Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : १३ ते १९ नोव्हेंबर २०२२; प्राप्तीत वाढ होईल, विद्यार्थ्यांनाही उत्तम परिणाम मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:04 PM2022-11-13T12:04:02+5:302022-11-13T12:09:23+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष - आठवड्याच्या सुरवातीस आपण आपला बहुतांश वेळ आपल्या मित्रांच्या सहवासात घालवाल. ह्या आठवड्यात नातेवाईकांची भेट सुद्धा संभवते. प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. व्यापारात शीघ्र गतीने प्रगती होईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यक्षमतेची प्रशंसा करेल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी थोडा ताप येण्याची संभावना आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण खूप मेहनत कराल, व त्याने प्रभावित होऊन आपले विरोधक सुद्धा आपली प्रशंसा केल्या शिवाय राहणार नाहीत. आपण काही खर्च कुटुंबियांना न सांगता सुद्धा कराल. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ - आपल्या क्षमतेवर आपला विश्वास असल्याने प्रत्येक गोष्टीत आपण अग्रस्थानी राहाल. कोणावर अवलंबून न राहता आपण सर्व कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. सांघिक काम केल्याचा सुद्धा आपणास फायदा होऊ शकतो. व्यवसाय करण्याची संधी मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आपली प्रशंसा सुद्धा होईल. प्रकृती चांगली राहील. आपला वैवाहिक जोडीदार आपणास आपल्या कामात मदत करेल. ते आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा घेतील. त्यामुळे आपल्या मनात त्यांच्याप्रती प्रेम वाढून आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद होईल. आपल्या संबंधात रोमांस भरलेला असेल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात सुखद परिणाम मिळतील.

मिथुन - आठवड्याच्या सुरवातीस आपण अत्यंत उर्जेसह सर्व कामे खूपच उत्तम प्रकारे करू शकाल. आपणास कार्यात यश प्राप्त होईल. प्रकृती चांगली राहील. आपली पगारवाढ संभवत असल्याने नोकरीत तटस्थतेने काम करावे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा चांगले परिणाम मिळतील. खर्च वाढतील. हौसमौज पूर्ण करण्यासाठी काही खर्च होतील. घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी कराल, ज्यामुळे आपल्या सुखसोयीत वाढ होईल. आपणास आपल्या कामात कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपल्या प्राप्तीत वाढ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगल्या व समजूतदार व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित करावे. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कर्क - आठवड्याच्या सुरवातीस आपण एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊन चिंतीत व्हाल. त्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. परंतु, आपण जर शांत राहून काम केलेत तर सर्व कामे हळूहळू पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. त्यांच्या जवाबदारीत वाढ झाल्याने कामात काही त्रुटी राहण्याची संभावना आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी कोणतेही बेकायदा कृत्य करू नये. अन्यथा अडचणीत सापडावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या मधाळ शब्दाने प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. आपल्यात रोमांस राहिल्याने संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. ते नवीन विषय शिकू शकतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

सिंह - आपल्या प्राप्तीत शीघ्र गतीने वाढ होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपणास मित्रांकडून एखादा लाभ संभवतो. प्रकृती चांगली राहील. कार्याच्या बाबतीत आपण समजूतदारपणा दाखवून वाटचाल केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती पूजा समजून आपली कामे करतील. त्यामुळे त्यांना चांगला लाभ होईल. त्यांना शासनाकडून सुद्धा लाभ होऊ शकतो. आपले वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपण आपल्या कामात मग्न राहाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या कुटुंबास प्रगती पथावर नेऊन ठेवाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन करू शकाल. कुटुंबात आनंद पसरेल. घरात काही सुखसोयी वाढल्याने कुटुंबीय आनंदित होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या - आपण आपल्या घरा संबंधी एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल, किंवा आपणास घर बनविण्याची इच्छा होऊ शकेल. आपण नवीन घराची खरेदी सुद्धा करू शकाल. आपले कौशल्य आपल्या उपयोगी येईल. कुटुंबियांना आपल्या सल्ल्याची गरज भासेल, व त्यामुळे कुटुंबात आपली प्रतिमा उंचावेल. आपणास कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल. कुटुंबातील लहान व्यक्तींशी आपला उत्तम समन्वय राहील. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुद्धा सुखद होईल. व्यापाऱ्यांना वेळेवर कर भरणा करावा लागेल. अन्यथा एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात व्यस्त राहतील. आपण वाद - विवादात यशस्वी व्हाल. वकिली व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले यश प्राप्त होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ - आपणास गत स्मृतीत रमून जाण्यास आवडेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदारासह फिरावयास जाण्याची एखादी योजना आखू शकतील. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात विचारपूर्वक वागावे लागेल. आपल्या प्रेमिकेस संबंधात नीरसता जाणवेल. आपणास हि नीरसता दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी तिला फिरावयास किंवा रात्री भोजनास घेऊन जावे. आपली प्रकृती चांगली राहिली तरी मनःस्थिती थोडी चांगली नसल्याने काळजी घ्यावी. आपले काही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाप्रती निष्ठा बाळगावी लागेल. आपणास आठवड्याच्या मध्यास चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. नफा चांगला झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यांना एखाद्या विद्वान व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्याने अभ्यासात चांगली प्रगती होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

