साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:52 IST2025-04-20T11:39:28+5:302025-04-20T11:52:35+5:30

Weekly Horoscope: २० एप्रिल २०२५ ते २६ एप्रिल २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: ग्रहस्थिती अशी- रवी मेष राशीत, गुरू व हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. बुध, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण धनू, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील.

या सप्ताहात सोमवारी कालाष्टमी आहे. गुरुवारी वरुथिनी एकादशी, वल्लभाचार्य जयंती, तर शुक्रवारी प्रदोष आहे. तसेच शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा स्मरण दिन आहे. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली होती. संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी आहे.

मंगळवारी उत्तर रात्री १२.३१ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार पंचक असून, शनिवारी उत्तर रात्री ३.३९ पर्यंत पंचक राहील. या कालावधीत कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या....

मेष: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त स्थितीत व्यतीत होईल. जोडीदार क्रोधीत होण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांची वागणूक आवडणार नाही. अशा परिस्थितीत शांत राहावे. काम बिनचूक व्हावे ह्यासाठी कामे लक्षपूर्वक कराल व त्याचे चांगले फळ मिळेल. कामगिरीने वरिष्ठ संतुष्ट होतील. ते आपले भले कसे करता येईल ह्याचा विचार करू लागतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल नसल्याने त्यांना व्यवसायावर अधिक लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय पाठीशी राहतील. ह्या आठवड्यात हाता बाहेर झालेले खर्च काळजीस कारणीभूत ठरतील. आठवड्याच्या मध्यास प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल.

वृषभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना आपसातील मतभेद विसरून एकमेकांना मदत करावी लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. त्यांच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळू शकतील. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. असे असले तरी इच्छापूर्ती करण्यासाठी काही खर्च करू शकता. त्यामुळे सुख-सुविधेत भर पडेल. प्राप्ती सामान्यच होईल. प्रकृतीत चढ-उतार येत असल्याने काहीसे चिंतीत व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मिळू शकेल. त्यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासात प्रगती करू शकता. हा आठवडा प्रवासास प्रतिकूल असल्याने प्रवास करणे टाळावे.

मिथुन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य परिणाम मिळून ते प्रगती करतील. इतरांच्या प्रशंसेस पात्र ठरतील. व्यापाऱ्यांना शासनाकडून एखादा मोठा लाभ होऊ शकतो. ह्या आठवड्यात वाढते खर्च काळजीस कारणीभूत ठरतील. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपल्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्राप्ती सामान्यच असेल. विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरळीत होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याने काही त्रास सुद्धा होऊ शकतो.

कर्क: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामास गती येईल. ह्या आठवड्यात एखाद्या ठिकाणी बदली व पदोन्नती होऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम बघावयास मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही नवीन काम हाती घेतल्यास त्यात समस्या उद्भवू शकतात. तेव्हा त्यांना टाळावे. आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. भाग्याच्या प्रबलतेमुळे कामांना गती येईल. प्राप्तीत वाढ होईल. मनोरंजनात वेळ घालवू शकाल. मित्रांच्या सहवासात फिरण्याची किंवा मौज-मजा करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याचा त्रास होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.

सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात प्रेमिकेसमक्ष मन मोकळे करण्याची संधी मिळाल्याने नाते अधिक दृढ होईल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन नाते सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचा फायदा होईल. त्यांच्यी योग्यता त्यांना अग्रस्थानी ठेवेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात स्थैर्य राखावे लागेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. प्राप्तीत वाढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी अभ्यासाची उजळणी करावी लागेल. तसेच मेहनत वाढवावी लागेल.

कन्या: हा आठवडा अंशतः फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या नात्यात जबाबदारीपूर्वक मार्गक्रमण करून सामंजस्याचा परिचय द्याल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. एखादा व्यापार करत असाल तर आर्थिक लाभ होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सुरुवातीस प्राप्तीत जलद गतीने वाढ होईल. परंतु आठवड्याच्या मध्यास काही खर्च वाढू लागतील. आठवड्याच्या अखेरीस स्वतःकडे लक्ष द्याल. स्वतः सुंदर दिसण्यास प्राधान्य द्याल. काही नवीन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. त्यांची मेहनत दिसून येईल.

