रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. पूर्वी साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ वापरत असत. सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही रुद्राक्षाची माळ वापरतो, अगदी मुलीसुद्धा. परंतु, रुद्राक्षाची माळ हा काही दागिन्यांचा प्रकार नाही. ते धारण करण्यामागे शास्त्र आहे. रुद्राक्षाची माळ वापरणारी व्यक्ती अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी लागते. त्या व्यक्तीचे तेज त्याच्या मुखावर झळकून दिसते. अन्यथा कोणी येरागबाळा मनुष्य कफनी धारण करून, दाढी वाढवून हातात, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतो आणि स्वत:ला स्वयंघोषित बाबा, साधू, महाराज म्हणवून घेतो, त्याला लोक ढोंगी म्हणून उपहास करतात. म्हणून, रुद्राक्षच्या माळेचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. ती माळ कोणी घालावी आणि कोणी घालू नये, याबद्दल ज्योतिषशास्त्राचे नियम आहेत. त्या नियमांचे पालन न करता रुद्राक्षाची माळ वापरणाऱ्या व्यक्तीला विपरित परिणाम सहन करावे लागतात. काय आहेत ते नियम, जाणून घेऊया.