Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य - १६ ते २२ ऑक्टोबर २०२२; आत्मविश्वास द्विगुणीत होईल, व्यवसायातही नफा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:46 AM2022-10-16T11:46:06+5:302022-10-16T11:51:30+5:30

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा..., काय सांगते तुमची राशी...

मेष - हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः चांगला आहे. अपेक्षित परिणाम मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आपला आत्मविश्वास द्विगुणित झाल्याने आपण आपली कामे जलदगतीने पूर्ण करून यशस्वीपणे पुढील वाटचाल कराल. आपणास व्यवसायात सुद्धा नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचा पाठिंबा व प्रेम मिळाल्याने कामात यश प्राप्त होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण एखादे जोखीम पत्करण्याचा प्रयत्न सुद्धा कराल, व आपल्या व्यवसायास प्रगतीपथावर नेऊन ठेवाल. हा आठवडा आपणास व्यवसायात गुतंवणूक करण्याची प्रेरणा देईल. बँकेचे कर्ज फेडण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपली प्रेमिका आपले हृदय जिंकण्यात यशस्वी होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. तेव्हा त्यांना हिंमत ठेवावी लागेल. 

वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपणास चांगली प्राप्ती झाल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. आपला आत्मविश्वास वाढेल. आव्हानाने आपण घाबरून जाणार नाही. ह्या उलट त्यांचा निश्चिन्तपणे सामना कराल. कायद्याशी संबंधित कार्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना खूप मेहनत केल्यावरच चांगले परिणाम मिळू शकतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण कार्यात प्रगती करू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात हा आठवडा महत्वाचा आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. प्रेमीजनांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल. संबंधात रोमांस व प्रेम राहील. आपल्यात उत्तम संवाद राहिल्याने संबंधात परिपकवता येईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे.

मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखाद्या ठिकाणाहून मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आपण एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकाल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्च कमी होतील. प्रकृती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना सहजपणे कामे करता येतील. प्रत्येक काम जलदगतीने पुढे सरकेल. काही कामे कि जी दीर्घकाळा पासून चालत आली आहेत ती थोड्या दिवसांसाठी स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यावर लक्ष द्यावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. स्थावराशी संबंधित कामात आपण यशस्वी व्हाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेवर प्रेम करण्याचा आनंद घेऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल.

कर्क - ह्हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात कोणताही मोठा खर्च करू नये, अन्यथा संपूर्ण आठवडा आर्थिक दृष्ट्या आपणास प्रतिकूल जाईल. मानसिक तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या हाती पैसा येईल. नातेवाईकांची भेट सुद्धा होईल. घराची आर्थिक स्थिती चांगली राहिली तरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आपण जर समाज माध्यमावर सक्रिय झालात तर आपणास खूप फायदा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदारास आपल्या मनातील भावना मोकळेपणाने सांगू शकतील. अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेले विचार त्यांच्या समोर मांडू शकतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा लाभ होईल. ते आपली कामे सहजपणे करून इतरांच्या प्रशंसेस पात्र होतील. व्यापाऱ्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. आपण काही नवे सौदे करू शकाल, मात्र त्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील.

सिंह - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत वृद्धी झाल्याने आपले मन प्रसन्न राहील. खर्चांवर नियंत्रण ठेवून आपण आर्थिक नियोजन कराल, व त्यामुळे आपली आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रकृती उत्तम राहिल्याने आपण अनुकूल वातावरणाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपण कुटुंबियांसह एखादे नवीन कार्य करण्याचा विचार सुद्धा कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायी आहे. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात प्रगती करण्यात यश प्राप्त होईल. असे झाल्याने ते आपल्या कामात नैपुण्य मिळवू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपले प्रणयी जीवन मुक्तपणे जगू शकाल. आपल्या मनात येईल तसे वागाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

कन्या - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्यात आत्मविश्वास भरपूर असल्याने आपण आपल्या प्राप्तीत अजून वाढ करण्याचा विचार कराल. त्यासाठी आपण असे काही मार्ग शोधून काढाल कि ज्यामुळे आपणास चांगला पैसा मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवतील. आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. तसेच आपल्या व्यक्तिगत जीवनात समतोल सुद्धा साधू शकाल. त्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी आनंदात राहाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. आपल्या कल्पनेतील प्रेम व रोमांस आपल्या संबंधात प्रत्यक्षपणे आपणास पाहावयास मिळेल. असे झाल्याने आपण सहजीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रेमीजन काहीसे निराश होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना आपल्या प्रेमिकेचे प्रेम मिळू शकणार नाही. परंतु, निराश होऊ नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील.

