Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२: ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आठवडा, आर्थिक लाभही होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 12:28 PM2022-10-30T12:28:13+5:302022-10-30T12:34:46+5:30

Weekly Horoscope: जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

मेष - हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आशादायी आहे. एखादी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपणास कार्यात यश प्राप्त होईल. व्यापारात जलदगतीने प्रगती होईल. आपल्या व्यवसायात लाभाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ सुद्धा मिळेल. आपण आपल्या कष्टांसाठी प्रसिद्ध व्हाल, व त्यामुळे आपणास कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही. आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. काहीजणांचे विवाहबाह्य संबंध येण्याची संभावना सुद्धा आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपला अभ्यास चालूच ठेवावा.

वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण खूपच कष्ट करता. कष्टाच्या बरोबरीने नशिबाची सुद्धा साथ मिळावयास हवी, जी ह्या आठवड्यात आपणास मिळेल. त्यामुळे आपले मनोबल उंचावेल. आपण प्रत्येक काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल. नोकरी करणाऱ्यांना ह्याचा मोठा फायदा होऊन कामात प्रगती होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपला व्यावसायिक भागीदार आजारी पडण्याची शक्यता असून आपणास आपली कामे स्वतःलाच करावी लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास वैवाहिक जोडीदाराची काळजी सतावेल. आपल्या खर्चात वाढ होण्याची संभावना असल्याने आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आपण अनेक लोकांना भेटून आपले संबंध अधिक दृढ कराल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. 

मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास दूरवरच्या ठिकाणांहून किंवा राज्यातून व्यवसायात काही लाभ होऊ शकतो का याची माहिती आपण घ्याल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास भविष्यात फायदा होऊ शकेल अशी एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या अनुभवाचा फायदा होईल. आपण आपल्या कामात प्रगती कराल. प्रकृतीत चढ - उतार येतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांप्रती जवाबदारीची जाणीव राहील. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेची ओळख मित्रांना करून देण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडा त्रास संभवत असल्याने त्यांना एकाग्रता व लक्ष वाढवावे लागेल. 

कर्क - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात कामात यश प्राप्तीची शक्यता धूसर असल्याने कोणतेही मोठे कार्य हाती घेऊ नये. खर्चात वाढ होईल. प्राप्ती कमी व खर्चात वाढ झाल्याने आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. आपल्या उत्तम मनोबलामुळे आपण त्यांचा सामना करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामगिरीनुसार आपणास बढती मिळण्याची संभावना आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार आले तरी एकमेकांतील प्रेम टिकून राहील. प्रेमीजनांना त्यांच्या प्रणयी जीवनात तणावास सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. 

सिंह - हा आठवडा आपल्यासाठी नवीन परिणाम घेऊन येणारा आहे. आपल्या आशा पल्लवित होतील. आपण अग्रस्थानी राहून कामे करण्यास प्राधान्य द्याल. आपणास आव्हानांना सामोरे जाण्यास आवडेल. आपण स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास वैवाहिक जीवनातील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. सासुरवाडीकडील लोकांशी सलोखा राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी खूप कष्ट करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या कामाच्या बाबतीत जागरूक राहाल. आपल्या सहकाऱ्यांशी सलोखा राखूनच पुढे जाऊ शकाल. प्राप्तीत मोठी वाढ संभवते. त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. 

कन्या - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांसाठी आपण काही करावे असे आपणास वाटेल. आपण त्यांच्याप्रती खूपच भावुक व्हाल. प्रेमीजनांसाठी आठवड्याचे मधले दिवस आनंददायी आहेत. आपली प्रेमिका तिची इच्छा आपल्या समोर व्यक्त करेल. त्यामुळे आपल्या मनात तिचा आदर वाढेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात तटस्थता जाणवेल. ते आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सल्ल्याने अनेक कामे करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपल्या ज्ञानात भर पडून आपण नवीन काही शिकू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपले संपूर्ण लक्ष प्राप्तीत वाढ करण्यावर केंद्रित होईल. त्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आपण आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हाल. प्रकृती उत्तम राहिली तरी आपणास आहारावर लक्ष ठेवावे लागेल. 

