उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:42 PM2024-11-25T13:42:07+5:302024-11-25T13:54:46+5:30

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आगामी काळ? जाणून घ्या…

Weekly Horoscope: कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, रवी आणि बुध वृश्चिक राशीत, शुक्र धनू राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. २६ रोजी उत्पत्ति एकादशी आहे. २८ रोजी प्रदोष आहे. २९ रोजी शिवरात्रि आहे. ३० रोजी दर्श अमावास्या आहे.

नोव्हेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा श्रीविष्णू आणि महादेव शंकर यांना समर्पित असल्याचे पाहायला मिळत आहे. एकादशीला श्रीविष्णूंचे विशेष पूजन केले जाते. तर प्रदोष आणि शिवरात्रि महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले पूजन शुभ मानले जाते. उत्पत्ति एकादशी आणि प्रदोष, शिवरात्रीचा काळ कोणत्या राशींसाठी कसा असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा काळ उन्नतीदायक व लाभदायी होण्याची संभावना आहे. विविध कार्यात अडथळे आले तरी यशस्वी व्हाल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवल्याने आपले नाते व भावना दृढ होतील. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. कार्यक्षेत्री संघर्षास सामोरे जावे लागू शकते, परंतु त्यानंतर कार्यसिद्धी होऊ शकते. अशा प्रसंगी धीर व सहनशीलता बाळगावी लागेल. कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळण्याची संभावना आहे. ईश्वराप्रति आस्था व विश्वास वाढेल. भावनेच्या आहारी जाऊन किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेणे टाळावे. धीर धरा व लक्ष्यांकाच्या दिशेने मार्गक्रमण करा.

वृषभ: काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सावध राहावे लागेल. क्रोध व आवेशास थारा देऊ नका. लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी संपत्ती खरेदी-विक्रीची आपली कामना पूर्ण होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना खुशखबर मिळू शकते. वादांचे निराकरण करण्यास मदत मिळू शकते. संघर्षास सामोरे जाण्याची गरज भासेल. समर्थन मिळू शकते. स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी व संबंध टिकवून ठेवण्यासाठी विचारांवर व वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सामाजिक संबंध जीवनातील सुख व समृद्धीचे मूळ असते हे ध्यानात ठेवावे.

मिथुन: कामे व जीवन रहाट यांची गती संथ होईल. अपेक्षित कामे वेळेवर न झाल्याने मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री कामाचा ढीग तयार होईल. अशा प्रसंगी वेळेवर काम करण्याचा व कामातील वेळेकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कोणावर अवलंबून राहू नये. वेळेवर कोणाची मदत न मिळाल्याने पदरी निराशा येऊ शकते. स्वतः आत्मनिर्भर व्हा. स्वतःच समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या खुशीसाठी थोडा जास्त खर्च करावा लागू शकतो. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. एखादी आर्थिक समस्या भेडसावीत असेल तर तिचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. जमीन-घर किंवा वाहन यांच्या खरेदी-विक्रीची योजना काही काळासाठी पुढे ढकलली जाण्याच्या शक्यतेमुळे वेळेवर योजना तयार करून धैर्याने वाटचाल करा.

कर्क: अधिक सतर्क व सावध राहावे लागेल. कामात खोडा घालण्याचा प्रयत्न जे करू शकतात अशा लोकांपासून दूर राहावे लागेल. जोशात येऊन शुद्ध हरपणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारे विवेक व संवेदनतेसह कामे करावी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. कोणतीही मोठी जवाबदारी पत्करण्यापूर्वी परिस्थितीचा विचार करावा लागेल. वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री येऊ घातलेल्या समस्यांचे समाधान होण्याची संभावना आहे. त्यामुळे मनास काहीसा दिलासा मिळेल.

सिंह: हा कालावधी शुभ फलदायी व सौभाग्यदायी होण्याची संभावना आहे. कारकीर्द व व्यवसायास पुढे घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊन प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराशी आपले संबंध सुख-समृद्धीने भरलेले राहील. संगीत, कला, नृत्य इत्यादीत रुची वाढून त्यांना संबंधित क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. जमीन-घर, वाहन इत्यादींची खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. स्वप्नातील घर किंवा संपत्ती निर्माणासाठी समर्थन मिळू शकते. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ फलदायी असू शकतो. त्यांना त्यांच्या अध्ययनात व स्पर्धेच्या तयारीत यश मिळू शकते. मित्र व कुटुंबियांसह आनंद व सहकार्याचा अनुभव येईल. हा काळ सुख, समृद्धी व यशासह घालवाल.

