साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना नववर्षाची नवी पहाट, ४ राजयोगांचा लाभ; वर्षभर भरघोस भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:21 IST2025-03-30T13:09:13+5:302025-03-30T13:21:02+5:30
Weekly Horoscope: ३० मार्च २०२५ ते ०५ एप्रिल २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून नवीन वर्ष शके १९४७ सुरू होत आहे. २ एप्रिल रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करत आहे. ग्रहस्थिती अशी-गुरू व हर्षल वृषभ राशीत आहेत. मंगळ मिथुन राशीत असून, बुधवारी तो कर्क राशीत येईल. केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहे. शनि, रवी, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. ग्रहांच्या या स्थितीमुळे विविध प्रकारचे राजयोग, युती योग जुळून आलेले आहेत. अशा या अद्भूत, दुर्मिळ, दुर्लभ योगांमध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात होणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ, मिथुन व कन्या राशीतून राहील. रविवार, ३० एप्रिल २०२५ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा (दुपारी १२:५० पर्यंत) आहे. दुपारी ४:३५ पर्यंत रेवती, तर त्यानंतर अश्विनी नक्षत्र राहील. दुपारी ४:३५ पर्यंत मीन, तर त्यानंतर मेष रास राहील. तर, ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे.
०१ एप्रिल २०२५ रोजी विनायक चतुर्थी असून, हिंदू नववर्षाच्या पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. ०२ एप्रिल २०२५ रोजी श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी आहे. एकंदरीतच धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिने पाहिल्यास हिंदू नववर्षाचा पहिला आठवडा अतिशय शुभ, अद्भूत योगांचा आणि पुण्य फलदायी असाच ठरणारा आहे. तुमची रास कोणती? मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी ठरू शकेल? जाणून घ्या...
मेष: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस मित्रांच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. काही नातेवाईकांकडे ये-जा होऊ शकते. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. सर्वजण कौशल्याचे कौतुक करतील. नोकरीत मन लावून कामे कराल. त्यामुळे विरोधक प्रशंसा केल्याशिवाय राहू शकणार नाहीत. काही खर्च गुप्तपणे कराल. विवाहितांना वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळतील.
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस प्राप्तीत वाढ करण्याचा विचार कराल. त्याच्या जोडीने कोणत्या कारणाने खर्च वाढतात त्याचा विचार कराल. त्यावर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य राहील. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. एकमेकांना मनातील गोष्टी सांगून अजून जवळ याल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले राहील. जोडीदार हुशार आहे व तो आपणास मदत करेल. हा आठवडा व्यापारात प्रगती करण्यासाठी बरेच काही देईल. व्यावसायिक भागीदार खूप मदत करेल. प्राप्तीत सुधारणा होईल. खर्चात कपात होईल. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सबळ व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात प्रगती करतील. नेहमीप्रमाणे ते काम पूर्ण इमानदारीत करतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम आहे.
मिथुन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहून कामे करावी लागतील. काही व्यक्ती स्पर्धा करू लागतील. तेव्हा बाजारात टिकाव लागण्यासाठी त्यांना जोरदार टक्कर द्यावी लागेल. नशीब काहीसे प्रतिकूल राहील. त्यामुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो. परंतु मेहनतीने सर्व कामे पूर्ण करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते एकाग्रतेने अध्ययन करू शकतील. आठवड्याच्या सुरुवातीपासून प्रकृती विषयक एखादी चिंता आपणास सतावेल. परंतु काळजी करू नका. प्राणायाम करा. शुद्ध हवा घ्या. त्याने प्रकृतीत चांगली सुधारणा होईल. मानसिक चिंता दूर होतील.
कर्क: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात तणाव वाढू शकतो. तेव्हा सावध राहावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीकडील लोकांना भेटून त्यांच्याशी भरपूर संवाद साधाल. त्यामुळे नात्यात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. तीव्र बुद्धिमत्तेने कामे इतरांच्या मदतीने करवून घेण्यात यशस्वी व्हाल. हाती एखादा मोठा सौदा लागू शकतो व त्यामुळे व्यापारात जलद गतीने उन्नती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्चात कपात होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात मिश्र फळे मिळतील. त्यांना मेहनत वाढवावी लागेल.
सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. वागणुकीवर थोडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची कामावरील पकड मजबूत होईल. ते कामात पारंगत होतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते दूरवरच्या क्षेत्रात किंवा राज्यात व्यापार नेण्यात यशस्वी होतील. आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक तणावग्रस्त असू शकता. खर्चात वाढ होईल. त्याचा परिणाम होईल. जर शासकीय नोकरीत असाल तर शासकीय बंगला किंवा वाहन मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊन सहजपणे चांगली कामगिरी करू शकतील.
कन्या: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. सावधपणे मनातील गोष्टी प्रेमिकेस सांगाव्यात. नात्यात नकारात्मकता वाढणार नाही, ह्याची काळजी घ्यावी. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा उपभोग घेतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती निष्ठापूर्वक कामे करतील. असे असले तरी काही विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यापाऱ्यांना फायदा होईल. मानसिक दृष्ट्या मजबूत राहाल. चिंतामुक्त व्हाल. आर्थिक प्राप्ती झाल्याने आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हाल. कुटुंबात हसत-खेळत अशा काही गोष्टी होतील की कुटुंबाचा सन्मान वाढेल. कुटुंबात प्रतिमा उज्ज्वल होईल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या विवाहाची बोलणी होऊ शकतील. त्यामुळे सर्वजण खुश होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल.
