परदेशात अपार्टमेंट, ३० कोटींचा हार आणि..., अनंत-राधिकाला बॉलिवूड स्टार्सकडून तगडा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 09:26 PM2024-07-21T21:26:13+5:302024-07-21T21:30:36+5:30

Anant Ambani-Radhika Merchant Marriage: रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या झालेल्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा जगभरात झाली. दरम्यान, विवाहाला जगभरातील दिग्गज मंडळींसह बॉलिवूडमधील कलाकारही उपस्थित होते. या बॉलिवूड कलाकारांनी नवदाम्पत्याला अनेक महागडी गिफ्टही दिली. त्याची यादी आता समोर आली आहे.

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या झालेल्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा जगभरात झाली. दरम्यान, विवाहाला जगभरातील दिग्गज मंडळींसह बॉलिवूडमधील कलाकारही उपस्थित होते. या बॉलिवूड कलाकारांनी नवदाम्पत्याला अनेक महागडी गिफ्टही दिली. त्याची यादी आता समोर आली आहे.

अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याला शाहरुख खान त्याची पत्नी आणि मुलांसह उपस्थित होता. मीडियामधून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार किंग खानने नवदाम्पत्याला फ्रान्समधील एक लक्झरी अपार्टमेंट भेट म्हणून दिली.

महानायक अमिताभ बच्चन हेसुद्धा पत्नी जया बच्चन आणि संपूर्ण कुटुंबासह या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. बच्चन कुटुंबीयांनी राधिका मर्चंट हिला ३० कोटींचा डायमंड अँड पन्ना नेकपीस भेट म्हणून दिल्याचं सांगण्यात येत आहे.

अंबानी कुटुंबात झालेल्या या रॉयल विवाह सोहळ्याला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दाम्पत्यही उपस्थित होते. त्यांनी अनंत आणि राधिकाला ९ कोटी रुपयांची मर्सिडिझ कार भेट म्हणून दिली.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हेसुद्धा या विवाह सोहळ्याल नटून थटून आले होते. त्यांनी नवदाम्पत्याला २५ लाख रुपयांची हाताने विणलेली शॉल भेट दिली.

अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी अनंत आणि राधिकाला विवाह प्रसंगी ६० लाख रुपयांचं सोन्याचं पेन भेट म्हणून दिलं.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हेसुद्धा अंबानी कुटुंबातील या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी या विवाह सोहळ्यामध्ये १९ लाख रुपयांची सोन्याची चेन भेट म्हणून दिली.

सलमान खान हासुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होता. त्याने १५ कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक नवदाम्पत्याला गिफ्ट दिली.

तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी या विवाह प्रसंगी अनंत अंबानी आणि राधिका यांना २० कोटी रुपयांची कस्टमाइज्ड रोल्स रॉईस कार भेट म्हणून दिली.