साप्ताहिक राशीभविष्य: 'या' काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो; तर यांची लग्न जुळणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 11:23 AM 2024-09-15T11:23:48+5:30 2024-09-15T11:31:37+5:30
या सप्ताहात रवी आणि शुक्राचा राशीपालट आहे. तसेच दि. १८ रोजी चंद्रग्रहण आहे. या सप्ताहात रवी आणि शुक्राचा राशीपालट आहे. तसेच दि. १८ रोजी चंद्रग्रहण आहे. मात्र, ते भारतात दिसणार नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, बुध सिंह राशीत आहे. रवी सिंहेत आहे. मात्र, दि. १५ रोजी तो कन्या राशीत जाईल.
तेथे त्याची युती केतू आणि शुक्र यांच्याशी होईल. दि. १८ रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करील. प्लूटो मकर राशीत त शनी कुंभ राशीत आहे. राहू, नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशींतून राहील. सोमवारी सकाळी ५:४५ पासून पंचक सुरु होत आहे.
मंगळवार, बुधवारी पूर्ण काळ पंचक राहील. गुरुवारी सकाळी ८:०४ पर्यंत पंचक राहील. रविवार, दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद शुक्ल द्वादशी (सायंकाळी ६:१३ पर्यंत) आहे. सायंकाळी ६:४९ पर्यंत श्रवण, तर त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र राहील. दुसऱ्या दिवशी उत्तररात्री पहाटे ५:४५ पर्यंत मकर, तर त्यानंतर कुंभ रास राहील. आज चांगला दिवस आहे. प्रदोष आहे. राहूकाळ सायंकाळी ४:३० ते ६.
मेष - संमिश्र ग्रहमान राहील : या सप्ताहात आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. इतरांच्या भानगडीत न पडलेलेच बरे राहील. आपली जबाबदारी वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी तुम्हाला सतत दक्ष राहावे लागेल. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्या. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळलेले बरे राहील. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मोबाइल, पर्स सांभाळा. चंद्राचे व्ययस्थानातून होणारे भ्रमण व ग्रहणयोग यांमुळे अचाट साहस करणे टाळा. शुक्रवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. टीप : रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृषभ - नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवली पाहिजे. गुंतागुंत होणार नाही, याची काळजी घ्या. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्हाला मोठेपणा मिळेल. तुमच्या हातून चांगली कामे होतील. मुलांची प्रगती होईल. महत्त्वाच्या वस्तू व कागदपत्रे सांभाळा. काहींना दूरचा प्रवास घडून येईल. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
मिथुन - वादविवाद टाळा : कर्क- कटू-गोड अनुभव येतील : काही कटू, आपण संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे करणे टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. मात्र त्यासाठी लोकांची मर्जी संपादन करणे क्रमप्राप्त राहील. त्यात कमीपणा मानू नका. कार्यक्षेत्रात जुने वाद उकरून काढू नका. राहत्या घराचे काही प्रश्न सतावतील. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. टीप : सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
कर्क-तर काही गोड अनुभव येतील. एखाद्या बाबतीत यश मिळाले म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांची कदर केली पाहिजे. जीवनसाथीशी सौहार्दाचे संबंध राहतील यासाठी विशेष प्रयत्न करा. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अहंकार बाजूला ठेवाल तर सुख, शांती, समाधान मिळेल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. मात्र तुमच्या योजनांच्या बाबतीत लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. टीप: रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
सिंह- सावधपणे पावले टाका : चंद्राच्या षष्ठ ते अष्टम स्थानातून होणाऱ्या भ्रमणामुळे थोडे विचारपूर्वक आणि सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे. आपली नेहमीची कामे चोखपणे बजावत राहा. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्या. आत्मविश्वासाच्या बळावर आपण सर्व अडचणींवर मात कराल. सप्ताहाच्या मध्यावधीत प्रवासात सतर्क राहा. वाहने जपून चालवा. एकाच वेळी अनेक कामे करू नका. वादग्रस्त वक्तव्ये करू नका. एखादे अडलेले काम यशस्वीपणे पार पडेल. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
कन्या- धनलाभ होईल : जमिनीच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. भागीदारी व्यवसायात थोडे सतर्क राहण्याची गरज आहे, तुमच्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. काही लोक तुमच्याविरोधात कारवाया करतील. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. घरात किरकोळ कारणावरून होणारे वाद टाळा.टीप - रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
तूळ : प्रेमात सफलता मिळेल, शुक्र भ्रमण तुम्हाला विविध प्रकारचे लाभ देणारे ठरू शकते. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या कामात तुमची दमछाक होऊ शकते. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यास ती सुकरपणे पार पडतील. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृश्चिक - नवीन जबाबदारी मिळेल : नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचा कामाचा ताण वाढेल. मात्र, फायदे होणार असल्याने तुम्हाला कामाचे काही वाटणार नाही. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात वादविवादापासून स्वतःला दूर ठेवलेलेच बरे राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वेळ घालवणाऱ्या रिकामटेकड्या लोकांपासून सावध राहा. प्रवासात काळजी घ्या. आरोग्याला जपा. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चांगले दिवस.
धनू- संयमाने वागा : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. चतुर्थ स्थानातून होणाऱ्या राहू, नेपच्यून व चंद यांच्या युतीमुळे घरगुती वादग्रस्त प्रकरणे संयमाने हाताळण्याची गरज आहे. अडचणींचा काळ जास्त वेळ टिकणार नाही; पण बोलून वाईट होऊ नका. सबुरीने वागा. नोकरीत उच्च पद मिळू शकते; पण गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
मकर- करारमदार यशस्वीपणे पार पडतील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत असणाऱ्यांनी सुरुवातीला थोडा संयम दाखवला, तर अनपेक्षित असे लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होऊ शकतात. समाजात तुमचा मान वाढेल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
कुंभ- व्यवहार जपून करा : सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यासमोर काही अडचणी असतील. मनातील शंकांचे योग्य व्यक्तीशी बोलून निरसन करून घ्या. त्यामुळे तुमच्या शंका फिटतील आणि मनातील आत्मविश्वास वाढीस लागेल. जीवनसाथीशी वाद टाळा. आर्थिक उलाढाली जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. खाण्या- पिण्याचे पथ्य पाळा. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. सप्ताहाच्या शेवटी अनेक अडचणी दूर होतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
मीन- मौजमजा कराल : या सप्ताहात आपणास लोकांची चांगली साथ मिळेल. त्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मात्र, मनातील अकारण काळजीचे विचार काढून टाका. सकारात्मक विचार कराल तर कामातील अडचणी दूर होतील. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)