तूळ - हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा असला तरी आपणास मनाची व शरीराची काळजी घ्यावी लागेल. मानसिक व शारीरिक दुर्बलतेमुळे आपण आजारी पडण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक कार्ये करण्यास आपले प्राधान्य असले तरी आपणास यशस्वी होण्यासाठी प्राधान्यक्रम देऊनच कामे करावी लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जलदगतीने काम करून त्यात नैपुण्य मिळवू शकतील. व्यवसायात तेजी येऊन आपले अनेक प्रकल्प यशस्वी होतील. त्यात आपणास चांगला नफा होईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळवू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिके विषयी खूपच गंभीर व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना जास्त फायदा होईल.

वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. तेव्हा प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अन्यथा आपले नुकसान संभवते. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. हे तणाव दूर करणे आपल्या हाती राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. प्रणयी जीवनातील समस्या दूर होऊ लागतील. आपण आपल्या प्रेमिके समोर मनातील भावना व्यक्त करू शकाल. त्यामुळे ती सुद्धा आपले प्रेम व्यक्त करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत खूपच गंभीर होतील. आपण भरपूर प्रवास कराल व त्यासाठी आपणास खूप पैसा खर्च करावा लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक आहे. आपल्या खर्चात इतकी वाढ होईल कि खर्च कसे नियंत्रित करावे ह्याचा विचार आपणास करावा लागेल.

धनु - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपले जीवन सुखावह होईल. आपण मनापासून खुश झाल्याने प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. आपली प्राप्ती सुद्धा चांगली होईल, व त्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या प्रबळ व्हाल. कौटुंबिक जीवन आनंददायी होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपल्या संबंधात प्रेम व रोमांस असला तरी काही लोकांच्या वाकड्या नजरेचा परिणाम आपल्या प्रणयी जीवनावर होऊन आपल्या संबंधात काही समस्या निर्माण होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त राहील. आपणास प्रयत्न करून हे तणाव दूर करावे लागतील. व्यापाऱ्यांना व्यापारात चांगला नफा होईल. अनेक योजनांचा आपणास लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवून आपले काम जलद गतीने पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना एकाहून अधिक विषयांचा अभ्यास करण्याचा लाभ होईल. 

मकर - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कामांना चिकटून राहाल, परंतु सुरवातीस आपणास थोडा अपमान सहन करावा लागण्याची किंवा आपला स्वाभिमान दुखावला जाण्याची संभावना आहे. आपण जेथे काम करता तेथे समस्या निर्माण होऊ नये म्हणून कोणाशी हि जवळीक न करण्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली कार्य योजना यशस्वी होऊन आपल्या हाती पैसा येईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपली जवाबदारी ओळखू शकाल. त्यामुळे आपला वैवाहिक जोडीदार खुश होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपल्या कामातील व्यस्ततेमुळे आपण आपल्या प्रेमिकेस कमी वेळ द्याल व त्यामुळे ती आपल्यावर रागावण्याची शक्यता असून आपणास तिची समजूत काढावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.

कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्च कमी होतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. पैश्याची आवक झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ आपणास कार्यात यश प्राप्त करून देईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी आपल्या अभ्यासाप्रती खूपच गंभीर होतील. त्यांच्या अभ्यासात सतत अडथळे निर्माण होण्याची संभावना असल्याने त्यांना गंभीर व्हावेच लागेल. कौटुंबिक वातावरणामुळे अभ्यासात अडथळे येऊ शकतात , तेव्हा सावध राहावे. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला व रोमांसाने भरलेला आहे. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह फिरावयास जाऊ शकाल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना सुखद परिणाम मिळतील. आपण आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकाल. आपल्या संबंधात आपणास भावनेची अनुभूती येईल. 

मीन - हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीपासून आपण आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करून आपला पूर्ण वेळ त्यासाठी खर्च कराल. आठवड्याच्या मध्यास आपण मित्रांना भेटून आपले सामाजिक वर्तुळ वाढविण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात खर्चात वाढ होईल. ह्या आठवड्यात गुंतवणूक कोठे व कशी करावी हे न समजल्याने आपणास गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. तसेच सध्या गुंतवणूक करणे हितावह होणार नाही. आपणास आपल्या व्यावसायिक भागीदारांशी सलोखा राखावा लागेल, अन्यथा ते परिस्थितीचा दुरुपयोग करण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आनंदित राहिले तरी सासुरवाडी कडील लोकांशी थोडा वाद संभवतो. ह्यात आपला वैवाहिक जोडीदार त्यांच्या कुटुंबाची बाजू घेईल, ज्यामुळे आपल्या दोघात वाद होण्याची संभावना आहे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात खुश राहतील. आपल्यातील समस्या दूर होऊ लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीचा मार्ग सापडेल.