सर्वोत्तम काळ: ९ राशींना लाभच लाभ, प्रॉपर्टी, गुंतवणुकीतून फायदा; पदोन्नतीसह व्यापारात यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:00 AM2023-08-21T07:00:07+5:302023-08-21T07:00:07+5:30

ऑगस्टचा हा आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसांत कोणत्याही ग्रहाचे राशीपरिवर्तन नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कर्केत, रवी आणि बुध सिंहेत, मंगळ कन्येत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील. रविवारी विनायकी चतुर्थी झाल्यानंतर सोमवारी नागपंचमी, मंगळवारी श्रिया षष्ठी, बुधवारी सीतला सप्तमी आहे. गुरुवारी दुर्गाष्टमी आणि दूर्वाष्टमी आहे. त्यासह बुध-बृहस्पति पूजन आहे. शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजनासह वरदलक्ष्मी व्रत आहे. शनिवारी अश्वत्थमारुती पूजन आहे.

श्रावणारंभ झाला असून, २१ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार, तर २२ रोजी पहिली मंगळागौर आहे. एकूण ग्रहमान आणि श्रावणातील शुभ व्रत-वैकल्यांचा हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

मेष: वैवाहिक जोडीदार आजारी पडण्याच्या शक्यतेमुळे काहीसे चिंतीत होण्याची संभावना आहे. नोकरीच्या ठिकाणी स्थिती चांगली असेल. कामात यश प्राप्ती होईल. तसेच ज्या कामांची जवाबदारी सोपविण्यात येईल ती कामे वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे खुश व्हाल. व्यापारात चढ - उतार येतील. ते पार करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. घरातील वातावरण आनंदमय राहील. घरात काही सोयी करण्यासाठी घरगुती खर्चांवर लक्ष द्याल. काही नवीन व आवश्यक सामानाची खरेदी संभवते. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. बुद्धी विकसित होईल. अभ्यास करणे सोपे होईल.

वृषभ: खूपच चांगला काळ आहे. आर्थिक स्थिती उंचावण्यास ग्रहस्थितीची मदत होऊ शकेल. एखादी संधी मिळेल, ज्यामुळे प्राप्तीत जलदगतीने वाढ होऊ लागेल. व्यापारासाठी खूपच चांगला काळ आहे. व्यावसायिक भागीदार उत्तम समन्वय साधून चांगली कामगिरी करून दाखवेल. असे झाल्याने प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी काळ आहे. जे विद्यार्थी तांत्रिक किंवा मॅनेजमेंट विषयांचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. इतर विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे. फक्त वादापासून दूर राहावे. वैवाहिक जीवनासाठी अनुकूल. मित्रांशी सलोखा राहील.

मिथुन: आगामी कालावधी चांगला आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल असला तरी त्यांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. असे न केल्यास विनाकारण वाद वाढून नोकरीत अडचणी येऊ शकतात. व्यापाऱ्यांना प्राप्तीचे काही नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतील. प्रयत्नांमुळे व्यापारास गती येईल. व्यावसायिक भागीदारीत सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदार कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करेल. मित्रांची मदत घेऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

कर्क: नवीन परिणाम घेऊन येणारा कालावधी आहे. कार्यक्षमता व जोखीम घेण्याची क्षमता दोन्ही वाढतील. आत्मविश्वास उंचावेल. असे झाल्यामुळे व्यापारात काही नवीन प्रयत्न करून त्या प्रति अत्यंत आशावादी राहाल. नोकरीसाठी चांगला काळ आहे. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. कामगिरीत सुधारणा होईल. खुश असाल. जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात रोमांस तर वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह: प्रॉपर्टीतील गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीतून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. तंदुरुस्तीवर लक्ष देऊन सकाळच्या व्यायामास जीवनशैलीत समाविष्ट कराल. खर्चात वाढ होईल. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. काही नवीन सामानांची खरेदी करू शकता. विवाहित व्यक्तींनी वैवाहिक जीवनात अहंकार बाजूस सारल्यास फायदा होईल, अन्यथा विनाकारण भांडण - तंट्यातच वेळ वाया जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. व्यापाऱ्यांनी सरकारी निविदेसाठी अर्ज करावा. मात्र, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी संभाव्य वाद टाळावे. विद्यार्थ्यांसाठी चांगला कालावधी आहे.

