साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 08:56 AM2024-03-10T08:56:59+5:302024-03-10T09:11:29+5:30

Weekly Horoscope: १० मार्च २०२४ ते १६ मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात रवी आणि मंगळ यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, मंगळ आणि प्लूटो मकरेत असून, १५ रोजी मंगळ कुंभेत जाईल, तेथे शुक, शनी आणि रवी आहेत. १४ रोजी रवी मीन राशीत जाईल. तेथे बुध, राहु आणि नेपच्यून यांच्याशी त्याची युती होईल.

चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. रविचार आणि सोमवारी पूर्ण काळ पंचक असून, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत पंचक राहील. रविवार, १० मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० पर्यंत माघ कृष्ण अमावास्या आहे.

एकूण ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी मार्च महिन्याचा आगामी आठवडा कसा असेल? कुटुंब, शिक्षण, आर्थिक आघाडी, व्यवसाय, वैवाहिक जीवन, करिअर या आघाड्यांवर कसा प्रभाव असू शकेल? रवि आणि मंगळाचे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी कसे ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ज्या व्यक्ती व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यांना यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीमुळे वाद संभवतो. विद्यार्थी एकाग्रतेने अध्ययन करून यशस्वी होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहील. खर्च जास्त होतील. शेअर्स बाजारात गुतंवणूक करू शकता. जर एखादी जमीन किंवा वास्तू घेऊ इच्छित असाल तर ती घेऊ शकता. प्रकृतीकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल.

वृषभ: हा आठवडा आर्थिक बाबतीत अत्यंत अनुकूल आहे. नोकरीत आपली प्रगती होईल. नवीन नोकरीत रुजू होण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. व्यवसायात प्रगती साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. रागावर नियंत्रण ठेवावे. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना मेहनत वाढवावी लागेल. ऋतू बदलामुळे प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचे दिसून येईल. भावंडांच्या शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल.

मिथुन: हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. मनातील विचार प्रेमिके जवळ व्यक्त करू शकता. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. नोकरी व व्यवसाया निमित्त प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. हे प्रवास लाभदायी ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल. नवीन संपर्क होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घराच्या दुरुस्तीसाठी भरपूर पैसे खर्च कराल. जमीन खरेदी करण्याची इच्छा असल्यास ती घेऊ शकता. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू शकता. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांचे लक्ष अध्ययनात लागणार नाही.

कर्क: हा आठवडा आनंदाने भरलेला आहे. विवाहित व्यक्ती जोडीदाराशी असलेले जुने मतभेद दूर करून पुढे जातील. विवाहेच्छुकांना मनाजोगा जोडीदार मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. जे मित्र आपला वेळ वाया घालवत असतील त्यांच्यापासून मात्र दूर राहावे लागेल. विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांनी मेहनत वाढवली तरच ते त्यात यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आनंदाने सर्व खर्च कराल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू शकता. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे आयोजन कराल. प्रवास केल्याने थकवा जाणवेल. एखादे सरकारी काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण होईल.

सिंह: या आठवड्यात नात्यात प्रेम व समन्वय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. स्वतःसाठी एखादे वाहन खरेदी करू शकता. दीर्घकाळासाठी शेअर्स बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा कष्ट व संघर्ष करण्याचा आहे. परिश्रम यशस्वी होतील. व्यापारी वर्गास अचानकपणे एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते व त्यामुळे लाभ प्राप्ती होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजनांचे सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत ते त्यात यशस्वी होतील.

कन्या: हा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येणारा आहे. वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. ज्या काही समस्या होत्या त्या आता संपुष्टात येतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. आपण एखादा नवीन शोध लावण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. व्यापारासाठी घरापासून दूर जाऊ शकता. नवनवीन संधी मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. घराच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च कराल. आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घकाळासाठी केल्यास हितकारक होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ: कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. त्यामुळे सर्वजण अत्यंत खुश होतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी एखाद्या विषयात जागरूकता दाखवतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायात स्तंभीत झालेल्या योजना पुन्हा सुरु करण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. चालू नोकरीत नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे.

वृश्चिक: हा आठवडा पूर्वीपेक्षा चांगला आहे. विवाहेच्छुकांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळेल. प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदारास कार्यात यश प्राप्त होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारामुळे धनलाभ होण्याची संभावना आहे. शेअर्स बाजारासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल. एखादे सरकारी काम खोळंबले असेल तर ते पूर्णत्वास जाईल. नवीन नोकरीची ऑफर येईल. विद्यार्थी त्यांच्या मित्रांच्या सहवासात वेळ घालवतील व त्यामुळे अभ्यासात त्यांचे नुकसान होईल.

धनु: हा आठवडा अत्यंत रोमँटिक असणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. जोडीदाराकडून एखादी चांगली भेटवस्तू मिळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगले स्थळ येईल. पैसा वायफळ खर्चांसाठी वापरु शकता. शेअर्स बाजारात जास्त गुंतवणूक करू नका. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी मेहनत करण्याचा आहे. नवीन कंत्राट मिळेल. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. कला,डिझाईनिंग,मार्केटिंग इत्यादी काम करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने अभ्यासात लक्ष लागणार नाही. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल.

मकर: नशिबाची साथ मिळेल. परदेशाशी नवीन संपर्क होतील. व्यापारास पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारासह रोमँटिक रात्री भोजनास जाल किंवा प्रेमळ वार्तालाप कराल. प्रणयी जीवन सुखद असेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती खूप विचारपूर्वक करावी. हा आठवडा कर्ज देण्यास किंवा घेण्यास अनुकूल आहे. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी होऊ शकतात.

कुंभ: हा आठवडा विशेष असा असणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ऑनलाईन प्राप्तीची साधने उपलब्ध होतील. थोडा वेळ धार्मिक कार्यास द्याल. शेअर्स बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नोकरीत बदल करू इच्छित असाल तर सध्याच्या नोकरीत चांगली संधी मिळेल. घरात भजन-कीर्तनाचे आयोजन होईल. वैवाहिक जोडीदारास एखाद्या नवीन कामाची सुरवात करून देऊ शकाल. मुलांच्या उत्तर दायित्वाची पूर्तता होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. घर सजावटीसाठी काही खरेदी करू शकाल. सर्व खर्चाचे अंदाजपत्रक बनविल्यास ते हिताचे होईल.

मीन: हा आठवडा पूर्वीपेक्षा चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. सर्व जण मिळून एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे आयोजन कराल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापाऱ्यांना नवनवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. घरापासून दूर राहून नोकरी करतात ते कुटुंबाच्या आठवणीने त्रस्त होऊ शकतात. विवाहेच्छुकांसाठी चांगले स्थळ येईल. घर दुरुस्तीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. काही वेळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल व त्यामुळे मनःशांती मिळेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल.