Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:50 PM2022-11-20T12:50:30+5:302022-11-20T12:58:05+5:30

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धातील हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात शुभ मानल्या गेलेल्या मराठी वर्षातील मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे. यातच नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति याच आठवड्यात स्वराशीत मार्गी होत आहे. (Weekly Horoscope November 2022)

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास नोव्हेंबर महिन्यात चार महत्त्वाचे बदल झाले आहेत. सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांचे वृश्चिक राशीत आगमन झाले आहे. या तीन ग्रहांच्या वृश्चिक राशीतील प्रवेशाने अनेक प्रकारचे शुभ योग जुळून आले आहेत. याचा अनेक राशीच्या व्यक्तींना आगामी काळात उत्तम लाभ मिळू शकतो.

मराठी वर्षातील शुभ तसेच सर्वोत्तम मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. या आठवड्यात देव दिवाळीही साजरी केली जात आहे. तसेच मार्तंडभैरव षड्रात्रोत्सव सुरु होत आहे. गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशीत मार्गी होत आहे. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात बराच विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. भूतकाळात आपण ज्या चुका केल्या त्याचा स्वीकारण्याचा आठवडा आहे. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. सासुरवाडीकडील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी फक्त आपलेच काम करत राहावे. व्यापाऱ्यांना मोठा लाभ संभवतो. व्यावसायिक भागीदारामुळे व्यापारात नफ्याचे प्रमाण वाढेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. आपण आपला व्यवसायास यशस्वीपणे पुढे घेऊन जाऊ शकाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात अग्रस्थानी राहतील. ते आपले काम नेहमीप्रमाणे अत्यंत इमानदारीने करतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जेचा संचार झाल्याचे जाणवेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. आपण आपले कौटुंबिक जीवन व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधू शकाल. खूप आनंदित व्हाल. सर्वत्र आपल्या नावाची चर्चा होईल. प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ संभवते. पैश्यांची गुंतवणूक विचारपूर्वक करावी. वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण प्रवास करू शकाल. घरात शुभ कार्य होईल. कुटुंबात सलोखा राहील. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामात फायदा झाला तरी नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. आपण आपल्या संबंधांचा विचार करून नवीन योजना आखू शकाल. विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. आपले मन इतरत्र भटकत राहील.

सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण उर्जावान असल्याने सर्व कामे शीघ्रतेने पूर्ण करून कुटुंबियांसह वेळ घालवू शकाल. आनंद होईल व थोडा दिलासा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शासनाकडून लाभ होऊन एखादे मोठे काम मिळवू शकाल. नोकरदारांसाठी आठवडा प्रगतीकारक आहे. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धीसाठी एखाद्या व्यक्तीचे सहकार्य मिळू शकेल. मोठा फायदा होऊ शकेल. कामानिमित्त प्रवास कराल. हाच प्रवास आपणास प्रगतीचा मार्ग दाखवेल. वाणी आकर्षक राहील. व्यक्तिमत्व खुलून उठेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. मनोबल उंचावल्याने जोखीम घेण्यास प्राधान्य द्याल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नोकरदारांनी सहकाऱ्यांशी सलोखा ठेवल्याने फायदा होऊ शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. नवीन काही शिकता येईल. आहारावर लक्ष ठेवावे. व्यायाम करावा. प्राणायाम करण्याचा आपणास फायदा होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आरोग्यासंबंधी जागरूक राहावे लागेल. कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करून त्या पार पाडाव्यात. नोकरी करणाऱ्यांचे मनोबल उंचावेल. प्रत्येक काम शीघ्रतेने करू शकाल. आपले काम लोकांच्या नजरेस भरेल. व्यापाऱ्यांना व्यापारात चांगला लाभ होईल. प्राप्तीत वाढ संभवते. प्रॉपर्टी खरेदी करण्याचे विचार कराल. विद्यार्थ्यांसाठी सामान्य फलदायी आठवडा असून मेहनत सुरुच ठेवावी. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपण स्वतःसाठी खरेदी सुद्धा करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आपल्या उपयोगास येईल. आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आठवडा आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. व्यापाऱ्यांना दीर्घ काळानंतर चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु राशीच्या व्यक्तींना हा आठवडा महत्वाची बातमी घेऊन येणारा आहे. आपले खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी कुशल आर्थिक नियोजन करावे लागेल. मित्रांची मदत घेऊ शकता. नोकरदारांसाठी चांगला आठवडा. कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. नवीन काही शिकावयास मिळेल. व्यापाऱ्यांसाठी सामान्य आठवडा. कामाचा विस्तार दूरवरच्या ठिकाणी करून चांगला नफा मिळवू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. परंतु नशिबावर अवलंबून राहू नये. मेहनत करत राहावे. भरपूर पैसा आल्याने व चांगली प्राप्ती झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात सुद्धा नफा होण्याचे मार्ग खुले होतील. अत्यंत आनंदित व्हाल. नोकरदारांनी कामाच्या बाबतीत जागरूक होऊन सर्व कामे उत्तम प्रकारे करून आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमतरता जाणवेल. अभ्यासासाठी अधिक वेळ द्यावा. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ राशीच्या व्यक्तींना आठवड्याचा सुरुवातीचा दिवस वगळता इतर सर्व दिवस आपल्यासाठी चांगले आहेत. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक ताण वाढेल. दिवस पुढे सरकतील, तसे समस्या व आव्हाने दूर होऊ लागतील. नोकरदारांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना प्रगतीसाठी स्वतःलाच मेहनत करावी लागेल. शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यास करावा लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना हा आठवडा खूपच चांगला आहे. व्यवसायास गती येईल व प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. चांगला नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परीणाम मिळतील. कामात वाढ संभवते. प्रशंसा केली जाईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जोडीदार कामात खूपच चांगली मदत करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.