कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:07 AM2024-10-14T07:07:07+5:302024-10-14T07:07:07+5:30

Kojagiri Navanna Purnima 2024 Weekly Horoscope: एकादशी, कोजागरी नवान्न पौर्णिमेचा आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या…

Weekly Horoscope: आगामी काही काळात रवी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करीत आहे. आगामी काळातील ग्रहस्थिती अशी की, गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी आणि केतु कन्या राशीत आहेत. १७ ऑक्टोबर रोजी रवी तूळ राशीत प्रवेश करीत असून, तेथे त्याची युती बुधाशी होईल. शुक्र वृश्चिक राशीत, प्लूटो मकर राशीत, तर शनी कुंभ राशीत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

या आगामी काळात चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. मंगळवारी प्रदोष, बुधवारी कोजागरी पौर्णिमा आहे. गुरुवारपासून कार्तिक स्नानारंभ सुरू होईल. रविवारपासून पंचक सुरू झाले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तिन्ही दिवस पंचक असून, गुरुवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत पंचक राहील.

सूर्याच्या तूळ राशीतील संक्रमणाला तूळ संक्रांती असे म्हटले जाते. तसेच बुध ग्रहाशी युती होऊन बुधादित्य योग जुळून येत आहे. त्यामुळे कोजागरी पौर्णिमा शुभ योगात असणार असल्याचे म्हटले जात आहे. या शुभ, अनुकूल ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा काळ सकारात्मक व उपयुक्त होण्याची संभावना आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते, तसेच व्यवसायात अपेक्षित लाभ होऊ शकतो. प्राप्तीचे स्रोत विकसित होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. एकंदरीत हा कालावधी आर्थिकदृष्ट्या उत्तमच असेल. गुप्त शत्रू व दगाफटका करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागेल. कुटुंबात आई-वडील व भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भौतिक सुख-सुविधांशी संबंधित एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. कदाचित प्रेमिका एखादी भेटवस्तू देऊ शकते.

वृषभ: थोडे सतर्क राहून वाटचाल करावी लागू शकते. कोणतेही काम घाईघाईत करू नये. सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. लहान-सहान समस्या व व्यक्तिगत जीवनात काही जबाबदाऱ्या असताना मित्रांचा आधार दिलासा व सौख्य प्रदान करेल. कार्यक्षेत्री लोकांकडे लक्ष देण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करावे. युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजन व हौसमौज करण्यात व्यतीत होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमच यशाचा मार्ग दाखवतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रेमीजनांना सावध राहावे लागेल.

मिथुन: आव्हाने व समस्यांसमोर धैर्य व साहस दाखवावे लागेल. कार्यक्षेत्री काही अतिरिक्त दबाव असू शकतो. एखाद्या मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय ह्यात समतोल साधण्यात काही त्रास होऊ शकतो. कारकीर्द व व्यापाराच्या दृष्टीने कालांतराने गोष्टी मनाप्रमाणे होऊ लागतील. प्रेमिकेच्या अपेक्षा व भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

कर्क: योग्य लक्ष्य व मेहनतीच्या जोरावर प्रगती करण्याचा काळ आहे. ध्येयाप्रती पूर्ण लक्ष ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री निरंतरता दाखवावी लागेल. वरिष्ठ व कनिष्ठांशी मिळून-मिसळून काम केल्यास लाभ होईल. कार्यक्षेत्री व व्यवसायात थोडा चढ-उतार येईल. परिणामतः काही प्रमाणात कमी फळ मिळू शकते. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येण्याची शक्यता असल्याने विशेष लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वयात काहीशी उणीव भासेल. एखादा छोटा किंवा मोठा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास मनोरंजनास व आरामासाठी चांगला असू शकतो. प्रवास करून नवीन अनुभवाचा आनंद मिळू शकतो. संतुलित राहून ध्येयाकडे मार्गक्रमण करावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काम व प्रकृती ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता भासली तर जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