तूळ -हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने प्रत्येक कार्यात आपण यशस्वी व्हाल. कार्यालयात आपली प्रतिमा उंचावेल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. प्राप्ती सामान्यच राहील. खर्चात वाढ होईल. आपण दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या संबंधांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील. व्यापारी आपले कार्य पुढे नेऊ शकतील. आपणास काही नवीन ऑर्डर्स मिळण्याची संभावना आहे. प्रकृतीत चढ - उतार येतील. आपल्या आहारावर लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना एखाद्या मार्गदर्शकाच्या हाताखाली अभ्यास करण्याचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी आदराने बोलावे. विरोधकांपासून सावध राहावे.

वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रॉपर्टीचा सौदा करण्यात चांगला पैसा मिळवू शकाल. आपणास जर नवीन प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यात आपण यशस्वी व्हाल. परंतु, आपणास काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. आपणास मानसिक त्रास संभवतो. आपणास वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपल्या सासुरवाडी कडील व्यक्तींना भेटून आपणास त्यांच्याशी बोलावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात पुढे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. त्यामुळे आपले काम इतरांच्या नजरेस चढेल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. विरोधकांवर आपले वर्चस्व राहील. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. 

धनु - हा आठवडा आपणास चांगल्या यश प्राप्तीचे संकेत देत आहे. व्यवसाया संबंधी आपण नशीबदार असाल. अनेक प्रकारे आपल्या व्यवसायात वृद्धी होईल. आपणास जर आपल्या व्यवसायाचा विस्तार दूरवरच्या ठिकाणी किंवा राज्यात करावयाचा असेल तर त्यात आपण यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपली मेहनत फलद्रुप होऊन आपणास चांगले परिणाम मिळताना दिसून येईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. आपण मित्रांच्या साथीने नवा व्यवसाय किंवा प्रॉपर्टीची देवाण - घेवाण करण्याचा विचार करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या रचनात्मकतेमुळे आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात थोडा गोंधळ उडेल. आपल्या काही शंका दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 

मकर - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असून तणावात वाढ करणारा आहे. अनेक बाबतीत निर्णय न घेऊ शकल्याने आपण व्यथित व्हाल. त्यामुळे आपली बेचैनी वाढेल. ह्या आठवड्यात आपले खर्च सुद्धा वाढतील. त्यामुळे आपल्या प्राप्तीवर लक्ष करताना आपणास आपल्या आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा लक्ष केंद्रित करावे लागेल. नोकरी करणाऱ्यांनी कामातील नीरसता दूर करण्यासाठी थोडी विश्रांती घ्यावी. काही नवीन कामे हाती घेण्याचा प्रयत्न करावा. ह्यासाठी आपल्या वरिष्ठांशी आपण बोलणी करू शकता. व्यावसायिक हेतूने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात आनंदित होतील. आपली प्रेमिका हि आपल्या कल्पनेनुसार असल्याचे आपणास जाणवेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह लांब पल्ल्याच्या प्रवासास जाऊ शकाल. आपणास संपत्ती खरेदी करण्यात लाभ होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल.

कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण प्रवास करून अनेक क्षेत्रात चांगले परिणाम मिळवाल. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. कायदेशीर कारवाई पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा अडचणीत सापडू शकाल. खर्चात वाढ होईल. आपणास कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीचे सहकार्य मिळेल. त्यामुळे आपल्या कामात खूप फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. प्रेमीजन सुखद क्षणांचा आनंद घेतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या नफ्यात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होतील. ते वेळापत्रक बनवून आपल्या अभ्यासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. 

मीन - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास स्थावराशी संबंधित कार्यात यश प्राप्त होईल. आपण आपले घर बनविण्याची सुद्धा संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाप्रती जागरूक राहून उत्तम प्रकारे आपली कामे करतील. व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन योजनांची अंमल बजावणी करण्याचा व प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी ते अनुभवी व्यक्तीचा सल्ला व मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतील. कौटुंबिक जीवन सुखद होईल. आपल्या आईची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्या आहारावर लक्ष ठेवावे. शिळे पदार्थ खाऊ नये. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराशी सलोखा साधण्याचा प्रयत्न करून त्यात यशस्वी सुद्धा होतील. ह्या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकतील. तिच्यासाठी सुंदर वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.