तुमचा घरातील आरसा ठरु शकतो तुमच्या भविष्याचा आरसा, भरभराटीसाठी वापरा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:00 PM2022-07-28T21:00:03+5:302022-07-28T21:12:55+5:30

तुमच्या घरातला आरसा ठरु शकतो तुमच्या भरभराटीचे कारण! फक्त वास्तूशास्त्रानुसार तो कोणत्या खोलीत कुठे आणि कसा लावायचा हे जाणून घेण महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया काही टिप्स

आपले घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेले आणि सजवलेले असणे हे सुख, शांती, समृद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अशीच एक वस्तू असते जिला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व आहे. ती म्हणजे आरसा.

वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये आरसा कुठे असावा, यासाठीही ठिकाण आणि दिशा ठरवली जाते.

घरातील आरसा जर चुकीच्या ठिकाणी असेल तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे आरोग्य बिघडते आणि धनहानी होते.

आज आम्ही तुम्हाला घरामध्ये आरसा लावण्यासाठी कोणकोणत्या जागा योग्य आहेत याबद्दल माहिती देणार आहोत.

बेडरूम : तुमच्या बेडरूममध्येच एक आरसा असावा. जेणेकरून तुम्हाला प्रत्येकवेळी बाथरूममध्ये जाण्याची गरज पडणार नाही. बेडरूममध्ये तुम्ही मोठ्या आकाराचा आणि दिसायला सुंदर असलेला कोणताही आरसा लावू शकता. आरसा तुम्ही टेबलवर ठेऊ शकता किंवा भिंतीवरही लावू शकता. केवळ वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आरसा अशा ठिकाणी ठेवू नये जिथे तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या शरीराचे सर्व अवयव दिसतील.

बाथरूम : बाथरूममध्ये तुम्ही उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भिंतीवर आरसा लावू शकता. वास्तूनुसार त्याचा फायदा होईल. आरसा साधारणपणे सिंकच्या वर लावला जातो. बाथरूमधील आरशाला कोपऱ्यांमध्ये छोटे लाईट लावण्याचा प्रयत्न करा. कारण आरसा अंधारात ठेवणे शुभ मानले जात नाही.

लहान मुलाची रूम : मुलांना स्वतःला आरशात पाहणे आवडते. तुम्ही त्यांचे कपडे बदलत असताना आरशाचा उपयोग होईल. मुलांच्या खोलीत तुम्ही कार्टून कॅरेक्टर किंवा प्राणी असलेला आरसा लावू शकता. मात्र हा आरसा तुमच्या मुलांच्या उंचीनुसार भिंतीवर लावावा. जेणेकरून मुलांना स्वतःला आरशात पाहाणे सोपे जाईल. मुलांच्या रूममध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तरेकडील भिंतीवर आरसा लावा.

टेबलवर : घरात सकारात्मक उर्जा समृद्ध होण्यासाठी पूर्व किंवा उत्तरेकडील भिंतीवर प्रकाश प्रतिबिंबित करणारे आरसे लावावे. तुम्हाला मेणबत्तीचा लॅव्हेंडरचा सुगंध आणि त्यातून निर्माण होणारी आभा आवडत असेल, तर तुम्ही मेणबत्त्या लावलेल्या टेबलच्या मागे आरसा लावू शकता. हे प्रकाश अधिक तेजस्वी बनवेल आणि तुम्हाला अधिक चांगले व्हाइब्स मिळतील.

प्रवेशद्वार : घराच्या मुख्य दरवाजाजवळ आरसा लावणे ही चांगली कल्पना असू शकते. तुमच्या घराच्या आतील इंटेरियरशी मिळत जुळत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही डिझाइन आणि रंगाचा आरसा तुम्ही लावू शकता. घराच्या मुख्य दरवाज्याजवळील आरशाचा विचार करताना चौरस किंवा आयताकृती आरसा घेणे योग्य राहील. यामुळे तुमच्या घरात प्रवेश करणारी सर्व नकारात्मक ऊर्जा कमी होईल.

अभ्यासाचा किंवा कामाचा डेस्क : तुमच्या अभ्यासाच्या किंवा कामाच्या टेबलवर भिंतीवर तुम्ही आरसा लावू शकता. यामुळे अभ्यास करताना किंवा काम करताना तुमची सकारात्मक ऊर्जा प्रतिबिंबित करण्यात आणि कामात उत्पादकता जोडण्यास मदत होईल. त्याचबरोबर काम करत असताना तुम्हाला आरामदायक वाटेल.