सिंह: सुख, शांती व लाभप्रद होण्याची संभावना आहे. कामे अनेक दिवसांपासून खोळंबली होती ती एखाद्या मित्राच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकतील. व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकता. सुख-सुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना सावध राहावे. कार्यक्षेत्री मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठ कामगिरीची प्रशंसा करतील. आई-वडिलांचे सुख व सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य संभवते. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या: कार्यक्षेत्री अतिरिक्त कामाचा भार जाणवेल व त्याची पूर्तता करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. व्यवहारात व व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन करावे लागेल. तसे करू शकलात तर कठीणात कठीण कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. एखादा महत्वाचा कौटुंबिक निर्णय घेताना कुटुंबियांवर तो लादण्यापूर्वी त्यांच्या भावना व अपेक्षांचा विचार करावा लागेल. प्रकृतीवर व संबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. व्यस्त कार्यातून जोडीदारासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करावा.

तूळ: एखाद्या कार्यशाळेत किंवा प्रकल्पात मोठे यश मिळण्याची संभावना असून त्याने खुश व्हाल. कारकीर्द किंवा व्यापारानिमित्त दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. नोकरीत इच्छित ठिकाणी पदोन्नती किंवा बदली होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक करताना सतर्क राहून त्यातील जोखीम समजून घ्यावी. जुगार किंवा लॉटरीपासून दूर राहणे आपल्याच हिताचे होईल. कुटुंबीयांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. अचानकपणे वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास किंवा सहलीस जाण्याचे आयोजन होऊ शकते.

वृश्चिक: कामाच्या बाबतीत काहीसा आव्हानात्मक काळ असू शकतो. जास्त धावपळ करावी लागू शकते. असे असले तरी कालांतराने सर्व समस्या दूर होऊन कार्यात अपेक्षित यश मिळेल. कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी शुभ फलदायी होऊ शकतो. कार्यक्षेत्री विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. सहकाऱ्यांच्या बरोबर राहून कामे करावी लागतील, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतकेच नव्हे तर त्यामुळे प्रतिमा मलीन होऊ शकते. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे लागेल. दिनचर्या सांभाळून आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील.

धनु: वेळेवर व आर्थिक नियोजनावर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घराची दुरुस्ती किंवा सुख सोयींसाठी वस्तूंची खरेदी कराल तेव्हा आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा. अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. मित्रांना व कुटुंबियांना भेटून त्यांच्याशी संबंध दृढ करण्यावर भर द्यावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. योगासनासाठी थोडा वेळ काढावा. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराशी अधून-मधून लटके वाद होऊ शकतात. प्रेम व सहकार्य टिकून राहील.

मकर: सतर्क व संयमित राहावे लागेल. आळस व निष्काळजीपणा सोडावा लागेल. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. व्यवसायात तीव्र स्पर्धेस सामोरे जावे लागण्याची संभावना असल्याने सतर्क राहावे लागेल. संबंधित विषयांवर क्षणिक फायद्याऐवजी दूरवरचे नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबींवर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जमीन, घर किंवा वाहन इत्यादींची खरेदी करताना कुटुंबियांच्या सल्ल्याकडे लक्ष द्यावे. बुद्धिपूर्वक निर्णय घ्यावा. वाणीवर नियंत्रण ठेवावे व कटू शब्द टाळावे. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी जोडीदार सहकार्य देऊन बाजू सावरून घेईल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीविषयी काहीसे चिंतीत होण्याची संभावना आहे.

कुंभ: कमकुवत बाजू शत्रू समोर उघड करू नये, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबीय बरोबर राहतील. बहुतांश वेळ धार्मिक-सामाजिक कार्यात व्यतीत होऊन मान-प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास सुखद व लाभदायी होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होऊ शकते, ज्याचा भविष्यात लाभदायी योजना तयार करण्यात मदत होऊ शकेल. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी परस्पर समन्वय साधावा लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत कराल.

मीन: संयमित राहावे लागेल. कार्यात यशस्वी होण्यासाठी संयमात व योग्य दिशेत राहावे लागेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालविला तर घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. यशाची सुखद बातमी मिळू शकते. परीक्षा व स्पर्धेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. महिला बहुतांश वेळ पूजा-पाठ व धार्मिक प्रवृत्तीत व्यतीत करतील. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. स्वतःची काळजी घ्यावी लागेल. स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. योग्य आहार घ्यावा.