तूळ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा ठीक आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. अत्यंत रोमँटिक व्हाल. वैवाहिक जोडीदार आकर्षित होईल. आपसातील आकर्षणामुळे नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांची कामे सुरळीत होतील. ते सहजपणे कामे पूर्ण करू शकतील. प्रतिमा उजळून निघेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोठा लाभ होईल. ते एखाद्या व्यक्तीशी भागीदारी करू शकतात. जर आधीपासूनच भागीदारीत व्यवसाय करत असाल तर एखादी नवीन भागीदारी होऊ शकते. ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम करण्याचा निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. स्पर्धेत यश प्राप्त होईल.

वृश्चिक: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य असला तरी प्रेम खरे असल्याने नाते अधिक दृढ होईल. प्रेमिकेस खुश करण्याचा प्रयत्न कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत रोमँटिक होईल. नात्यात खूप आकर्षण असल्याचे जाणवेल. नोकरी करणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल. व्यापाऱ्यांना लाभ होईल. मात्र त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीस कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. त्यात नुकसान होण्याची संभावना आहे. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रतिकूल असल्याने ती टाळणे हितावह होईल. कामाच्या बाबतीत आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे आले तरी उत्तम प्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळेल.

धनु: आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक दबावाखाली वाटचाल कराल. परंतु एखाद्या गोष्टीने मन काहीसे खुश होईल. त्याच्या जोडीने थोडी काळजी दाखवाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा बरेच काही घेऊन येत आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या नात्याच्या बाबतीत गंभीर होतील. वैवाहिक जोडीदारावर मोकळेपणाने प्रेम करतील. व्यक्तिगत जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चढ-उत्तर होत असल्याची जाणीव होईल. तेव्हा त्यांना जास्त दक्षता घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांची कामे जलद गतीने मार्गक्रमण करतील. खर्च त्रस्त करण्याची संभावना असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. प्राप्तीत कपात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश प्राप्त होईल. स्पर्धेत त्यांची निवड होण्याची संभावना आहे.

मकर: हा आठवडा उत्तम फलदायी आहे. प्रेमीजन ह्या आठवड्यात अत्यंत खुश राहतील. प्रेमिकेची बुद्धिमत्ता पसंतीस उतरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. फायदा होईल. एखादी अशी गोष्ट वैवाहिक जोडीदार सांगून ती करण्यास प्रेरित करेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना बोलावू शकाल. अशी एखादी लहान-सहान पार्टी करू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच प्राप्तीत तेजी राहील, जी आठवड्याच्या मध्यास खर्च करण्यास भाग पाडेल. आठवड्याच्या मध्यास भरपूर खर्च केलात तरी काही त्रास होणार नाही. कुटुंबात सुख-शांती नांदेल. विद्यार्थी अभ्यासाप्रती गंभीर होतील. त्यामुळे ते उत्तम कामगिरी करू शकतील. कामे चांगली होतील.

कुंभ: हा आठवडा ख़ुशी घेऊन येणारा आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. प्रेमिकेसमोर सहजपणे मन मोकळे करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने दक्षता घ्यावी. मित्रांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात दृढ राहून मार्गक्रमण करतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते स्वतःहून काम करण्यास प्राधान्य देतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. प्रयत्न उठून दिसतील. आहारावर लक्ष ठेवावे.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन सर्जनशीलतेमुळे प्रेमिकेचे हृदय जिंकण्यात यशस्वी होतील. त्यांना त्यांची प्रेमिका एखादी चांगली भेटवस्तू देऊ शकते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात जोडीदारापासून खुश असल्याचे दिसून येईल. त्यांना योग्य जोडीदार निवडल्याची खात्री वाटेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती काम अजून चांगले व्हावे म्हणून एखादा नवीन कार्यक्रम हाती घेऊ शकतात. व्यापाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा मिळेल. एखाद्या व्यापारी संघटनेत पद मिळू शकते. मनात काही धार्मिक विचार येतील. घरात एखादे मंगल कार्य होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीस मुलांच्या बाबतीत अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होईल. काही विरोधक त्रास देऊ शकतात. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे अखेरचे दिवस अत्यंत चांगले आहेत. प्रकृती व आहार यांच्यावर लक्ष ठेवावे.