आपल्या घरात असावीत 'ही' 5 झाडं, समृद्धी अन् धनलक्ष्मीची राहिल कृपा By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:30 PM 2022-12-13T13:30:53+5:30 2022-12-13T13:42:14+5:30
घराच्या बाल्कनीत विविध झाडांची रोपं लावून घरासमोरचं निसर्गसौंदर्य जपलं जातं. झाडांच्या रोपांचा वास्तुशास्त्रांशीही संबध जोडला जातो. आपलं स्वत:चं एक घर असावं, त्या घरासमोर लहानशी बगिचा असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळेच, घर घेतल्यानंतर अनेकजण घरासमोर गार्डन करतात.
आता, पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये फ्लॅट सिस्टीमने राहावे लागते. त्यामुळे, येथे घरासमोर गार्डन शक्य होत नाही. त्यामुळे, घराच्या बाल्कनीत विविध झाडांची रोपं लावून घरासमोरचं निसर्गसौंदर्य जपलं जातं. झाडांच्या रोपांचा वास्तुशास्त्रांशीही संबध जोडला जातो.
वास्तुशास्त्रानुसार अनेक झाडे आणि रोपांना शुभ मानलं जातं. या झाडांना, रोपांना एकाच दिशेने घरात लावल्यास समृद्धी येते अशी धारणा आहे. समृद्धीसह सकारात्मक ऊर्जाही येत असल्याचं मानलं जातं. काही झाडांची घरात वाढ केल्यास धनलाभासाठी तो शगुन मानला जातो. त्याच ५ रोपांची माहिती आपण घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप शुभ मानले जाते. देवाधी देव शिवशंकर यांनाही शमीचं झाडं प्रिय होतं. शमीचे झाड घरात लावल्यानंतर दारिद्र्यता दूर होते. सोमवारी शमीचे फूल महादेवाच्या पिंडीवर वाहिल्यास समृद्धी येते, असेही म्ह
मोहिनीचं रोप - मोहिनी किंवा क्रेसुलाचे झाड दक्षिण आफ्रिकेत आढळून येते. वास्तुशास्त्रानुसार मोहिनीचे झाड घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेत लावल्यास शुभ मानले जाते. त्यासोबतच, घराच्या प्रमुख दरवाज्यासमोरही हे झाड लावता येते. मोहिनीचे झाडं पैशाशी संबंधित आहे.
स्नेक प्लांट - वास्तुशास्त्रानुसार घरात स्नेक प्लँट लावल्यास समृद्धी येते. घरातील अभ्यास खोलीत ठेवल्यास प्रगतीचं दार उघडलं जातं, असेही मानतात. सजावट म्हणून लिव्हींग रुममध्येही ठेऊ शकतो.
मनी प्लांट - मनी प्लांटला सर्वात आवडीचं रोपटं म्हणून पाहिलं जातं. याची फांदी पहायलाही सुंदर वाटते, तसेच वातावरण शुद्ध ठेवण्याचं कामही हे झाड करतं. मनी प्लांटला अग्नेय कोपऱ्यात लावणे शुभ मानलं जातं. या झाडामुळे घराती आर्थिक संकट दूर होते, असेही मानले जाते.
डाळिंब आणि बेलाचं रोप - वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या प्रमुख दरवाज्यावर डावीकडे डाळिंबाचं झाड लावावं. त्यामुळे, माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपा आपल्यावर राहते.
तर, प्रमुख दरवाज्याच्या उजवीकडे बेलाचे दार लावावे. त्यामुळेही कुबेर देवता प्रसन्न होते, अशी भावना आहे.