कन्या: काहीसा धावपळीचा व आव्हानात्मकतेचा अनुभव येऊ शकतो. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास करावे लागू शकतात, ज्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाद टाळण्यासाठी सर्व मुद्दे समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील, तेव्हा लक्ष्य गाठण्यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ यांच्याशी मिळून-मिसळून कामे करणे हितावह होईल. आर्थिक बाबीत योजनाबद्ध वाटचाल करावी लागेल. असे केल्यासच लाभ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा उबग येण्याची संभावना असल्याने त्यांना त्यात लक्ष घालावे लागेल. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्याने हताश होण्याची संभावना आहे. सकारात्मक चिंतनासह उन्नती व प्रगती होईल.

तूळ: मनोकामना पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांच्या कृपेने व समर्थनाने कार्यक्षेत्री उन्नती होण्याची संभावना असून प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आपणास सुख व सहकार्य मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल होऊ शकतो. त्यांची अभ्यासातील गोडी वाढून ते अधिक उत्साहित होतील. खरेदी-विक्रीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात व्यस्त राहिल्याने संतुष्ट व्हाल. धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची संभावना आहे. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. आहारावर लक्ष ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृश्चिक: हा काळ शुभ व लाभदायी होण्याची संभावना आहे. आर्थिक बाबतीत यश प्राप्तीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. व्यवसायात व नोकरीत अप्रत्यक्षपणे लाभ प्राप्ती संभवते. वैवाहिक जोडीदारासह समृद्धी आल्याने अत्यंत खुश व्हाल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल. समृद्धी वाढू शकते. सामान्य लाभ संभवतो. सढळहस्ते पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी योजनाबद्ध राहून काम करावे लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. धनलाभासह खर्च संभवतो.

धनु: विचारपूर्वक व विवेकपूर्वक पाऊल उचलावे लागेल. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान गोष्टी दुर्लक्षित करून कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक क्षेत्रात विचारपूर्वक गुंतवणूक करणे हितावह होईल. कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीयांचा सल्ला घेणे हितकारक होईल. विशेषतः संपत्तीशी संबंधित वादाचे निराकरण करताना विचारपूर्वक काम करावे लागेल. भावंडांशी योग्य व्यवहार केल्यास कुटुंबातील सद्भावना टिकून राहील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार पाठीशी राहून मदत करेल. हा कालावधी अनेक संघर्ष व चढ-उतार घेऊन आला तरी विवेकपूर्वक पाऊल उचलून व सामंजस्य दाखवून निर्णय घेतल्यास अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल.

मकर: हा कालावधी जास्त आव्हानात्मक असल्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, बोलण्यानेच गोष्टी अनुकूल किंवा प्रतिकूल होऊ शकतात. कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त श्रम करावे लागतील. वेळेवर मित्र किंवा सहकाऱ्यांची मदत न झाल्याने मन काहीसे उदास व त्रासून जाऊ शकते. महत्वाच्या कामात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. कौटुंबिक जवाबदारीतून पळ काढण्याची चूक करू नये. तसेच अति भावनाशील होऊ नये. व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. कामानिमित्त दूरवरच्या प्रवासाची योजना करावी लागू शकते.

कुंभ: कारकिर्दीत व व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. त्याचप्रमाणे नोकरीत बदल विचारपूर्वकच करावा. आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार गरजांना प्राधान्य क्रम द्यावा लागेल. कोणत्याही प्रकारे कर्ज काढावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अंदाजपत्राप्रमाणे खर्च करावेत, अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांशी वागताना सावध राहावे. विशेषतः इतरांशी थट्टा-मस्करी करताना मान-प्रतिष्ठेचा विचार करून इतरांच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळीज घ्यावी लागेल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवून नाते समृद्ध करावे. विद्यार्थ्यांना अध्ययनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मीन: शुभत्व व यश प्राप्त करून देणारा आहे. कारकिर्दीत व व्यवसायात उन्नती होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. मित्रांसह काम करावे लागेल. चांगला लाभ होईल. दांपत्य जीवन समृद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. वैवाहिक जोडीदारासह एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नाते अधिक दृढ होऊ शकेल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. कुटुंबातील आनंद वृद्धिंगत होऊ शकेल. नियमित व्यायाम, सकस आहार व योग्य विश्रांती यासह प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रेम संबंधात प्रगल्भता व सुखद वातावरण असल्याचे दिसत आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालवणे खास व आनंददायक होईल. कुटुंबात सौहार्दता वाढत असल्याचे दिसत आहे. संबंध सदैव समृद्ध व सामंजस्यपूर्ण राहतील.