साप्ताहिक राशीभविष्य: या राशींना प्रेमात यश मिळेल, विवाह जुळतील; जाणून घ्या कसा असेल आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:00 IST2025-02-16T11:24:49+5:302025-02-16T12:00:45+5:30

Weekly Horoscope: १६ फेब्रुवारी २०२५ ते २१ फेब्रुवारी २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतू कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. रवी, बुध आणि शनी कुंभ राशीत आहेत.

शुक्र, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील. दि. १६ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) आहे.

दि. २० रोजी कालाष्टमी आहे. दि. २२ रोजी रामदास स्वामी नवमी आहे. रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ कृष्ण चतुर्थी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री २.१६ पर्यंत) आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ४.३१ पर्यंत हस्त तर त्यानंतर चित्रा नक्षत्र आहे. रास कन्या आहे. आज दिवस चांगला आहे. संकष्टी चतुर्थी आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.

संमिश्र ग्रहमान : या सप्ताहात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. दिवसाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी जाणवतील. जबाबदारीची जाणीव तुम्हाला आरामात बसू देणार नाही. मात्र ही मानसिकता बदलली पाहिजे. कामांचे नियोजन करा. त्यामुळे तुम्हाला थोडे हलके वाटेल. प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. गुरुवार, शुक्रवार अष्टमातील चंद्र भ्रमणामुळे सावधपणे वागा. ड्रोपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

प्रेमात सफलता मिळेल : साधक बाधक अनुभव येतील. सुरुवातीला एखाद्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हाल. कामात मन रमेल. मात्र, काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. त्यामुळे थोडा मनस्ताप होऊ शकतो. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित लाभ होतील. प्रेमात सफलता मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. शनिवारी वाहन जपून चालवा. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

पगारवाढ मिळेल : आपली महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला आटोपून घ्या. ग्रहमानाची अनुकूलता असल्याचा फायदा घ्या. नोकरीत नवीन संधीचा पुरेपूर वापर करून घ्या. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्या दृष्टीने मंगळवार, बुधवार चांगले दिवस आहेत. गुरुवार, शुक्रवार षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे तुमच्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. शनिवारी व्यवसायात भरभराट अनुभवायला मिळेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

अनुकूल परिस्थिती राहील: मोठ्या योजना हाती घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. लोक तुम्हाला चांगली साथ देतील. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होईल. प्रत्येक जण तुमच्याच मर्जीनुसार वागेल, अशी अपेक्षा ठेवू नका. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. त्या दृष्टीने मंगळवार, बुधवार हे दिवस लक्षात असू द्या. कामाचा ताण घेऊ नका. घरी पाहुणे मंडळी येतील. गुरुवार, शुक्रवार पंचम स्थानात चंद्र असल्याने अनुकूलता अनुभवायला मिळेल. चांगली बातमी कळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

यश मिळेल : या सप्ताहात आपल्याला अनेक आघाड्यांवर यश मिळेल. चंद्राच्या द्वितीय ते पंचम स्थानातून होणाऱ्या भ्रमणामुळे अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. आपल्या कामात सतत व्यस्त राहाल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. मुलांची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. मानसन्मान मिळेल. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

प्रगती होईल : तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. धनस्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे मंगळवार, बुधवार चांगले लाभ होतील. मालमत्तेच्या व्यवहारात तुमचा फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

धनलाभ होईल : तुमच्या योजनांच्या बाबतीत लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मात्र, रविवार, सोमवार हे दोन दिवस व्यय स्थानातून होणाऱ्या चंद्र-केतू युतीमुळे थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करता कामा नये. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. बुधवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. प्रेमात असणाऱ्यांना जोडीदाराच्या लहरीपणामुळे त्रास होऊ शकतो. तुमच्यावर धनलक्ष्मी प्रसन्न राहील. उत्तम लाभ होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

प्रेमात सफलता मिळेल : उत्साहपूर्ण वातावरणात काम करण्याचा अनुभव येईल. सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल. मात्र, देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. मंगळवार, बुधवार व्यय स्थानातील चंद्राच्या भ्रमणामुळे मनात काही शंका असतील. एखाद्या कामासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. गुरुवारपासून अनुकूल काळ सुरू होईल. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल वातावरण राहील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

लाभ होतील : सप्ताहाच्या सुरुवातीला असलेल्या अनुकूल ग्रहमानाचा फायदा घ्या. आपली महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. मंगळवार, बुधवार लाभस्थानातील चंद्र भ्रमणामुळे धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मित्र-मैत्रिर्णीच्या भेटी होतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. घरात उत्सवी वातावरण राहील. गुरुवार, शुक्रवार व्यय स्थानातील चंद्रामुळे काही अडचणी येतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. शनिवारी कामे होतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

भाग्याची साथ राहील अनेक आघाड्यांवर यश मिळेल अशी परिस्थिती राहील. चांगल्या घटना घडतील. संघर्ष कमी होईल. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. भाग्याची चांगली साथ राहील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. अचानक मोठी संधी मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. गुरुवार, शुक्रवार लाभ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. पैशाचा ओघ सुरू राहील. शनिवारी एखाद्या कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. टीप-मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मानसन्मान मिळेल : सुरुवातीला काही अडचणी असतील. अष्टम कुंभ स्थानातून होणाऱ्या चंद्र आणि केतू युतीची संमिश्र स्वरूपाची फळे रविवार व सोमवारी मिळतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. मंगळवारपासून ग्रहमान अनुकूल राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. समाजात तुमचा मान वाढेल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल बदल होतील. प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील. टीप - मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

उत्तरार्ध चांगला जाईल : पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध तुम्हाला अधिक चांगला जाईल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका. मंगळवार, बुधवार अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे आपल्याला सबुरीने वागण्याची गरज आहे. गुरुवारपासून शुभ फळे मिळणे सुरू होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. अडचणी दूर होतील. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. टीप-गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.