कन्या: खूप फायदा होऊ शकेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्त होईल. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मनात क्रोधा व्यतिरिक्त काहीसा मानसिक तणाव उत्पन्न होऊ शकतो. त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. हळूहळू खर्चांवर नियंत्रण येऊ लागेल. प्राप्तीत वाढ होईल व त्यामुळे आनंदित व्हाल. पैसा उपलब्ध झाल्याने सर्व प्रयत्न पूर्ण करू शकाल. एखाद्या महिला मित्राचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. योजना यशस्वी होतील. व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. कामात जो सुस्तपणा जाणवत होता तो आता दूर होईल. कामे जलद गतीने होऊ लागतील. विवाहित व्यक्ती हळूहळू आपल्या वैवाहिक जीवनातील चिंतेतून बाहेर पडून काहीतरी नव्याचा विचार करू लागतील. नात्यात नावीन्य निर्माण करण्यासाठी एक - दोन दिवस एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. अनुकूलता जाणवेल.

तूळ: खर्च वाढू शकतील. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करून आरोग्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा प्रकृती बिघडू शकते. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न कराल. व्यापारासाठी कालावधी अनुकूल आहे. योजना पुढे रेटू शकता. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून खूप परिश्रम करतील. त्याचे सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल.

वृश्चिक: प्राप्तीत अचानकपणे वाढ झाल्याने सर्व चिंता दूर होतील. आर्थिक आव्हाने कमी होतील. असे असले तरी खर्च होतच राहतील. परंतु प्राप्ती चांगली झाल्याने काही फरक पडणार नाही. जर आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित केलेत तर अजून चांगले परिणाम मिळू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या व्यक्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यशस्वी होतील. व्यापाऱ्यांसाठी यशस्वी होण्याचा काळ आहे. कामाचा आनंद घेऊ शकतील. तसेच चांगली अर्थप्राप्ती करू शकतील. व्यापारात चांगला लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन खुलून उठेल. ते एकमेकांना प्रेम व्यक्त करू शकतील.

धनु: प्रॉपर्टीच्या बाबतीत यश प्राप्त होईल. अर्थात जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत लक्ष आकर्षित होईल. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. प्रकृतीत सुधारणा होईल. काही खर्च गुप्त स्वरूपात कराल. सुखसोयींवर लक्ष राहील. नोकरीतील स्थिती मजबूत राहील. पदोन्नती संभवते. अधिकारात वाढ होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलांशी संबंधात कटुता येऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी. व्यापारात चांगली वाढ होत असल्याचे दिसून येईल. प्रयत्न यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतील. संततीसाठी चढ-उतारांचा काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.

मकर: जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी हाती घेऊन त्यात यशस्वी व्हाल. घर भाडयाने देऊन चांगली अर्थप्राप्ती करू शकता. नोकरीत हळूहळू स्थिती मजबूत होऊ लागेल. आपले परिश्रम यशस्वी होतील. व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याने व्यापारास मजबुती येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन रोमँटिक होईल. एकमेकांप्रती प्रेम राहील. विवाहबाह्य संबंध टाळा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्ती होईल.

कुंभ: विनाकारण काही खर्च संभवतात. मानसिक ताण वाढू शकतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मानसिक तणावामुळे प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ मध्यम फलदायी आहे. नोकरीवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी. परिश्रम करा व कामावर लक्ष केंद्रित करा. व्यापाऱ्यांसाठी यश प्राप्तीचा काळ आहे. योजना फलद्रुप होऊन लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे प्रतिकूल असू शकते. जोडीदाराशी वाद संभवतात. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतील.

मीन: अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. वेळापत्रक बनवून मित्रांसह अभ्यास करण्यास चांगला वेळ देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदार फायद्याच्या गोष्टी करेल. फायदा होऊन प्राप्ती वाढेल. खर्चात वाढ होईल. सुखासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. घरात इन्व्हर्टर किंवा धुलाई मशीन इत्यादी वस्तू खरेदी करून आणू शकता. प्रेमीजनांच्या नात्यातील जवळीक वाढून एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतील. व्यापाऱ्यांना अनुकूलता प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाचे चांगले परिणाम मिळतील. प्रकृतीत सुधारणा होईल. (Weekly Horoscope)