दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 08:29 AM2023-10-22T08:29:45+5:302023-10-22T08:42:41+5:30

Weekly Horoscope: दसरा, नवरात्राची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सिंहेत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात रविवारी दुर्गाष्टमी, सोमवारी महानवमी, मंगळवारी विजयादशमी (दसरा), बुधवारी पाशांकुशा एकादशी, गुरुवारी प्रदोष तर शनिवारी कोजागरी पौर्णिमा तसेच खंडग्रास चंद्रग्रहण आहे.

मंगळवारी पहाटे ४:२४ पासून पंचक सुरु होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे तीन दिवस पूर्ण काळ पंचक असून, शनिवारी सकाळी ७:३१ पर्यंत पंचक राहील. दसरा, नवरात्रीची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण याचा तुमच्यावर प्रभाव कसा असेल? जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य...

मेष: हा आठवडा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल. आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. कुटुंबात थोडा दुरावा येऊ शकतो, परंतु कामे मजबुतीने होतील. कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. असे असले तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. व्यापारातील पाऊले विचारपूर्वक उचलावी लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारीत तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती आपणास पसंत पडणार नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे.

वृषभ: हा आठवडा अनुकूल आहे. खोळंबलेली कामे झाल्याने आपण हर्षित व्हाल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानकपणे झालेल्या ह्या वाढीमुळे आपण काहीसे घाबरून जाल, परंतु धीर धरा. प्राप्तीत कपात संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. विनाकारण भांडण होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम केल्या नंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवते. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे आपणास महागात पडू शकते. व्यापारासाठी आठवडा फायदेशीर असला तरी आपला मानसिक ताण वाढेल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करण्याऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी त्यांच्यासमोर आव्हाने भरपूर असल्याने ते नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

कर्क: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. व्यापारात तेजी येईल व काही नवीन ऑर्डर्स सुद्धा मिळतील. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. प्रॉपर्टीशी संबंधित कामात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील व त्याचा फायदा होईल. बँकेतील शिल्लक वाढेल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. जोडीदाराची साथ आपणास प्रगती करण्यास प्रेरित करेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल, म्हणून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सिंह: हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. मानसिकदृष्ट्या बेचैन असल्याचे दिसून येईल. मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. प्रकृतीची थोडी काळजी घ्या व कोणताही वाईट विचार करू नका. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने होऊ घातलेली सर्व कामे अधिक जलद गतीने होतील. इतकेच नव्हे तर प्रलंबित कामे होऊ लागतील. नोकरीतील स्थिती चांगली असेल. तेथील परिस्थिती अनुकूल असल्याचा फायदा मिळेल. व्यापाऱ्यांना आठवडा अनुकूल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळेल. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकाग्रतेचा अभाव असल्याचे जाणवेल. तेव्हा सावध राहून खूप मेहनत करावी.

कन्या: हा आठवडा खूपच चांगला आहे. मनातील विचार बोलून दाखवू शकाल. विवाहितांचे जीवन चढ - उतारांसह वाटचाल करेल. व्यापारास अत्यंत फायदेशीर आहे. आपले कौशल्य व आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र कनिष्ठांपासून थोडे सावध राहावे लागेल. ते काही त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होऊ शकतो.

तूळ: हा आठवडा चांगला आहे. घरातील काही कामे कराल. प्राप्ती वाढ तर खर्चात कपात झाल्याने आपण हर्षित व्हाल. व्यापारासाठी चढ - उतारांचा आहे. ज्या कामाचा अनुभव किंवा ज्ञान नसेल असे कोणतेही काम हाती घेऊ नका. शासनाविरुद्ध असलेले कोणतेही काम करू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. खूप मेहनत कराल व चांगले सहकार्य सुद्धा मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतील. जोडीदारामुळे चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे.

वृश्चिक: हा आठवडा अनुकूल आहे. मित्रांची भेट होऊन खूप मनोरंजन होईल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. खर्चातील वाढ आपली काळजी वाढवू शकते. खर्चाच्या प्रमाणात प्राप्ती थोडी कमीच होईल. त्यामुळे अंदाजपत्रावर थोडे लक्ष घालावे लागेल, अन्यथा काळजी वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी धावपळ वाढेल. काही जणांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तेथे जाऊन काही दिवस नोकरी करावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापार वृद्धीसाठी काही गुंतवणूक कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे.

धनु: हा आठवडा खूपच चांगला आहे. ज्याचा विचार केला होता व ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सर्व कामे होतील. प्रलंबित योजना सुरु झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तीत जलद गतीने होणारी वाढ. वाढीव रकमेची गुंतवणूक अशा ठिकाणी कराल की ज्यामुळे भविष्यात लाभ घेऊ शकाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी होण्याची संभावना आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष ठेवावे. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरे जावे लागेल व त्यामुळे अभ्यासावर जास्त एकाग्र होण्याची आवश्यकता भासेल.

मकर: हा आठवडा चांगला आहे. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. खर्चात कपात होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत चढ - उतार येऊ शकतात. एखाद्याचे वायफळ बोलणे आपल्या डोक्यास ताप देऊ शकते व त्यामुळे आपण क्रोधीत होऊन वेडे वाकडे बोलून कामाच्या ठिकाणी भांडण उकरून काढू शकाल. शक्यतो अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. क्षमता वाढेल. परिश्रमामुळे एखादी चांगली निविदा मिळू शकते. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत खूप मेहनत करतील.

कुंभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. काही खर्च अचानकपणे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या बाबतीत थोडे सतर्क राहावे. कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका. बदली संभवते. इच्छा असेल तर नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास करावे लागतील व त्यामुळे आपण यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात यश प्राप्ती उत्तम होईल.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. सुरवात खूप चांगली होईल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क होतील. एखादा सुंदर प्रवासास जाऊन सुट्टी मजेत घालविण्याची संधी मिळेल. प्रेम वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा. अडेलतट्टूपणा केल्याने नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. त्यापासून दूर राहा. प्राप्तीत वाढ होईल. अनेक ठिकाणांहून फायदा होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात. खर्च कमी झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारा काळ आहे. ते चांगली तयारी करून आपल्या अभ्यासात प्रगती करतील.