साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:56 PM2024-11-17T15:56:11+5:302024-11-17T16:09:19+5:30

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, रवी आणि बुध वृश्चिक राशीत, शुक्र धनू राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील. १८ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. २१ रोजी दुपारी ३:३६ पर्यंत गुरुपुष्यामृत आहे. २३ रोजी कालभैरव जयंती, कालाष्टमी आहे.

या आगामी काळात कोणत्या राशीवर काय प्रभाव राहू शकेल? कोणत्या राशींना लाभ होतील? कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा शुभ फलदायी असण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल असा एखादा अचानक धनलाभ होऊ शकतो. कारकीर्द व व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन प्रगती उंचावेल. व्यवसायात आशास्पद प्रगती होत असल्याचे दिसेल. असे असले तरी आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. इतरांवर लक्ष ठेवावे लागेल. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमिकेवरील प्रेमात व सामंजस्यात सुधारणा होईल. दांपत्य जीवन सुखद होईल. मुलांशी संबंधित एखाद्या समस्येचे निराकरण झाल्याने संतुष्ट व्हाल.

वृषभ: ह्या आठवड्यात जीवनातील विविध पैलूंवर विचार करावा लागेल, अन्यथा अविचाराने एखादे पाऊल उचलण्याने विनाकारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपली कामे वेळेवर करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न व परिश्रम करावे लागतील. कामाचा बोजा जास्त असेल. अशा वेळी मित्रांचे सहकार्य अपेक्षेहून कमीच मिळेल. व्यापाऱ्यांसाठी सुरुवात काहीशी प्रतिकूल झाली तरी आठवड्याच्या अखेरपर्यंत झालेला अनपेक्षित लाभ आनंदास कारणीभूत होईल. जमीन-घर ह्या संबंधित वाद चिंतेचे मुख्य कारण होऊ शकते. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

मिथुन: हा आठवडा संघर्षमय असू शकतो. मेहनत व संघर्ष यशाच्या मार्गावर नेऊन सोडेल. सुखद परिणाम मिळतील. कामानिमित्त जवळचा किंवा दूरवरचा एखादा प्रवास संभवतो. बाहेरची कामे करणाऱ्यांना मानसिक तणावाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात योग्य प्रमाणात लक्ष द्यावे लागेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. एखादी भेटवस्तू मिळू शकते. दांपत्य जीवन सुखद होईल. एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मदतीसाठी सहकार्य करेल.

कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे मन खिन्न होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या प्राप्तीच्या साधनांवर गदा येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांना कडवी झुंज द्यावी लागू शकते. कामे वाढतील. महिलांना कार्यालय व घर ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारासाठी थोडा वेळ काढावा लागेल. कोणतेही पाऊल विचारपूर्वकच उचलावे लागेल. अन्यथा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सिंह: हा आठवडा चांगले परिणाम घेऊन येत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ असेल. दीर्घ काळापासून जमीन-घर खरेदी करण्याचा विचार करत असलात तर इच्छापूर्ती होऊ शकते. पदोन्नती व धनलाभ संभवत आहे. वरिष्ठांशी आपला संपर्क वाढेल. अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत निर्माण होऊन संचित धनाची वृद्धी होईल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना उच्च पद प्राप्तीची संधी मिळू शकते. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या संपर्कात याल, ज्याच्या सहकार्याने प्रगतीच्या मार्गात मदत होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमाचे रूपांतर विवाहात होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.

कन्या: ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री सतर्क राहावे लागेल. मोठी कारकीर्द किंवा मोठ्या व्यवसाया संबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. निर्णय घेणे जमत नसेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा किंवा निर्णय पुढे ढकलावा. प्राप्तीचे प्रमाण कमी होऊ शकते. खर्च वाढू शकतात. अंदाजपत्र कोलमडू शकते. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. व्यावसायिकांनी कोणत्याही नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सतर्क राहावे. कठीण प्रसंगी प्रेम संबंध सहाय्यक होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.

तूळ: हा आठवडा सुख-समृद्धी घेऊन येत आहे. सुख - सुविधांशी संबंधित वस्तूंच्या खरेदीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दीर्घ काळापासून बदलीची किंवा पदोन्नतीची प्रतीक्षा करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. प्राप्तीच्या साधनात जशी वाढ होईल तशीच वाढ खर्चात होईल. व्यवसायातील अनपेक्षित लाभ आनंदात भर घालेल. मित्रांच्या सहकार्याने एखादे मोठे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. जोडीदारास मिळालेली एखादी सिद्धता कुटुंबाच्या आनंदात महत्वाची कामगिरी बजावेल.

वृश्चिक: ह्या आठवड्यात कौटुंबिक मतभेद व तणावास सामोरे जावे लागू शकते, तेव्हा बोलताना चुकीचे शब्द व वागणूक ह्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नवीन कार्याची योजना बनविण्यात मदत होईल. परदेशात कारकीर्द घडविण्यास किंवा व्यापार करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा मान राखावा. विनाकारण झालेल्या धावपळीमुळे व खर्चांमुळे मन काहीसे उदास राहू शकते. कार्यक्षेत्री विरोधकांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. लक्ष्यांक गाठण्यासाठी अधिक परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. अडचणी येऊनही धन प्राप्तीची साधने मिळतील. सत्ता-सरकारशी संबंधित स्थगित झालेल्या कामात प्रगती होत असल्याचे दिसून येईल. ह्या दरम्यान धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीत सहभाग वाढेल. असे असले तरी ह्या कार्यात कोणत्याही प्रकारे मतभेद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी आपले मतभेद होऊ शकतात. एखाद्या मित्राच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर: धनलाभ व उन्नतीच्या उत्तम संधीचा आठवडा जाऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरू शकतो. सामाजिक मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण सुखावह होईल. रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरात एखादे शुभ कार्य संपन्न होण्याची संभावना आहे.

कुंभ: काही समस्या येऊ शकतात. समस्या दूर करण्यासाठी मित्रांचे व कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. हे समस्याग्रस्त दिवस दीर्घ काळ राहणार नसल्याचे लक्षात ठेवावे. कारकिर्दीशी व व्यापाराशी संबंधित प्रवास करावे लागू शकतात. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने सत्ता व सरकारशी संबंधित स्थगित झालेली कामे पूर्ण होतील. सुख - सोयींशी संबंधित विषयांवर जास्त खर्च करावा लागू शकतो. वैवाहिक जोडीदाराच्या सिद्धतेमुळे प्रसन्नता जाणवेल. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. व्यापारी वर्ग बाजारातील तेजीचा लाभ घेऊ शकतील. त्यांची पत वाढेल व बाजारात प्रगती होईल.

मीन: हा आठवडा शुभ व लाभदायी आहे. कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती होण्याची संभावना आहे. इतरांचे सहकार्य मिळाल्याने लक्ष्यांक गाठू शकाल. चांगली बातमी मिळण्याची संभावना असून त्यामुळे घरात आनंद पसरेल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास धनवृद्धी व व्यवसायवृद्धी करण्यास मदतरूप होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत मिळून त्यांच्या संचित धनाची वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य संपन्न होऊ शकते, जे सुखद व शुभ असेल. खूप सुख व समृद्धी प्राप्त होईल.