Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२२, या पाच राशींसाठी चांगला आठवडा, तर... By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 08:59 AM 2022-11-27T08:59:51+5:30 2022-11-27T09:26:54+5:30
Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याची अखेर आणि डिसेंबरची सुरुवात असलेला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... मेष ह्या आठवड्यात आपणास बराच विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. भूतकाळात आपण ज्या चुका केल्या त्याचा स्वीकारून त्याचा पश्चाताप करण्याचा हा आठवडा आहे. ज्यांना आपण दुखावले असेल त्यांची क्षमा मागून त्यांच्या समोर आपल्या मनातील भावना व्यक्त करा. असे केल्याने आपणास आतून समाधान लाभेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आणखी वाचा
वृषभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या प्राप्तीत वाढ करण्या विषयी विचार कराल. तसेच कोणत्या वस्तूंमुळे आपले खर्च वाढतात ह्याचा सुद्धा आपण विचार करू लागाल. त्यावर नियंत्रण मिळविण्यास आपले प्राधान्य राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या दोघात प्रेमाचे अंकुर फुटून भावनांचा संचार होईल. आपण एकमेकांची मनःस्थिती समजून घेऊन एकमेकांच्या जास्त जवळ याल.
मिथुन हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपले कौटुंबिक जीवन व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधू शकाल. त्यामुळे आपण खूप आनंदित व्हाल. सर्वत्र आपल्या नांवाची चर्चा होईल. आपली प्रशंसा सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ संभवते.
कर्क हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. घरात शुभ कार्य होईल. पूजा सुद्धा होऊ शकते. कुटुंबात सलोखा राहील. आपणास कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामात फायदा झाला तरी नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपण आपल्या संबंधाच्या बाबतीत प्रामाणिक राहिल्याने आपला वैवाहिक जोडीदार खुश होईल.
सिंह हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. घरात शुभ कार्य होईल. पूजा सुद्धा होऊ शकते. कुटुंबात सलोखा राहील. आपणास कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामात फायदा झाला तरी नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपण आपल्या संबंधाच्या बाबतीत प्रामाणिक राहिल्याने आपला वैवाहिक जोडीदार खुश होईल.
कन्या हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपले मनोबल उंचावल्याने आपण जोखीम घेण्यास प्राधान्य द्याल. त्यामुळे आपण आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांच्याशी सलोखा ठेवल्याने आपणास फायदा होऊ शकेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपले वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील. एकमेकांप्रती आकर्षण सुद्धा राहील. प्रेमीजन आपल्या संबंधात पुढे जाऊ शकतील.
तूळ हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या आरोग्या संबंधी जागरूक राहावे लागेल. अति स्वादिष्ट पदार्थ खाऊन आपली प्रकृती बिघडवून घेऊ नये. कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करून त्या पार पाडाव्यात. नोकरी करणाऱ्यांचे मनोबल उंचावेल. आपण प्रत्येक काम शीघ्रतेने करू शकाल. आपले काम लोकांच्या नजरेस भरेल. व्यापाऱ्यांना व्यापारात चांगला लाभ होईल. प्राप्तीत वाढ संभवते. आपण प्राप्त केलेल्या सिद्धीं पैकीच हि एक सिद्धी असेल.
वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल, जी आठवड्याच्या मध्यास थांबून आपल्या खर्चात वाढ होऊ लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपण स्वतःसाठी खरेदी सुद्धा करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल.
धनू हा आठवडा आपल्यासाठी महत्वाची बातमी घेऊन येणारा आहे. आपले खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी कुशल आर्थिक नियोजन करावे लागेल. त्यासाठी आपण मित्रांची मदत घेऊ शकता. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. त्यात आपणास नवीन काही शिकावयास सुद्धा मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपण आपल्या कामाचा विस्तार दूरवरच्या ठिकाणी करून चांगला नफा मिळवू शकाल.
मकर हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. परंतु नशिबावर अवलंबून राहू नये. मेहनत करत राहावे. ह्या आठवड्यात आपल्याकडे भरपूर पैसा आल्याने व आपणास चांगली प्राप्ती झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल, हि आठवड्यातील एक सुखद बातमी असेल. व्यवसायात सुद्धा नफा होण्याचे मार्ग खुले होतील. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत जागरूक होऊन सर्व कामे उत्तम प्रकारे करून आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.
कुंभ ह्या आठवड्याचा सुरवातीचा दिवस वगळता इतर सर्व दिवस आपल्यासाठी चांगले आहेत. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक ताण सुद्धा वाढेल. परंतु, जसजसे दिवस पुढे सरकतील तस तश्या आपल्या समस्या व आव्हाने दूर होऊ लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळेल. त्यामुळे आपण कामात ठामपणे पुढे जाऊ शकाल. व्यापाऱ्यांना प्रगतीसाठी स्वतःलाच मेहनत करावी लागेल.
मीन हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. व्यापाऱ्यांना हा आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या व्यवसायास गती येईल व प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. त्यामुळे आपणास चांगला नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परीणाम मिळतील. आपल्या कामात वाढ संभवते. आपली प्रशंसा सुद्धा केली जाईल. प्रकृती चांगली राहील. आपला वैवाहिक जोडीदार आपणास आपल्या कामात खूपच चांगली मदत करेल. तसेच आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा घेईल. असे झाल्याने आपल्या मनात त्यांच्याप्रती प्रेम भावना वाढेल.