Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ : मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 12:49 PM 2023-01-15T12:49:41+5:30 2023-01-15T12:59:57+5:30
Weekly Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... मेष - ह्या आठवड्यात आपण मानसिकदृष्ट्या काहीसे त्रासून जाल. विवाहितांना दांपत्य जीवनात तणाव जाणवेल. आठवड्याच्या सुरवातीस हा तणाव जास्त असेल. त्या नंतर तो निवळू लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खुशीचा आहे. व्यापारात आपणास यश प्राप्त होईल. आपण एखादा नवीन करार करण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडे सावध राहावे लागेल. आपल्यावर एखादा आळ येण्याची शक्यता आहे. अति आत्मविश्वास न बाळगता आपल्या कामावर लक्ष द्या. प्राप्तीसाठी हा आठवडा नाजूक आहे. असे असले तरी आपण एखाद्या बचत योजनेत किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत काहीसे गंभीर होतील, परंतु त्यांच्या अभ्यासात काही अडथळे येण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांच्या दांपत्य जीवनात तणाव असल्याचे दिसून येईल. अशा परिस्थितीत आपणास समजूतदारपणा दाखवावा लागेल. प्रणयी जीवनात सुद्धा संघर्ष संभवतो. आपल्या वडिलांशी वाद होण्याची किंवा त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास विरोधकां पासून सावध राहावे लागेल. अन्यथा आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. आपली प्राप्ती सामान्यतः चालूच राहील. असे असूनही आपण आपली प्राप्ती दुप्पट करण्यासाठी एखादी युक्ती शोधून काढाल. आपणास नशिबाची साथ मिळाळती तरी परिस्थितीत चढ - उतार येतच राहतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना कष्टाचे यथायोग्य फळ मिळेल. असे असले तरी अहंकाराने कोणाशी वाद घालत बसू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगले यश मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. ते अभ्यास उत्तम प्रकारे करू शकतील व त्याचा त्यांना चांगलाच लाभ होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक तणावाखाली वावराल.
मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असून हि एखाद्या गोष्टीमुळे आपण आपल्या मुलांवर क्रोधीत होण्याची संभावना आहे. त्यांची प्रकृती सुद्धा काहीशी नाजूकच राहील, तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असल्याचे दिसून येईल. आपणास वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आपला जोडीदार एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या दोघातील समन्वय बिघडू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. असे असून हि आपल्यावर एखादा आळ येण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या कार्यक्षेत्री जागरूक राहावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खुशीने भरलेला राहील. आपली आर्थिक स्थिती खूपच चांगली राहील. हा आठवडा आपल्या व्यापार वृद्धीसाठी आवश्यक अशी चांगली संधी घेऊन आल्यामुळॆ आपण कदाचित आपल्या कामगारांना काही बक्षीस सुद्धा देऊ शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. ते खूप मेहनत करतील, ज्याचे त्यांना सुखद परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क - हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याचे दिसत आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात अशांतता जाणवेल. वैवाहिक जोडीदाराची वागणूक व प्रकृती दोन्हीत बिघाड होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. त्यांचे संबंध अधिक दृढ होऊन ते आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवतील. मातेशी वाद संभवतो. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. नोकरीत खूपच धावपळ होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा मिश्र फळे देणारा आहे. त्यांना व्यापारात खूप सावध राहावे लागेल. शासनाकडून एखादा लाभ होऊ शकतो. मात्र, हातून एखादी मोठी चूक होऊन आपली बदनामी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्वाचा आहे. प्रयत्न केल्यास त्यांना अभ्यासात यश मिळेल. हा आठवडा आरोग्य विषयक समस्या वाढविणारा असल्याने आपणास आरोग्याशी संबंधित बाबींवर लक्ष द्यावे लागतील.
सिंह - हा आठवडा आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन आनंदात ठेवण्यासाठी जोडीदारास एखाद्या ठिकाणी फिरावयास घेऊन जाण्याची शक्यता आहे. प्रेमीजन प्रिय व्यक्ती पर्यंत आपल्या भावना पोचवू शकेल अशी मोठी भेटवस्तू देऊ शकतील. आपल्या एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे. तेव्हा मैत्रीत सावध राहावे. व्यापारात स चांगले यश प्राप्त होऊन त्यात तेजी येईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवून काम करावे लागेल. असे केल्याने आपणास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल व आपले सहकारी सुद्धा आपल्याला मान देऊ लागतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लहान - सहान शारीरिक समस्या संभवतात. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवनात यशस्वी व्हाल. कुटुंबात प्रेम भावना वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जोडीदारास एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. प्रेमीजनसाठी आठवडा नाजूकच आहे. आपल्या प्रिय व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपली वाणी नियंत्रित ठेवून गोड बोलावे, कटू बोलण्याने नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. व्यापारी आपल्या व्यापारात नवीन प्रयोग करताना दिसतील. आपणास काही प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यांना अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल. त्यासाठी त्यांना आध्यात्मिक साधना व योग फायदेशीर होऊ शकतात. आपले आरोग्य कमकुवत होण्याची शक्यता आहे.
