साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अंगारकी विनायक चतुर्थी शुभ; मेहनतीचे चीज, मनोकामना पूर्ण! By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 09:09 AM 2024-11-03T09:09:20+5:30 2024-11-03T09:19:38+5:30
Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आगामी आठवडा? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… Weekly Horoscope: या सप्ताहात शुक्राचा राशीपालट आहे. अन्य कोणताही राशीपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्येत, बुध बुध आणि शुक्र वृश्चिक राशीत आहेत. मात्र ६ नोव्हेंबर रोजी शुक्र धनू राशीत प्रवेश करेल. प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून राहील. रविवारी दिवाळी भाऊबीज (यम द्वितीया) आहे. मंगळवारी विनायक चतुर्थी, बुधवारी कड पंचमी, पांडव पंचमी आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते.
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नोव्हेंबर महिन्याचा हा आठवडा आणि विनायक चतुर्थीचा अंगारक योग कोणत्या राशींना सर्वोत्तम ठरू शकेल? कोणाला संमिश्र ठरू शकेल आणि कोणी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...
मेष: हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी असू शकतो. कामाची व्यस्तता संभवते व त्यामुळे आपणास अतिरिक्त काम करण्याची गरज भासू शकते. त्यासाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आठवडा आव्हानात्मक असू शकतो. व्यापारी वर्गास त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रकृती काहीशी नाजूक राहण्याची शक्यता असल्याने दिनचर्येवर व आहारावर लक्ष ठेवावे लागेल. परदेशात कारकीर्द घडविण्याच्या किंवा व्यापार सुरु करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजांवर लक्ष द्यावे लागेल.
वृषभ: हा आठवडा अनिश्चिततेचा असण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतार होत असल्याचे दिसून येईल. सतर्क राहावे लागेल. अनपेक्षितपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो, परंतु त्यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते. दीर्घ काळापासून कारकीर्द सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर आपले लक्ष्य गाठण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना सहकारी व वरिष्ठ ह्यांच्याशी मिळून-मिसळून काम करावे लागेल. प्रवासादरम्यान सामानाची काळजी घ्यावी. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत करूनच यश प्राप्ती होईल.
मिथुन: एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत होऊन दीर्घ काळापासून स्थगित असलेले काम पूर्ण होईल. सत्ता व शासनाशी संबंधित व्यक्ती पूर्ण सहकार्य करतील. कार्यक्षेत्री सतर्क राहावे लागेल. प्रगतीवर जळणाऱ्या व्यक्ती त्रास देण्याची संभावना आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आर्थिक बाबीं विषयी स्पष्टता करून वाटचाल करावी लागेल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी शुभचिंतकांचा सल्ला घेणे हितावह होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल.
कर्क: एखादे मोठे यश मिळू शकते, परंतु ह्या यशाच्या आनंदात सतर्क राहावे लागेल. कोणत्याही प्रकारची जोखीम असेल अशा ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे लागेल, अन्यथा भविष्यात नुकसान सोसावे लागू शकते. पदोन्नती किंवा मनोवांच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघेही प्रशंसा करतील. जमीन किंवा घर विक्रीतून लाभ होईल. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेताना माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. परदेशात कारकीर्द घडविण्याचा किंवा व्यापार करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणारे अडथळे दूर होतील. मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे प्रयोजन करू शकाल. प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
सिंह: प्रकृती व संबंध ह्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामावर प्रकृती अस्वास्थ्याचा प्रभाव पडू शकतो. एखादी संधी हातून निसटल्याने दुःख होऊ शकते. एखादी लहानशी चूक प्रतिष्ठा मलीन करू शकते, हे ध्यानात ठेवावे. विरोधकांपासून सतर्क राहावे लागेल. जमीन-घर संबंधित एखाद्या मोठ्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री सतर्क राहावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील.
कन्या: शुभ व सौभाग्यदायी आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या कामामुळे सन्मानित केले जाऊ शकते. एखादी मोठी जवाबदारी सोपविण्यात येऊ शकते. बाजारात आलेल्या तेजीचा लाभ घेण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा सुद्धा वृद्धिंगत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांना अनुकूल आहे. दीर्घ काळापासून व्यापार विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना एखादी ऑफर मिळू शकते. सुख-सोयींशी संबंधित एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल.
तूळ: थोडी धावपळ होण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीत आपणास धीराने कामे करावी लागतील. लहान भावंडांशी झालेल्या वादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो, तेव्हा बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवावे. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्या ऐवजी त्याकडे दुर्लक्ष करावे. कारकीर्द किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. परंतु त्यात लाभ अपेक्षेहून कमी होऊ शकतो. एखाद्या समोर आपल्या प्रेमाची कबुली द्यावयाची असेल तर थोडा धीर धरा. योग्य वेळ आल्यावर आपल्या प्रेमाची कबुली द्या. पूर्वीपासून असलेले प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
वृश्चिक: पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे व परिश्रमांचे सुखद परिणाम बघण्याची संधी मिळू शकते. कारकीर्द व व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. असे असले तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्री विरोधकांपासून सतर्क राहावे लागेल. अन्यथा ते कामात खोडा घालू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल. वैवाहिक जोडीदारासह देवीच्या दर्शनास जाण्याचा कार्यक्रम आखू शकता. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती चिंतेस कारणीभूत ठरू शकते. तेव्हा काळजी घ्यावी लागेल.
धनु: हा आठवडा अत्यंत लाभदायी होण्याची संभावना आहे. वेळेचे व ऊर्जेचे योग्य नियोजन केले तर खूप मोठे यश व लाभ प्राप्त होऊ शकतो. प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळखी वाढतील व त्यांच्या मदतीने आगामी काळात लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना मोठे यश मिळाल्याने कार्यक्षेत्री व कुटुंबात त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. विवाहेच्छुकांना विवाहासाठी स्थळे येऊ शकतील. प्रेम संबंधात प्रगल्भता येऊ शकते.
मकर: हा आठवडा जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जास्त धावपळ व परिश्रम करण्याचा असू शकतो. घर दुरुस्ती व इतर कार्यात जास्त व्यस्त असू शकता. आर्थिक स्थितीस प्रभावित करेल असे काही मोठे खर्च अचानकपणे होऊ शकतात. रोजगाराच्या शोधात असाल तर अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कार्यक्षेत्री अचानकपणे भार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ देऊ नका. कौटुंबिक समस्या संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करावा.
कुंभ: आळस व अहंकार झटकावा लागेल. कामे उद्यावर ढकलण्याचे आपणास टाळावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. जमीन-घर संबंधित वाद आपसात संवाद साधून सोडवणे हितावह होईल. व्यवसायास प्रतिकूल असू शकतो. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे. कोणत्याही योजनेत किंवा व्यापारात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा नंतर नुकसान सोसावे लागू शकते. प्रवासादरम्यान सामान काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा दुर्लक्षित करू नये.
मीन: परिश्रम करूनच यश प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांनी स्वतःचे काम स्वतःच करावे. त्यांनी कोणावरही अवलंबून राहू नये, अन्यथा वरिष्ठांच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील. व्यावसायिक लोकांना अपेक्षित लाभ मिळू शकेल. बाजारातील तेजीचा लाभ आपण घेऊ शकाल. संचित धनाची वृद्धी होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. ऋतुजन्य विकार किंवा जुने आजार उफाळून येण्याची संभावना असल्याने प्रकृतीवर लक्ष द्यावे.