंदित होईल. व्यावसायिक व्यक्ती स्वतःच्या व्यावसायिक हेतूने काही नवीन लोकांशी संपर्क करतील. त्यामुळे भागीदारीत सुद्धा वाढ होऊ शकेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांना यश देणारा आहे. विद्यार्थ्यांना वाचन करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदा मिळवून देणारा आहे. आपण चांगली गुंतवणूक करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात काही नवीन लोकांचे सहकार्य मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. आपल्या कामासाठी आपणास एखादा पुरस्कार मिळण्याची संभावना आहे. आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता सुद्धा आहे. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन आपली प्रशंसा करतील. या आठवड्यात व्यावसायिक हेतूने आपणास भरपूर प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ते आपला अभ्यास सहजपणे करू शकतील. त्यांची एकाग्रता वाढेल. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.