तूळ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजन त्यांच्या नात्यात निर्माण झालेली नीरसता दूर करण्याचा प्रयत्न करतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात आक्रमक होतील. व्यापाऱ्यांना थोडे प्रयत्न करावे लागतील. त्यांना असे एखादे नवीन धोरण आखावे लागेल की ज्यामुळे त्यांचा व्यापार प्रगती करू शकेल. त्यांना काही नवीन लोकांना कामावर ठेवावे लागेल. हा आठवडा खर्चात वाढ करणारा आहे. कामातील मेहनत वाढवावी लागेल. जितकी जास्त मेहनत कराल त्याच्या अनुषंगाने फळ मिळेल. खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती सामान्यच राहील. त्यामुळे काहीसे चिंतीत होऊ शकता. कौटुंबिक जवाबदाऱ्या लक्ष वेधून घेतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सामान्य परिणाम मिळतील.
वृश्चिक: हा आठवडा अंशतः फलदायी राहील. प्रेमीजनांनी मनातील विचार निःसंकोचपणे मांडावेत. जे सांगावयाचे आहे ते मोकळेपणाने सांगावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असल्याने वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. व्यावसायिक व कौटुंबिक जीवन ह्यांचा समतोल ते साधू शकतील. ह्या आठवड्यात व्यापारांना फायदा होईल. सरकारी क्षेत्राकडून फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. कुटुंबात एखादा सोहळा होऊ शकतो, ज्यात लोकांची ये-जा झाल्याने अनेक लोकांची भेट घेता येईल. कुटुंबातील प्रत्येक जण उत्साहित असल्याचे दिसून येईल. कुटुंबात आनंद पसरेल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होतील व त्यामुळेच ते अभ्यासात प्रगती करू शकतील.
धनु: हा आठवडा दूरवरचे प्रवास करावयास लावणारा आहे. प्रेमीजन संपर्क दृढ करून नात्यातील दुरावा कमी करून नात्यात सुधारणा करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेतील. कामातील नेतृत्व क्षमता दाखवून प्रगती साधतील. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ व सुखद परिणाम मिळतील. कुटुंबातील वातावरणात आनंद पसरेल. कुटुंबातील सर्वजण एकजुटीने राहतील, त्यामुळे खूष व्हाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात जणू काही संजीवनी मिळाल्याने ते अभ्यासात जलद गतीने प्रगती करू शकतील. स्मरणशक्ती विकसित होईल. एखादी धार्मिक यात्रा कराल किंवा एखाद्या नदीवर जाऊन स्नान करण्याचा आनंद घ्याल. खूप मजा येईल. आठवड्याचा आनंद घेऊ शकाल.
मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. लहान-सहान वाद संभवतात. वैवाहिक जीवन सामान्य राहिले तरी अधून-मधून नैराश्यग्रस्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. कामात मेहनत करून प्रगती कराल. सरकारकडून एखादा चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापारात जलद गतीने वृद्धी झाली तरी एखाद्या गोष्टीने चिंतित होऊ शकता. कामाच्या बाबतीत थोडे गंभीर व्हावे लागेल. प्रॉपर्टीशी संबंधित बोलणी होऊ शकतात व त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. भाग्य मजबूत राहील. कार्यात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नये. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मानसिक दृष्ट्या तणाव असू शकतो व शारीरिक दृष्ट्या अशक्तपणा जाणवू शकतो.
कुंभ: हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधू शकाल व त्यामुळे यशस्वी व्हाल. एकदम खुश व्हाल व सर्वत्र बोलबाला राहील. कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा सहवास लाभेल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. खर्च वाढू शकतात. काही समस्या येण्याच्या संभाव्यतेमुळे आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. विद्यार्थ्यांची अध्ययनातील एकाग्रता टिकून राहील. ते उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. प्रवास केल्याने खर्च वाढला तरी भरपूर आनंद मिळेल व मानसिक ताण कमी होईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
मीन: हा आठवडा चांगला आहे. क्षमतेवर विश्वास ठेवाल व त्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. असे झाल्याने सर्व कामात अग्रस्थानी राहाल. इतरांवर अवलंबून न राहता कामे स्वतः करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या संघ सदस्याप्रमाणे काम करणे फायदा देऊ शकते. व्यापारात शुभ संकेत मिळू शकतील. प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांना कामाचे परिणाम पाहावयास मिळतील. प्रशंसित व्हाल. वैवाहिक जोडीदार कामात पूर्ण मदत करेल की ज्यामुळे कामगिरी उत्तम होऊ शकेल. प्रेमीजनांसाठी आठवडा सुखद बातमी घेऊन येणारा आहे. एकमेकांच्या अधिक जवळ याल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते स्पर्धेची तयारी करतील.