वृश्चिक - आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. शक्य असल्यास जवाबदारी सोपविणाऱ्या व्यक्तीस थोडे थोपवावे. आठवड्याच्या मध्यास आपणास खूप चांगले परिणाम मिळतील. आपणास नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात सामान्य फळे मिळतील. आपणास आपल्या वाढीव खर्चाची काळजी वाटत राहील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आपला व्यावसायिक भागीदार व्यवसाय वाढविण्यात महत्वाचे योगदान देईल. त्यामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहिले तरी आता आपल्या संबंधात रोमांस वाढू लागेल. त्यामुळे संबंधात नावीन्य निर्माण होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आपणास आपल्या प्रेमिकेस भेटून तिच्याशी बराच वेळ गप्पा मारण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु - आपली प्रकृती चांगली राहील. खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती चांगली झाल्याने आपणास वाढीव खर्चाची काळजी वाटणार नाही. आपण हौसमौज करण्यासाठी खूप खर्च कराल. जीवनाचा आनंद घेण्यास प्राधान्य द्याल. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंद राहील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण काही नफाकारक सौदे केल्याने आपले मनोबल उंचावेल. आपण आपले कार्य दृढ निश्चयाने कराल. आपल्या व्यावसायिक भागीदाराशी वाद होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा यश प्राप्तीचा आहे. आपण एखादी सिद्धी प्राप्त करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस खुश करू शकतील. ते आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी नवीन आशा घेऊन येणारा आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर - नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. आपल्या कामास गती येईल. आपली मेहनत यशस्वी होईल. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता व कार्यक्षमता आपणास चांगले परिणाम मिळवून देईल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही नवीन लोकांशी मैत्री करावी लागेल. आपणास आपल्या व्यवसायासाठी शासकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपण वैवाहिक जीवनातील तणावातून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. आपल्या दोघांचे प्रयत्न यशस्वी होऊन संबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांच्या जीवनात प्रेम व समन्वय असल्याचे दिसून येईल. आपल्या संबंधांचे सौंदर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रकृतीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ - आपल्या प्रणयी जीवनातील तणाव भविष्यात गंभीर स्वरूप धारण करण्याची संभावना असल्याने आपणास आपले प्रणयी जीवन सुखद करण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. भांडणा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रेमिकेस खुश करण्यासाठी एखादी सुंदरशी भेट द्यावी. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या संबंधात प्रेम वाढेल. एकमेकांसह एखादा प्रवास करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. बढतीची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अपेक्षेहून अधिक चांगला असेल. आपणास चांगले परिणाम मिळतील. आपणास मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील प्रगतीसाठी एखादा मागर्दर्शक मिळेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

मीन - आपणास आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांना आपली गरज भासू शकते. आपण आपल्या नोकरीप्रती खूपच गंभीर व्हाल. आपल्या हातून चुक होणार नाही यासाठी प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. परंतु, त्यांना आपले काम अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवाहितांच्या जीवनात ईश्वर कृपेने प्रेम टिकून राहील. परंतु, आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आपण व्यथित होण्याची संभावना आहे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात समाधानी राहतील. आपल्या दोघांत मतभेद होण्याची संभावना असली तरी आपल्या हाती प्रेमाची दोरी असल्याने हे मतभेद दूर करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येऊन सुद्धा काही लाभ मिळू शकतील. आपण अभ्यास व मनोरंजनासाठी वेळ काढू शकाल. आपण मित्रांच्या मदतीने अभ्यासात प्रगती करू शकाल. आपली प्रकृती नरम - गरम राहण्याची संभावना आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.