तूळ - ह्या आठवड्याच्या सुरवातीस खर्च खूप होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती नाजूक होण्याची संभावना आहे, परंतु जस जसे दिवस पुढे जातील तस तशी परिस्थितीत सुधारणा सुद्धा होऊ लागेल. कौटुंबिक परिस्थितीत सुद्धा काही बदल होईल. आपल्या मातेची प्रकृती बिघडून घरात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची संभावना आहे. घरात सुख - शांती नांदण्यासाठी आपणास सुद्धा प्रयत्नशील राहावे लागेल. स्वतःला एकटे न समजता आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांत मिळून मिसळून राहण्यास सुरवात करा. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रणयी जीवनासाठी मात्र आठवडा काहीसा नाजूक राहणारा आहे. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करावा लागेल. आपणास चांगली प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामा निमित्त दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. व्यापारी व्यक्ती आपल्या कामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांना आळस झटकावाच लागेल. आपणास सध्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. प्रेमीजन ह्या आठवड्यात खूपच रोमँटिक होतील. ते एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन आपल्या नात्यास नवीन झळाळी देतील. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील जवाबदाऱ्यांनी घेरलेले दिसतील. सासुरवाडी कडील लोकांच्या भेटीची संधी मिळू शकेल. घरात भावंडांशी सुद्धा एखाद्या वादास सामोरे जावे लागू शकते. मित्रांशी चांगले संबंध ठेवल्यास ते आपणास मदत करतील. आपल्या महत्वाकांक्षा पूर्णत्वास जातील. एखादी आर्थिक योजना पूर्णत्वास गेल्याने धनप्राप्ती सुद्धा होईल. असे झाल्याने कर्जफेड सुद्धा होऊ शकेल. ह्या आठवड्यात कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद होण्याची प्रबळ संभावना असल्याने काळजी घ्यावी. अन्यथा परिस्थिती चिघळून आपणास त्रास होऊ शकतो. तेव्हा असे काही घडणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, व त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात सुधारणा होईल.
धनु - ह्या आठवड्यात आपल्या डोक्यावरील चिंतेचे सावट दूर होईल. असे असले तरी कौटुंबिक जीवनात चढ - उतार येतील. अर्थात कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव कराल, त्यामुळे ती खुश होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आपल्या प्रेमळ भाषेने जोडीदाराच्या चेहेऱ्यावर हास्य उमटवण्यात यशस्वी होतील. घरात काही कारणाने तणाव वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नती होईल. आपण केलेल्या प्रयत्नांचा लाभ आपल्या हाती लागेल. व्यापारात उन्नती होऊन व्यापार गतिशील होईल व प्रगती साधेल. आपणास चांगले परिणाम मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. नोकरीत परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपली अचानकपणे पदोन्नती होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल. त्यांना अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. सध्या आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील, परंतु आपल्याच चुकीने जोडीदारास नाराज सुद्धा कराल. अहंकाराने काही बोलल्यास ते आपल्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. प्रणयी जीवनासाठी आठवडा मध्यम फलदायी असला तरी आपला प्रिय व्यक्तीशी वाद होईल असे काही करू नका. आठवड्याच्या सुरवातीस कार्यक्षेत्री आपणास काही त्रास जाणवेल. मानसिक दबाव व कामाच्या ताणाने आपण त्रस्त व्हाल. आपल्या कामात आपण खूप कष्ट कराल. आपले कष्ट फलित होऊन आपण प्रगती कराल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात सुद्धा यश प्राप्त होईल. मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. इतर विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. सध्या कोणतीही शारीरिक समस्या होईल असे दिसत नसले तरी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ - हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे जाणवेल. जोडीदाराशी संबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपल्यात जवळीक वाढल्याने एकमेकांच्या हृदयातील स्थान दृढ होईल. एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. मोबाईलवर सुद्धा तासन तास गप्पा मारू शकाल. आपली मेहनत अचानकपणे यशस्वी झाल्याने आपण आश्चर्यचकित व्हाल. विरोधक सुद्धा आपली प्रशंसा करत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कार्यकौशल्याने आपण आपली प्रतिमा उंचावू शकाल. व्यापारासाठी आठवडा चांगला असला तरी गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होईल. ते अभ्यास चांगला करू शकतील. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आठवडा चांगला आहे. असे असले तरी आपणास आपल्या आहारावर लक्ष द्यावे लागेल.
मीन - आठवड्याची सुरवात काहीशी त्रासदायक असू शकते. सुरवातीस आपल्याला काही मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले असून त्यांचा आपल्या जोडीदाराशी समन्वय उत्तम राहील. घरात सर्व सुविधा असतील. संतती कडून चांगली बातमी मिळेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपणास प्रिय व्यक्ती समोर आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. सध्या आर्थिक दृष्ट्या आपण त्रासून जाल. परंतु काळजी करू नका. ह्या आठवड्यात पैश्यांचा ओघ चालू होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तेव्हा आपण निश्चिन्त राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामगिरीमुळे आपले वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. व्यापारासाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपले प्रयत्न आपणास प्रगती पथावर नेतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांना अनेक विषयांवर आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळेल. सध्या आपल्या आरोग्यात सुधारणा होणार असली तरी कंबरेचे दुखणे होण्याची संभावना आहे. आहारातील अनियमिततेमुळे एखादी समस्या उदभवू शकते.